HPV Vaccination : देशात एचपीव्ही लसीकरणाचा 1 कोटींचा टप्पा पूर्ण ! सहा राज्यांची 100 टक्के कामगिरी, पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून अभियानाचे कौतुक

या अभियानात सहा राज्यांनी आपापले निर्धारित लसीकरण उद्दिष्ट 100 टक्के पूर्ण केले आहे. यामध्ये गुजरात, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, मिझोराम, मध्य प्रदेश आणि बिहार या राज्यांचा समावेश आहे.

HPV Vaccination : देशातील मुलींच्या आरोग्याच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण यश समोर आले आहे. देशभरात सुरू असलेल्या राष्ट्रीय एचपीव्ही (HPV) लसीकरण अभियानांतर्गत आतापर्यंत 1 कोटींपेक्षा अधिक लसींचे डोस देण्यात आले आहेत. या महत्त्वपूर्ण कामगिरीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाधान व्यक्त करत अभियानाशी संबंधित सर्व घटकांचे कौतुक केले आहे. एचपीव्ही लसीची प्रत्येक मात्रा मुलींना सर्व्हायकल कॅन्सर अर्थात गर्भाशयमुखाच्या कर्करोगापासून संरक्षण देण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल असल्याचे मोदी यांनी म्हटले आहे.



नऊ महिन्यांपेक्षा कमी कालावधीत मोठे यश


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे या यशाचे कौतुक केले. प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेच्या दिशेने हा महत्त्वाचा टप्पा असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच मुलींचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी आणि त्यांना निरोगी भविष्य देण्यासाठी या लसीकरण अभियानाची महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले.


केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनीही या कामगिरीची माहिती दिली. त्यांच्या माहितीनुसार, यावर्षी निश्चित करण्यात आलेल्या एकूण उद्दिष्टाच्या सुमारे 87 टक्के लक्ष्याची पूर्तता झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या राष्ट्रीय एचपीव्ही लसीकरण अभियानाने अवघ्या नऊ महिन्यांपेक्षा कमी कालावधीत हा टप्पा गाठला आहे.





उत्तर प्रदेश लसीकरणात देशात अव्वल


या अभियानांतर्गत दरवर्षी 14 वर्षे वयोगटातील मुलींसाठी सुमारे 1.15 कोटी ते 1.2 कोटी लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार उत्तर प्रदेशने 29.33 लाखांहून अधिक मुलींना लस देत देशात पहिला क्रमांक मिळवला आहे. उत्तर प्रदेशनंतर बिहारमध्ये 13.70 लाख, तर गुजरातमध्ये 7.75 लाख मुलींचे लसीकरण करण्यात आले आहे.






सहा राज्यांची 100 टक्के उद्दिष्टपूर्ती


या अभियानात सहा राज्यांनी आपापले निर्धारित लसीकरण उद्दिष्ट 100 टक्के पूर्ण केले आहे. यामध्ये गुजरात, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, मिझोराम, मध्य प्रदेश आणि बिहार या राज्यांचा समावेश आहे. सर्व्हायकल कॅन्सर हा महिलांमध्ये आढळणारा गंभीर आजार असून, एचपीव्ही लसीकरणामुळे या आजाराचा धोका कमी करण्यास मदत होते. त्यामुळे देशातील मुलींच्या आरोग्याच्या दृष्टीने हे अभियान महत्त्वपूर्ण मानले जात आहे.

Comments
Add Comment

न्यूझीलंडविरुद्धचा पहिला कसोटी सामना ड्रॉ झाल्यानंतर कर्णधार शुभमन गिल संतापला, खेळपट्टीबाबत सरळ म्हणाला की...

न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. खरं

PUC Validity Check: गाडीचा PUC संपलाय का? मोबाईलवर एका क्लिकमध्ये घरबसल्या तपासा

PUC Validity Check: जर तुम्ही कार किंवा बाईक चालवत असाल, तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आता तुम्ही घरबसल्या तुमच्या फोनच्या

WTC Points Table: वेलिंग्टन कसोटी ड्रॉ झाल्याने टीम इंडियाचा अंतिम फेरीचा मार्ग खडतर, कसं काय ते जाणून घ्या

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना ड्रॉ

China Gold Buying: सोन्याच्या दरात घसरण, चीनची मात्र विक्रमी खरेदी; नेमकी काय आहे रणनीती?

China Gold Buying:  सोन्याच्या किमती झपाट्याने कोसळत आहेत. तर दुसरीकडे चीन गेल्या 24 महिन्यांपासून सोन्याचा एक मोठा खेळ

Orry Viral Photo: ऑरीच्या सिग्नेचर पोझवरून नवा वाद; अनन्या पांडेसोबतचा फोटो व्हायरल

Orry Viral Photo: ओरहान अवत्रामणी (ऑरी) सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतो. त्याच्या पोस्ट्स आणि त्याची शैली सोशल मीडियावर

Sapna Choudhary Divorce: सहा वर्षांच्या संसारात दुरावा! सपना चौधरी पती वीर साहूपासून घेणार घटस्फोट

हरियाणवी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय नाव असलेली गायिका आणि डान्सर सपना चौधरी सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे