मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई शहरातील अनेक रस्ते आणि पदपथांखालून जाणाऱ्या पर्जन्य जलवाहिनींच्या मनुष्यप्रवेश असलेल्या ठिकाणी बसवलेली झाकणे तुटली गेली तर काही ठिकाणी चोरीला गेली आहे. पावसाळ्यात या मॅनहोल्समध्ये पडून झालेल्या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर पावसाळ्यात तातडीने ही झाकणे बसवण्यासाठी कंत्राटदाराची नेमणूक करून ही झाकणे बसवण्याची प्रक्रिया पूर्ण केली. विशेष म्हणजे चोरीला गेलेली झाकणे बसवली पण अनेक ठिकाणी फ्रेम योग्य आकाराची नसल्याने झाकणे व्यवस्थित बसत नाही म्हणून आता त्या फ्रेमनुसार झाकणे बसवून चेनद्वारे ती लॉकही केली गेली. तसेच भविष्यातही मॅनहोल्सची झाकणे ही साखळीद्वारे टाळेबंद केली जाणार आहेत.
Mumbai Book Festival: मुंबईत २४ नोव्हेंबरपासून पुस्तक महोत्सव; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
मुंबई : पुस्तकप्रेमी, साहित्यिक आणि वाचकांसाठी मुंबईत येत्या २४ नोव्हेंबरपासून सहा दिवसांचा पुस्तक महोत्सव रंगणार आहे. राष्ट्रीय पुस्तक न्यास, भारत ...
कुलाबा ते माहिम धारावी पर्यंतच्या शहर भागातील पर्जन्य जलवाहिन्यांच्या मॅनहोलवर विविध ठिकाणी सी.आय./डी.आय. प्रकारची आयताकृती झाकणे आणि फ्रेम्स बसवलेली असतात. या आयताकृती झाकणांचे आकार प्रमाणित तसेच अप्रमाणित असतात. ज्या प्रकरणांमध्ये मॅनहोलच्या झाकणांची फ्रेम चांगली असते, परंतु झाकणे तुटलेली/गहाळ असतात आणि झाकणांचा आकार अप्रमाणित असतो, तेव्हा रस्त्यावर कोणताही प्राणघातक अपघात टाळण्यासाठी, जागेवरच फ्रेम्सचे अचूक माप घेऊन एम.एस.ची झाकणे तयार करणे आणि ती तयार केलेली झाकणे चेन लॉकिंगच्या व्यवस्थेसह विद्यमान फ्रेम्सवर बसवणे आवश्यक ठरते. त्यासाठी महापालिकेने यापूर्वी नियुक्त केलेल्या कंत्राटदाराचा कालावधी संपुष्टात आल्याने त्याठिकाणी नवीन कंत्राटदाराची निवड करण्यासाठी निविदा मागवली होती.
Maharashtra State Government Decision: क्राईम ब्रँच, आर्थिक गुन्हे शाखेला आता पोलीस ठाण्याचा दर्जा; राज्य सरकारचा निर्णय
मुंबई : मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेला (क्राईम ब्रँच) आणि आर्थिक गुन्हे शाखेला (ईओडब्ल्यू) आता अधिकृतपणे पोलीस ठाण्याचा दर्जा देण्यात आला आहे. राज्य ...
400 चौ. मी. रस्त्यांच्या क्षेत्रफळाचा समावेशआहे. पुढील 24 महिन्यांच्या कालावधीत हे काम पूर्ण करायचे असून यासाठी मागवलेल्या निविदेमध्ये बेलटेक इंजिनिअर्स ही कंपनी पात्र ठरली आहे. ही कामे 2026 च्या पावसाळा सुरु होण्यापूर्वी नियोजित वेळेत पूर्ण करणे जरुरीचे असल्यामुळे 50 लाखांपर्यंतचे काम संबंधित कंत्राटदाराकडून प्रशासनाने करून घेतले. परंतु यासर्व कामांसाठी 1.10 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.