Pratap Movie: 'स्वतःची ओळख कधीही गमावू नका'; ईशा देओलचा तरुणांना संदेश

आगामी 'प्रताप' चित्रपटाच्या प्रोमोशन निमित्ताने अभिनेत्री ईशा देओल, अभिनेता अमित साध आणि चित्रपट निर्माते सचिन सराफ यांनी I.I.M.U.N. (India’s International Movement to Unite Nations) या मुंबईतील मुख्यालयात 150 विद्यार्थ्यांशी संवाद साधला. या संवादात कर्म, जबाबदारी, योग्य-अयोग्य निर्णय, पश्चात्ताप आणि स्वतःच्या निवडींचा आयुष्यावर होणारा परिणाम अशा विषयांवर चर्चा करण्यात आली.

मुंबई: आगामी 'प्रताप' चित्रपटाच्या प्रोमोशन निमित्ताने अभिनेत्री ईशा देओल, अभिनेता अमित साध आणि चित्रपट निर्माते सचिन सराफ यांनी I.I.M.U.N. (India’s International Movement to Unite Nations) या मुंबईतील मुख्यालयात 150 विद्यार्थ्यांशी संवाद साधला. या संवादात कर्म, जबाबदारी, योग्य-अयोग्य निर्णय, पश्चात्ताप आणि स्वतःच्या निवडींचा आयुष्यावर होणारा परिणाम अशा विषयांवर चर्चा करण्यात आली.


I.I.M.U.N. च्या पुढाकाराने आयोजित या कार्यक्रमाचा उद्देश चित्रपटाच्या टीमला तरुण पिढीशी जोडणे आणि सिनेमा, कथाकथन तसेच वैयक्तिक विचार व निवडी यावर खुला संवाद घडवून आणणे. 'प्रताप' या चित्रपटाच्या कथेमागील विचार, चित्रपट बनवण्याचा प्रवास आणि त्यातील विषय आजच्या तरुणांच्या आयुष्याशी कसे जोडले जातात, यावर कलाकारांनी विद्यार्थ्यांशी मनमोकळेपणाने चर्चा केली.






'प्रताप'मधून कर्म आणि जबाबदारीचा संदेश


'प्रताप' हा केवळ मनोरंजनासाठी तयार केलेला चित्रपट नसून तो कर्म, उत्तरदायित्व, योग्य-अयोग्य आणि पश्चात्तापातून मुक्त होण्याच्या शक्यतेवर प्रश्न उपस्थित करणारा चित्रपट असल्याचे टीमने सांगितले. तसेच आपल्या निर्णयांचा इतरांच्या आयुष्यावर काय परिणाम होतो, हे आपल्याला या चित्रपटातून पाहायला मिळणार आहे.


चित्रपट निर्मितीच्या प्रवासाबद्दल बोलताना कलाकारांनी आपल्या आयुष्याला आकार देणारी मूल्ये, अनुभव आणि माणसांचे योगदान यावर विचार मांडले. अमित साध यांनी आपल्या संगोपनात आई-वडील आणि शिक्षकांनी रुजवलेल्या तत्त्वांचा आजही त्यांच्या आयुष्यावर प्रभाव असल्याचे सांगितले. तसेच आपल्या प्रवासात मदत करणाऱ्या व्यक्तींचे योगदान ओळखणे आणि त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे किती महत्त्वाचे आहे, यावरही त्यांनी भाष्य केले.



ईशा देओल टीका आणि तुलनांचा सामना करतानाचा अनुभव


ईशा देओल यांनी करिअरच्या सुरुवातीच्या काळात त्यांच्यावर होणारी टीका आणि इतरांशी होणाऱ्या तुलनांना सामोरे जाताना आलेले अनुभव विद्यार्थ्यांसोबत शेअर केले. त्यांच्या आईने दिलेल्या सल्ल्यामुळे स्वतःवर आणि स्वतःच्या निर्णयांवर विश्वास ठेवण्यास कशी मदत झाली, याची आठवण त्यांनी यावेळी केली. महिलांनी आयुष्यात अनेक भूमिका निभावताना स्वतःची ओळख, स्वप्ने, आकांक्षा आणि स्वातंत्र्य जपणे महत्त्वाचे असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.



