Tiger Shroff: महिनाभरानंतर टायगर श्रॉफची दमदार एन्ट्री; पारंपरिक लूकमध्ये ‘देवा श्री गणेशा’वर डान्स

गोळीबाराच्या घटनेनंतर अभिनेता टायगर श्रॉफ पहिल्यांदाच सार्वजनिक कार्यक्रमात दिसला. मुंबईतील ‘ग्लोबल पीस ऑनर्स '2026’ सोहळ्यात त्याने ‘देवा श्री गणेशा’ या गाण्यावर दमदार डान्स परफॉर्मन्स सादर केला. त्याच्या पारंपरिक लूकची आणि भन्नाट डान्सची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.

बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. ऑक्टोबर महिन्यात घडलेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर टायगरने पहिल्यांदाच सार्वजनिक कार्यक्रमात हजेरी लावली. मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘ग्लोबल पीस ऑनर्स 2026’ या कार्यक्रमात टायगरने दमदार डान्स परफॉर्मन्स सादर केला. विशेष म्हणजे, त्याने ‘अग्निपथ’ चित्रपटातील लोकप्रिय ‘देवा श्री गणेशा’ या गाण्यावर ठेका धरला. त्याच्या या परफॉर्मन्सचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत.(Deva Shree Ganesha)



पारंपरिक वेशभूषेत टायगरचा खास अंदाज


21 नोव्हेंबर रोजी मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया येथे ‘ग्लोबल पीस ऑनर्स 2026’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात बॉलिवूडसह विविध क्षेत्रांतील अनेक प्रसिद्ध व्यक्तींनी उपस्थिती लावली होती. यावेळी टायगर श्रॉफने पारंपरिक वेशभूषा परिधान केली होती. त्याच्या या लूकने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.


टायगरने स्टेजवर येताच ‘देवा श्री गणेशा’ या गाण्यावर शानदार डान्स सादर केला. त्याच्या डान्समधील एनर्जी आणि नृत्यकौशल्य पाहून उपस्थितांनीही त्याला दाद दिली. या कार्यक्रमातील त्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.(Ganpati Bappa Morya)







गोळीबाराच्या घटनेनंतर पहिल्यांदाच सार्वजनिक कार्यक्रमात


18 ऑक्टोबर रोजी मुंबईतील जुहू परिसरात टायगर श्रॉफच्या गाडीवर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केल्याची घटना घडली होती. तो फुटबॉल खेळून घरी परतत असताना ही घटना घडल्याचे वृत्त आहे. या घटनेत त्याला किरकोळ दुखापत झाली होती, तर त्याच्या कारच्या आरशाचेही नुकसान झाले होते.


या घटनेनंतर टायगर सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर होता. त्यामुळे जवळपास महिनाभरानंतर त्याने लावलेली ही उपस्थिती विशेष चर्चेत आली आहे. गोळीबाराच्या घटनेनंतर त्याचा हा पहिलाच सार्वजनिक स्टेज परफॉर्मन्स ठरला.



शाहरुख, अक्षय आणि सचिन तेंडुलकर यांचीही उपस्थिती


या कार्यक्रमाला बॉलिवूडचे अनेक दिग्गज कलाकार आणि इतर क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. शाहरुख खान, अक्षय कुमार, रणवीर सिंह, सचिन तेंडुलकर आणि विक्रांत मेस्सी यांच्यासह अनेक प्रसिद्ध व्यक्तींनी या सोहळ्याला उपस्थिती लावली.


