Ahilyadevi Holkar Loan Waiver: अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेची पहिली यादी जाहीर; जिल्ह्यातील 26 हजार शेतकरी पात्र

अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेंतर्गत एकवेळ समझोता योजनेतील पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत जिल्ह्यातील सर्वाधिक 26 हजार शेतकऱ्यांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे कर्जाच्या ओझ्याखाली असलेल्या पात्र शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.

अहिल्यानगर (प्रतिनिधी): राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत एकवेळ समझोता (ओटीएस ) योजनेतील पात्र शेतकर्‍यांची पहिली यादी 20 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीत राज्यातील एकूण 1 लाख 69 हजार 820 पात्र शेतकर्‍यांचा समावेश करण्यात आला असून, अहिल्यानगर जिल्ह्यातील तब्बल 26 हजार 703 शेतकर्‍यांचा समावेश आहे.






राज्य शासनाने 2 जून 2026 रोजी शासन निर्णयाद्वारे ही योजना सुरू केली आहे. या योजनेमध्ये कर्जमाफी, एकवेळ समझोता (ओटीएस ) आणि प्रोत्साहन असे तीन घटक आहेत. योजनेच्या ओटीएस घटकांतर्गत दोन लाख रुपयांपेक्षा अधिक थकबाकी असलेल्या पात्र शेतकर्‍यांनी दोन लाख रुपयांवरील स्वतःचा हिस्सा संबंधित बँकेत भरल्यानंतर शासनाकडून दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ दिला जाणार आहे. प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीमध्ये शेतकर्‍यांचे नाव, बँकेचे नाव, कर्जखात्याचा तपशील, थकबाकीची रक्कम, शेतकर्‍याने भरावयाची रक्कम आणि शासनाकडून मिळणारा लाभ याची माहिती देण्यात आली आहे. ही यादी संबंधित बँक शाखा, विकास संस्था आणि ग्रामपंचायतीमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे.






पात्र शेतकर्‍यांनी यादीतील आपला तपशील तपासून स्वतःच्या हिश्श्याची रक्कम संबंधित बँकेत जमा करावी. ही रक्कम भरण्यासाठी 31 मार्च 2027 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे. तसेच योजनेचा लाभ मिळण्यासाठी अ‍ॅग्रीस्टॅक नोंदणी आणि आधार प्रमाणीकरण आवश्यक आहे. विशेष म्हणजे, ही केवळ पहिली यादी असून बँकांकडून प्राप्त होणार्‍या माहितीचे संगणकीय संस्करण करून पुढील काळातही पात्र शेतकर्‍यांच्या याद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. या योजनेमुळे आर्थिक अडचणीत असलेल्या पात्र शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

Comments
Add Comment

मनसुख हिरेन हत्या प्रकरणात परमबीर सिंग यांच्यावर कारवाईची मागणी; आज NIA कोर्टात सुनावणी

Mumbai News: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या 'अँटिलिया' निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी सापडल्या प्रकरणी आणि

Archaeological Discovery: आदिमानवांची शिकार करण्याची भन्नाट युक्ती! 1.25 लाख वर्षांपूर्वीच्या विषारी शस्त्रांचे पुरावे

पुरातत्त्वशास्त्र आणि मानवी उत्क्रांतीच्या इतिहासात एक महत्त्वाचा शोध समोर आला आहे. सौदी अरेबियामध्ये

Bhandara Hit And Run Case: भंडाऱ्यात हिट अँड रनचा थरार; भरधाव वाहनाच्या धडकेत सात वर्षीय चिमुकलीचा मृत्यू, वाहनचालक पसार

भंडारा जिल्ह्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील तामसवाडी येथे हिट अँड रनची घटना घडली असून भरधाव

Raigad Road Accident: श्रीवर्धनहून परतताना काळाचा घाला! म्हसळा बायपासवर कारचा भीषण अपघात; दोघांचा मृत्यू, दोघे जखमी

रायगड जिल्ह्यातील म्हसळा येथे रात्री उशिरा भीषण रस्ते अपघाताची घटना घडली. श्रीवर्धन-माणगाव मार्गावरील म्हसळा

Powai Lake : पवई तलावावर 180 मीटर लांबीचा म्युझिकल फाउंटन; महाराष्ट्राचा इतिहास आणि संस्कृती पाहता येणार

मुंबई : मुंबईतील पवई तलावाच्या सौंदर्यात आता अत्याधुनिक म्युझिकल फाउंटनची भर पडली आहे. 180 मीटर लांबीच्या या

World's Best Fried Chicken : जगातील सर्वोत्तम फ्राइड चिकनच्या यादीत ‘चिकन 65’ अव्वल

Food News: भारतीय खाद्यपदार्थांची चव जगभरात लोकप्रिय आहे. आता भारतातील प्रसिद्ध ‘चिकन 65’ या पदार्थाने जगभरातील फ्राइड