सोशल मीडिया आणि सिनेमातील फरकावर चर्चा


आजच्या Gen Z पिढीशी संवाद साधताना, डिजिटल कंटेंट पाहताना विवेक बाळगणे, स्वतःचे वेगळेपण जपणे आणि आपल्या विचारांवर प्रभाव टाकणाऱ्या गोष्टींबद्दल सजग राहणे यावर कलाकारांनी भर दिला. सोशल मीडियावरील छोट्या व्हिडिओंच्या तुलनेत सिनेमा अधिक सखोल आणि गुंतवून ठेवणारा अनुभव देतो, यावरही चर्चा झाली.


ईशा देओल म्हणाल्या, "मला वाटतं सिनेमा म्हणजे एखाद्या ग्रंथालयासारखा आहे, तर सोशल मीडिया फक्त 20 सेकंदांची एक क्लिप दाखवतो. मला सोशल मीडिया आवडतो, पण सिनेमाचा अनुभव काही वेगळाच असतो." स्वतःची ओळख जपण्याबद्दल त्या पुढे म्हणाल्या, "एक स्त्री म्हणून आपली ओळख कधीही गमावू नका. तुमच्यातील ते 'स्व' नेहमी जिवंत ठेवा."

Comments
Add Comment

महाराष्ट्रात आंतरराष्ट्रीय चित्रपट सहनिर्मितीसाठी स्वतंत्र यंत्रणा; कमी बजेटच्या सिनेमांसाठीही नवा प्लॅन

गोवा: गोवा येथे 57 वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव सुरु आहे. या चित्रपट महोत्सवात अनेक कार्यक्रमांची

Avinash Mishra-Eisha Singh: 'पुरावे सार्वजनिक करण्याची वेळ आणू नका'; ईशा सिंहचा सोशल मीडियावरून इशारा

Avinash Mishra-Eisha Singh: टीव्ही अभिनेत्री अभिनेत्री ईशा सिंह आणि खतरो के खिलाडी विजेता अविनाश मिश्रा यांच्या नात्यात दुरावा

OTT Releases This Week : नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात OTT वर मनोरंजनाचा धमाका ! 'दृश्यम 3' सह 7 चित्रपट-सिरीज होणार रिलीज

नोव्हेंबर २०२६ चा शेवटचा आठवडा मनोरंजनप्रेमींसाठी खास ठरणार आहे. कारण या आठवड्यात ओटीटीवर अनेक बहुप्रतीक्षित

Miley Cyrus Maxx Morando marriage : पॉप स्टार मायली सायरस आणि संगीतकार मॅक्स मोरांडो अडकले विवाहबंधनात; लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल

पाच वर्षांच्या रिलेशनशिपनंतर कॅलिफोर्नियात पार पडला खाजगी विवाह सोहळा वॉशिंग्टन : प्रसिद्ध हॉलिवूड पॉप गायिका

Rakesh Bedi: 'एक दुजे के लिए'च्या यशाची आठवण; राकेश बेदी म्हणाले, 'धुरंधर'पेक्षा मोठा हिट होता

Rakesh Bedi: बॉलिवूड अभिनेता राकेश बेदी यांचा 'धुरंधर' आणि 'धुरंधर द रिव्हेंज'मधील जमील जमाली ही भूमिका प्रेक्षकांना खूप

Manoj Bajpayee on Dhurandhar : मनोज बाजपेयींचं बॉलिवूडला समर्थन; 'धुरंधर'सह अनेक चित्रपटांवर चर्चा

Manoj Bajpayee on Dhurandhar : प्रसिद्ध अभिनेते मनोज बाजपेयी यांचे 'धुरंधर' या चित्रपटावरील वक्तव्य साध्य मोठ्या प्रमाणावर