दिव्यज फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाचा उद्देश शांतता, एकता आणि मानवतेचा संदेश देणे हा होता. दहशतवादाच्या घटनांमध्ये बळी पडलेल्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासह शांतता आणि मानवतेसाठी योगदान देणाऱ्या व्यक्तींचा गौरव या सोहळ्यात करण्यात आला.(Tiger Shroff Comeback)







टायगरच्या आगामी चित्रपटांचीही चर्चा


कामाच्या आघाडीवर टायगर श्रॉफ शेवटचा ‘बागी 4’ या ॲक्शनपटात दिसला होता. आता तो अभिनेत्री जान्हवी कपूर आणि अभिनेता लक्ष्य यांच्यासोबत ‘लग जा गले’ या आगामी चित्रपटात दिसणार आहे. तसेच रेमो डिसूझाच्या आगामी प्रोजेक्टमध्येही तो झळकणार आहे.(Ganpati Bappa Morya)


गोळीबाराच्या घटनेनंतर टायगरने पुन्हा एकदा स्टेजवर दमदार पुनरागमन केले असून त्याच्या ‘देवा श्री गणेशा’वरील डान्सची सध्या चाहत्यांमध्ये चर्चा रंगली आहे.



टायगरच्या डान्समध्ये डॉगेश भाईची सरप्राइज एन्ट्री!


टायगर श्रॉफ ‘देवा श्री गणेशा’ या गाण्यावर परफॉर्म करत असताना अचानक एक कुत्रा स्टेजवर आला. या अनपेक्षित पाहुण्यामुळे कार्यक्रमात वेगळाच रंग भरला. विशेष म्हणजे, कुत्रा स्टेजवर आल्याने टायगरने आपला परफॉर्मन्स थांबवला नाही. तो शांतपणे स्टेजवर आला आणि काही वेळात पायऱ्यांवरून खाली उतरला.


या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. सोशल मीडिया युजर्सनी या कुत्र्याला मजेशीरपणे ‘डॉगेश भाई’ असे संबोधले. टायगरच्या डान्सपेक्षाही काही नेटकऱ्यांचे लक्ष या अनपेक्षित एन्ट्रीने वेधून घेतले. त्यामुळे टायगरचा परफॉर्मन्स आणि डॉगेश भाईची एन्ट्री दोन्ही चर्चेत आले आहेत.(Bollywood News)

Comments
Add Comment

Kartik Aaryan Upcoming Movie: कार्तिक आर्यन बनला निर्माता! वाढदिवशी 'कालिया'ची घोषणा, करण जोहरसोबत नवा प्रोजेक्ट

Kartik Aaryan Upcoming Movie: बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनचा 36 वा वाढदिवस आज, 22 नोव्हेंबर रोजी साजरा होत आहे. या खास प्रसंगी

Gaurav Khanna: आकांक्षा चामोलासोबतच्या नात्यावर गौरव खन्नाचं वक्तव्य; नात्यातील स्थिरतेला दिलं महत्त्व

गेली काही वर्षे अभिनेता गौरव खन्नासाठी चढ उतारांनी भरलेली होती. एकीकडे 'सेलिब्रिटी मास्टरशेफ' आणि 'बिग बॉस १९'

Shafqat Amanat Ali: 'मितवा' फेम गायक शफकत अमानत अली कॅन्सरशी झुंज देत होते; आता पुन्हा संगीतविश्वात परतणार

Mitwa Singer: 'मितवा' फेम सुप्रसिद्ध गायक शफकत अमानत अली सध्या आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. गायकाने आपल्या

Jhimma 3 Teaser Released : ‘झिम्मा 3’मध्ये यावेळी मोठा ट्विस्ट! महिलांच्या गँगमध्ये कोणाची होणार एन्ट्री?

मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय ‘झिम्मा’ चित्रपटाच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ‘झिम्मा’ आणि

Anirudh Kavya Maran Reception: अनिरुद्ध-काव्याचं चेन्नईत शाही रिसेप्शन; रजनीकांतपासून विजयपर्यंत दिग्गजांची हजेरी

संगीतकार अनिरुद्ध रविचंदर आणि सनरायझर्स हैदराबादची सह-मालकीण काव्या मारन यांच्या लग्नाचा रिसेप्शन सोहळा (Aniruddha and

Sai Pallavi new movie: ना रोमँटिक अंदाज, ना साधी भूमिका! साई पल्लवीने साकारली धाडसी IPS अधिकाऱ्याची भूमिका

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता धनुष आणि अभिनेत्री साई पल्लवी यांची जोडी पुन्हा एकदा मोठ्या