
काय म्हणाला कर्णधार शुभमन गिल?
कर्णधार शुभमन गिल म्हणाला की, "सिराज माझा खूप चांगला मित्र आहे आणि त्याला संघातून वगळणे हा एक खूप कठीण निर्णय होता. आम्ही एकत्र खूप क्रिकेट खेळलो आहोत आणि मी त्याला आमच्या सुरुवातीच्या दिवसांपासून ओळखतो. मी कसोटी सामन्यापूर्वी त्याच्याशी बोललो आणि संघाचा निर्णय त्याला समजावून सांगितला, आणि तो समजून गेला. बघा, प्रत्येक खेळाडूच्या कारकिर्दीत एक वेळ अशी येते जेव्हा तो सर्वोत्तम कामगिरी करत नसतो. आम्ही संघाची निवड त्यांच्या सध्याच्या फॉर्मच्या आधारावर केली आहे. सिराज ज्या प्रकारचा खेळाडू आहे, तो आणखी चांगल्या फॉर्ममध्ये पुनरागमन करेल."कसोटी सामन्यात काय घडलं?
नाणेफेकीचा कौल गमावल्याने न्यूझीलंडच्या वाटेला प्रथम फलंदाजी आली. खरं तर 70 धावांवर न्यूझीलंडचा निम्मा संघ तंबूत होता. मात्र हेनरी निकोल्सने नाबाद 175 आणि ग्लेन फिलिप्सने 118 धावा केल्या. या दोघांनी सहाव्या विकेटसाठी 213 धावांची भागीदारी करून संघाला बिकट परिस्थितीतून बाहेर काढले. न्यूझीलंडने पहिल्या डावात 368 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताने आपला पहिला डाव 9 गडी बाद 720 धावांवर घोषित केला होता. तसेच भारताकडे 352 धावांची मजबूत आघाडी होती. केएल राहुलने 136 आणि ऋषभ पंतने 128 धावा केल्या. गिलचे शतक अवघ्या 2 धावांनी हुकलं. यशस्वी जयस्वालने 85, तर देवदत्त पडिक्कलने 80 आणि ध्रुव जुरेलने 78 धावांचे योगदान दिले. दुसऱ्या डावात न्यूझीलंडने कडवी झुंज दिली आणि 5 बाद 239 धावा केल्या. त्यामुळे हा सामना ड्रॉ झाला.
टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम फेरीत अशी पोहोचणार! गणित काय ते समजून घ्या
[caption id="attachment_1078219" align="aligncenter" width="800"] भारत न्यूझीलंड यांच्यातील पहिला कसोटी सामना ड्रॉ झाला. यामुळे टीम इंडियाचं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम फेरी गाठणं कठीण ...





