UP Vidhan Sabha election strategy यूपी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचा 'मास्टरप्लॅन' तयार! आमदार, खासदारांवर सोपवली मोठी जबाबदारी

या नियोजनानुसार, ५ डिसेंबरपर्यंत भाजपच्या लोकप्रतिनिधींना आपल्या भागात 'चौपाल' म्हणजेच ग्रामस्थांशी आणि नागरिकांशी थेट बोलण्यासाठी छोट्या बैठका घ्याव्या लागणार आहेत. यामध्ये प्रत्येक भाजप आमदाराने आपल्या विधानसभा क्षेत्रात ५० चौपाल घेणे अपेक्षित आहे. दुसरीकडे, लोकसभा खासदारांवर त्यांच्या मतदारसंघात १० चौपाल आयोजित करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

लखनऊ : पुढच्या विधानसभा निवडणुकांसाठी उत्तर प्रदेशमध्ये भाजपने आतापासूनच जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. पक्ष अधिक बळकट व्हावा आणि नेते-कार्यकर्ते सातत्याने लोकांच्या संपर्कात राहावेत, यासाठी पक्षाने खास प्लॅन तयार केला आहे. नुकत्याच पार पडलेल्या भाजपच्या एका ऑनलाईन बैठकीत राज्याचे प्रभारी विनोद तावडे यांनी सर्व लोकप्रतिनिधींना तळागाळात जाऊन काम करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. या नियोजनानुसार, ५ डिसेंबरपर्यंत भाजपच्या लोकप्रतिनिधींना आपल्या भागात 'चौपाल' म्हणजेच ग्रामस्थांशी आणि नागरिकांशी थेट बोलण्यासाठी छोट्या बैठका घ्याव्या लागणार आहेत. यामध्ये प्रत्येक भाजप आमदाराने आपल्या विधानसभा क्षेत्रात ५० चौपाल घेणे अपेक्षित आहे. दुसरीकडे, लोकसभा खासदारांवर त्यांच्या मतदारसंघात १० चौपाल आयोजित करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

ज्या विधानसभा मतदारसंघांमध्ये सध्या भाजपचा आमदार नाही किंवा जिथे पक्षाची ताकद कमी आहे, अशा जागांवर भाजपने विशेष भर दिला आहे. अशा कमकुवत मतदारसंघांमध्ये जाऊन चौपाल घेण्याचे काम विधान परिषद सदस्य (MLC) आणि राज्यसभा खासदारांकडे सोपवण्यात आले आहे. तिथल्या नागरिकांच्या अडचणी जाणून घेणे आणि पक्षाची ताकद वाढवणे, हा यामागील मुख्य हेतू आहे.

भाजपची ही जनसंपर्क मोहीम ५ डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. सर्वसामान्य मतदारांशी थेट संवाद साधून पक्षाची पकड अधिक घट्ट करणे, अशी यामागची योजना आहे. या व्हर्च्युअल बैठकीत आगामी निवडणुकीच्या तयारीसोबतच मतदार यादीशी संबंधित 'SSR' (स्पेशल समरी रिव्हिजन) कामाचाही आढावा घेण्यात आला. या बैठकीत प्रभारी विनोद तावडे यांच्यासह प्रदेशाध्यक्ष पंकज चौधरी, धर्मपाल सिंह आणि राज्यातील अनेक खासदार व आमदार ऑनलाईन सहभागी झाले होते.

बातमी अपडेट होत आहे..
Comments
Add Comment

Himachal Pradesh royal wedding : जर्मनीत जुळलं प्रेम, हिमाचलमध्ये रंगला शाही विवाह! इंग्लंडच्या वऱ्हाडाला पाहून मंडीचे गावकरी थक्क

मंडी : प्रेमाला भूगोलाच्या रेषा, भाषेचे अडथळे किंवा संस्कृतीच्या भिंती रोखू शकत नाहीत, याचा प्रत्यय हिमाचल

पाण्याच्या गुणवत्तेवरील आरोपांवर 'बिसलेरी' कंपनीकडून स्पष्टीकरण, म्हणाले...

मुंबई: FSSAI ने बाटली बंद पिण्याच्या पाण्याची असलेल्या 'बिसलेरी' कंपनीच्या विरोधात खटला चालवण्यासाठी मंजुरी

HPV Vaccination : देशात एचपीव्ही लसीकरणाचा 1 कोटींचा टप्पा पूर्ण ! सहा राज्यांची 100 टक्के कामगिरी, पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून अभियानाचे कौतुक

HPV Vaccination : देशातील मुलींच्या आरोग्याच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण यश समोर आले आहे. देशभरात सुरू असलेल्या राष्ट्रीय

PUC Validity Check: गाडीचा PUC संपलाय का? मोबाईलवर एका क्लिकमध्ये घरबसल्या तपासा

PUC Validity Check: जर तुम्ही कार किंवा बाईक चालवत असाल, तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आता तुम्ही घरबसल्या तुमच्या फोनच्या

आईच्या निधनानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यना भावूक, शेअर केले भावनिक पत्र

उत्तर प्रदेश: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मातोश्री सावित्री देवी यांचे दोन

Asia Power Index 2026 : आशियातील महासत्तांच्या यादीत भारताची मोठी झेप ! जपान आणि रशियाला टाकले मागे

Asia Power Index 2026 : आशियातील सर्वात शक्तिशाली देश कोणता? या प्रश्नाचे उत्तर देणारा २०२६ चा 'एशिया पॉवर इंडेक्स' जाहीर झाला