Kota-Udaipur Accident: खाटू श्यामजींच्या दर्शनावरून परतताना काळाचा घाला! धुळ्यातील एकाच कुटुंबातील 9 जणांचा मृत्यू

राजस्थानमधील कोटा-उदयपूर राष्ट्रीय महामार्गावर शंभूपुरा गावाजवळ मध्यरात्री भीषण रस्ते अपघात झाला. खाटू श्यामजींचे दर्शन घेऊन महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यात परतणाऱ्या एका कुटुंबाच्या क्रुझर गाडीने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला धडक दिली. या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू झाला असून ६ जण जखमी झाले आहेत.

खाटू श्यामजींचे दर्शन घेऊन परतत असताना महाराष्ट्रातील एका कुटुंबावर काळाने घाला घातला आहे. रविवारी मध्यरात्री कोटा उदयपूर राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या भीषण रस्ते अपघातात एकाच कुटुंबातील नऊ जणांचा मृत्यू झाला असून सहा जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये लहान मुलांचा देखील समावेश आहे. ही घटना शंभूपुरा गावाजवळ मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास घडली. भरधाव वेगाने येणाऱ्या त्यांच्या क्रुझर गाडीने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला धडक दिली. या धडकेमुळे वाहनाचा चक्काचूर झाला आणि त्यातील प्रवासी आत अडकले. वाहनात महाराष्ट्रातील एकाच कुटुंबातील १५ जण होते. हे कुटुंब महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातील रहिवासी असून राजस्थानातील खाटू श्यामजींचे दर्शन घेऊन परत येत होते. प्राथमिक अहवालानुसार गाडी चालवताना चालकाला डुलकी लागल्याने हा अपघात झाला असावा.


पोलिसांनी सांगितले की हे कुटुंब तीर्थयात्रेवरून परत येत असताना चार वाहनांच्या ताफ्यातून प्रवास करत होते. या अपघातात त्या ताफ्यातील एका वाहनाचा समावेश होते. मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींमध्ये सज्जन (६२), त्यांची पत्नी उषाबाई (६०), सुशीला (६२), कैलास (३५), त्याची पत्नी अनिता (३४), बाबूलाल(७५), माधवी (३२) आणि सान्वी आणि जान्हवी यांचा समावेश आहे. अपघातातील जखमींमध्ये ३ वर्षांच्या बालकासह जगदीश (१०), मयूरी पवार (२०), मनीषा पवार (४५), शरद पवार (४६), गणेश पवार (३०) आणि ट्रक चालक हारून (४३) यांचा समावेश आहे. सर्व जखमींवर न्यू मेडिकल कॉलेज रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघाताची बातमी मिळताच शहर पोलीस अधीक्षक तेजस्विनी गौतम घटनास्थळी पोहोचल्या. पोलीस आणि बचाव पथकांनी वाहनात अडकलेल्याना बाहेर काढले आणि जखमींना रुग्णालयात दाखल केले. जखमींवर उपचार करण्यासाठी रुग्णालयात एक वैद्यकीय पथकही तैनात करण्यात आले आहे. परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी अतिरिक्त जिल्हाधिकारी यांच्यासह पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी अपघातस्थळी आणि रुग्णालयात पोहोचले.





नऊ जणांच्या मृत्यूची पुष्टी करताना, अतिरिक्त जिल्हाधिकारी राजेश जोशी यांनी या घटनेला अत्यंत दुःखद आणि वेदनादायी म्हटले. 'ते खाटू श्यामजींचे दर्शन घेऊन महाराष्ट्रात परत येत होते. ते सर्व एकाच कुटुंबातील सदस्य होते. जखमींना योग्य वैद्यकीय उपचार मिळावेत आणि ते बरे व्हावेत हे सुनिश्चित करणे सध्या आमचे प्राधान्य आहे.' असे त्यांनी एएनआयला सांगितले. अपघातात जखमी झालेला ट्रक चालक हारून (४३) हा मध्य प्रदेशातील खंडवा येथील रहिवासी आहे. ट्रकमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने त्याने वाहन रस्त्याच्या कडेला थांबवले होते. तो ट्रकपासून काही अंतरावर उभा राहून बिघाड तपासत असताना भरधाव क्रुझरने त्याला धडक दिली आणि ट्रकच्या मागील भागात घुसली. धडकेमुळे हारून सुमारे २० फूट दूर फेकला गेला. काही वेळाने शुद्धीवर आल्यानंतर त्याने पोलिसांना आणि रुग्णवाहिकेला अपघाताची माहिती दिली. त्याच्या डोक्याला आणि गुडघ्याला दुखापत झाली आहे.

Comments
Add Comment

Yuzvendra Chahal in BJP: क्रिकेटपटू युजवेंद्र चहलचा भाजपमध्ये प्रवेश; ओबीसी मोर्चाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत विशेष निमंत्रित म्हणून निवड

भारतीय क्रिकेटपटू युझवेंद्र चहल याने शनिवारी (२१ नोव्हेंबर) भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. भाजप ओबीसी

पंतप्रधानांचं सहा महिन्यांपूर्वीचं विधान अखेर खरं ठरलं, सोनं खरेदीबद्दल PM मोदी नेमकं काय म्हणाले होते?

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल लखनौमध्ये एका कार्यक्रमासाठी उपस्थिती लावली होती, यावेळी त्यांनी सहा

JEE Main 2027 : Session 1 साठी नोंदणी उद्या संपणार; चुकवू नका ही शेवटची संधी

JEE Main 2027 Session 1 परीक्षेसाठी नोंदणी करण्याची मुदत उद्या, २२ नोव्हेंबर २०२६ रोजी संपणार आहे. राष्ट्रीय चाचणी संस्थेने (NTA)

घरात बनवलेले नूडल्स ठरले जीवघेणे; 7 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू, मोठी बहीण गंभीर

घरात बनवलेल्या नूडल्सने एका कुटुंबाचा घास घेतला आहे. नूडल्स खाल्ल्यानंतर ७ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला असून तिची

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाला वेग; सुरत-बिलीमोरा मार्गावर वीज यंत्रणा सुरू

देशातील पहिल्या बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या दिशेने आणखी एक मोठं पाऊल पडलं आहे. मुंबई-अहमदाबाद हाय स्पीड रेल

Haridwar Firing News : हरिद्वार हादरले! गुप्तचर विभागाच्या पोलीस अधीक्षकांवर चालकाचा गोळीबार; एम्समध्ये उपचार सुरू, आरोपी अटकेत

हरिद्वार : उत्तराखंडमधील हरिद्वार शहरात शनिवारी एक अत्यंत खळबळजनक आणि संतापजनक घटना घडली आहे. आपल्याच