Central Railway : महापरिनिर्वाण दिनानिमित्त मध्य रेल्वे 15 अनारक्षित विशेष गाड्या चालवणार

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी, दादर येथे येणाऱ्या लाखो अनुयायांच्या प्रवासासाठी मध्य रेल्वेने ४ ते ८ डिसेंबर २०२६ दरम्यान १५ अनारक्षित विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईत दादरच्या चैत्यभूमीवर येणाऱ्या लाखो अनुयायांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेने ४ ते ८ डिसेंबर २०२६ या कालावधीत १५ अनारक्षित विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.


नागपूर - मुंबई मार्गावर ९ गाड्या


नागपूर ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान एकूण ८ गाड्या धावणार आहेत. ४ डिसेंबरला सायंकाळी ६.१० आणि रात्री ११.५५ वाजता नागपूरहून दोन गाड्या सुटतील. ५ डिसेंबरला सकाळी ७.४० आणि सायंकाळी ६.१० वाजता आणखी दोन गाड्या असतील. परतीसाठी ६ डिसेंबरला रात्री ८.२५ वाजता, ७ डिसेंबरला सकाळी १०.३० आणि दुपारी १२.३५ वाजता, तर ८ डिसेंबरला मध्यरात्री १२.२५ वाजता मुंबईहून नागपूरला गाड्या सुटतील. या गाड्यांना अजनी, सेवाग्राम, वर्धा, पुलगाव, धामणगाव, बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, भुसावळ, जळगाव, मनमाड, नाशिक रोड, इगतपुरी, कसारा, कल्याण आणि दादर येथे थांबा असेल. याशिवाय ७ डिसेंबरला दादरहून मध्यरात्री १२.४० वाजता नागपूरला एक स्वतंत्र विशेष गाडीही सोडण्यात येणार आहे.






कलबुरगि, अमरावती, कोल्हापूरहूनही गाड्या


कलबुरगि - मुंबई दरम्यान २ गाड्या चालवल्या जातील. ५ डिसेंबरला सायंकाळी ६.३० वाजता कलबुरगिहून गाडी सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी ८.२० वाजता मुंबईत पोहोचेल. परतीची गाडी ७ डिसेंबरला मध्यरात्री १२.२५ वाजता मुंबईहून सुटेल. अमरावती - मुंबई दरम्यानही २ गाड्या असतील. ५ डिसेंबरला सायंकाळी ५.४५ वाजता अमरावतीहून गाडी सुटेल. परतीची गाडी ७ डिसेंबरला मध्यरात्री १२.४० वाजता मुंबईहून सुटणार आहे. कोल्हापूर - मुंबई दरम्यानही २ गाड्या असतील. ५ डिसेंबरला सायंकाळी ४.४० वाजता कोल्हापूरहून गाडी सुटून दुसऱ्या दिवशी पहाटे ४.०५ वाजता मुंबईत पोहोचेल. परतीची गाडी ६ डिसेंबरला रात्री १०.३० वाजता मुंबईहून सुटेल.


तिकीट आणि सुविधा


या सर्व गाड्या अनारक्षित असून १६ ते २२ डब्यांच्या असतील. तिकिटे सामान्य दराने UTS प्रणालीद्वारे बुक करता येतील. सविस्तर वेळापत्रक आणि थांब्यांची माहिती enquiry.indianrail.gov.in या संकेतस्थळावर किंवा NTES अॅपवर उपलब्ध आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे प्रशासनाने योग्य उपाययोजना केल्या आहेत.

Comments
Add Comment

Chandrashekhar Bawankule : राज्यात 9 नवीन अपर तहसीलदार कार्यालये सुरु होणार; नागपूर, गडचिरोलीसह 6 जिल्ह्यांना लाभ

मुंबई : राज्यातील नागरिकांची महसूलविषयक कामांसाठी होणारी धावपळ कमी करण्याच्या उद्देशाने 9 नवीन अपर तहसीलदार

शेतकऱ्यांची एक इंचही जमीन सरकार घेणार नाही; कुळ कायद्याबाबत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण

राज्यातील सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या जमिनी कुळ कायद्यांतर्गत शासनाच्या व्यवस्थापनाखाली जाणार नाहीत. स्वतःची

लोकप्रतिनिधींच्या कामाचा दस्तऐवज समाजासाठी दिशादर्शक ठरेल -उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

विधानपरिषदेतील कामकाज आणि जनतेच्या प्रश्नांसाठी सभागृहात केलेल्या संघर्षाचा लेखाजोखा मांडणाऱ्या डॉ. नीलम

Central Railway special block : मध्य रेल्वेचा विशेष ब्लॉक; कोकण कन्यासह अनेक एक्सप्रेस गाड्या थांबवल्या जाणार, वेळापत्रकातही बदल

मुंबई : पनवेल-कळंबोली कोचिंग कॉम्प्लेक्सच्या (Panvel- Kalmboli Coaching complex) कामातील अडथळे दूर करण्यासाठी आणि पायाभूत

खासदार रामराव वडकुते यांच्या पार्थिवाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतले अंत्यदर्शन; कुटुंबीयांचे केले सांत्वन

महाराष्ट्रातील भाजपचे राज्यसभा खासदार रामराव वडकुटे यांचं रविवारी (२२ नोव्हेंबर) निधन झालं. दिल्लीतील एम्स

Cooperative Sugar Factories Revival Committee : सहकारी साखर कारखान्यांच्या पुनरुज्जीवनासाठी अभ्यास समिती; साखर आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली तयार होणार सर्वसमावेशक मॉडेल

दोन महिन्यांत अहवाल सादर करण्याचे निर्देश मुंबई : आर्थिक अडचणींमुळे राज्यातील सहकारी साखर कारखान्यांची संख्या