Manoj Bajpayee on Dhurandhar : मनोज बाजपेयींचं बॉलिवूडला समर्थन; 'धुरंधर'सह अनेक चित्रपटांवर चर्चा

प्रसिद्ध अभिनेते मनोज बाजपेयी यांचे 'धुरंधर' या चित्रपटावरील वक्तव्य साध्य मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. मनोज बाजपेयी यांनी अलीकडेच एका कार्यक्रमात देशात द्वेष पसरवणाऱ्या बॉलिवूड चित्रपटांवर भाष्य केले. त्यांनी रणवीर सिंगच्या 'धुरंधर' चित्रपटावर ही आपले मत व्यक्त केले आहे, ज्यामुळे सोशल मीडियावर एक चर्चा सुरू झाली आहे.

Manoj Bajpayee on Dhurandhar : प्रसिद्ध अभिनेते मनोज बाजपेयी यांचे 'धुरंधर' या चित्रपटावरील वक्तव्य साध्य मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. मनोज बाजपेयी यांनी अलीकडेच एका कार्यक्रमात देशात द्वेष पसरवणाऱ्या बॉलिवूड चित्रपटांवर भाष्य केले. त्यांनी रणवीर सिंगच्या 'धुरंधर' चित्रपटावर ही आपले मत व्यक्त केले आहे, ज्यामुळे सोशल मीडियावर एक चर्चा सुरू झाली आहे.


मनोज बाजपेयी यांनी नुकतेच बॉलिवूड इंडस्ट्रीच्या मौन धोरणावर आणि देशात पसरत असलेल्या द्वेषाच्या कथित प्रकारावर भाष्य केले. त्यांच्या या मनमोकळ्या संभाषणामुळे सोशल मीडियावर एक चर्चा सुरू झाली असून अनेक संमिश्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहे. यामध्ये आदित्य धरच्या 3000 कोटींची कमाई करणाऱ्या 'धुरंधर' या चित्रपटाचा समावेश होता, ज्यावर मनोज बाजपेयी यांनी टिप्पणी केली होती. त्यांनी 'धुरंधर'ला एक प्रचारकी चित्रपट म्हटले आहे, असे काही यूजर्सचे म्हणणे आहे.





मनोज बाजपेयी धुरंधरबद्दल काय म्हणाले ?


'धुरंधर' हा चित्रपट एक प्रचारकी चित्रपट असल्याचा दावा करत, त्यावरून बऱ्याच काळापासून वाद सुरू आहे. मात्र, अनेकांनी त्याचे समर्थन केले आहे. 'धुरंधर' हा चित्रपट प्रदर्शित होऊन जवळपास एक वर्ष झाला आहे, पण हा वाद अजूनही सुरूच आहे. नुकताच त्यांनी एका मीडियाला दिलेल्या मुलाखतीत मनोज बाजपेयी यांनी द्वेष पसरवल्याचा आरोप असलेल्या बॉलिवूड चित्रपटांवर भाष्य केले आहे.


सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये, मनोज बाजपेयी प्रचारकी चित्रपटांवर चर्चा करत असताना निवेदकाने 'धुरंधर', 'काश्मीर फाईल्स' आणि 'केरळा फाईल्स' यांसारख्या चित्रपटांचा उल्लेख केला. यावर मनोज बाजपेयी म्हणाले, "तुम्ही किती चित्रपटांना आक्षेप घेता, हे बोटांवर मोजता येणार नाही."


त्यानंतर त्यांनी बॉलीवूड मधील चित्रपटांच्या जुन्या सूत्रावर आपले मत व्यक्त केले. त्यांनी सांगितले की, हिंदी चित्रपटसृष्टीने फार पूर्वीपासून मुलगा-मुलगी प्रेमकथा आणि वाईटावर चांगल्याचा विजय दर्शवणाऱ्या चित्रपटांचे सूत्र पाळले आहे. प्रेक्षक वर्षानुवर्षे असे चित्रपट पाहत आले आहेत. असे चित्रपट अधूनमधून प्रदर्शित होतात आणि हळूहळू आपल्या परंपरेचा भाग बनत चालले आहेत.





त्याच संभाषणात मनोज बाजपेयी यांनी बॉलिवूडच्या मौनावरही आपली प्रतिक्रिया दिली आहे. अनेक राष्ट्रीय मुद्द्यांवर बॉलिवूड तारे गप्प राहतात, असे का? असा प्रश्न लोक विचारतात यावर उत्तर देताना मनोज यांनी, जे सेलिब्रिटी मुद्द्यांवर बोलत नाहीत, केवळ त्यांनाच लोक लक्ष्य करत आहेत. काहींनी तर आपली मते आधीच व्यक्त केली असली तरी, त्यांच्या मतांकडे दुर्लक्ष केले जात आहे. राष्ट्रीय मुद्द्यांवर सातत्याने उघडपणे बोलणाऱ्या अभिनेत्री रिचा चड्ढाचे उदाहरण त्यांनी यावेळी दिले.






तसेच मनोज बाजपेयी यांच्यासमोर अमिताभ बच्चन यांचा उल्लेख केला तेव्हा त्यांनी प्रश्न विचारला की लोक फक्त त्यांच्याच मागे का लागले आहेत. आपले मत स्पष्टपणे मांडणाऱ्या एका कलाकाराचा आवाज का ऐकला जात नाही? प्रत्येकजण स्वतःच्या आणि आपल्या कुटुंबाच्या फायद्या-तोट्याचाच विचार करतो. ते म्हणाले की, प्रत्येकाचा स्वतःचा दृष्टिकोन असतो, असे म्हणत मनोज बाजपेयी यांनी बॉलिवूडला उघडपणे पाठिंबा दिला आहे.

Comments
Add Comment

Malvika Gaekwad: 'मुळशी पॅटर्न' फेम अभिनेत्री मालविका गायकवाड देणार गुडन्यूज; पतीसोबत शेअर केले प्रेग्नन्सीचे खास फोटो!

[caption id="attachment_1078084" align="alignnone" width="800"] 1. सोशल मीडियावर शेअर केली गुडन्यूजमालविका सोशल मीडियावर सक्रिय असते. नुकतेच तिने पती

Orry Viral Photo: ऑरीच्या सिग्नेचर पोझवरून नवा वाद; अनन्या पांडेसोबतचा फोटो व्हायरल

Orry Viral Photo: ओरहान अवत्रामणी (ऑरी) सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतो. त्याच्या पोस्ट्स आणि त्याची शैली सोशल मीडियावर

Sapna Choudhary Divorce: सहा वर्षांच्या संसारात दुरावा! सपना चौधरी पती वीर साहूपासून घेणार घटस्फोट

हरियाणवी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय नाव असलेली गायिका आणि डान्सर सपना चौधरी सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे

Kaun Banega Crorepati : स्वप्न सत्यात उतरलं! KBC च्या मंचावर भूषण ठाकरे ठरला या सीजनचा पहिला करोडपती

मुंबई :  जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर एखादी व्यक्ती किती मोठे यश मिळवू शकते, याचे उदाहरण जळगावच्या 28 वर्षीय

महागुरु सचिन पिळगावकरांना मानद डॉक्टरेट! ग्वाल्हेरच्या ITM विद्यापीठाकडून गौरव

Sachin Pilgaonkar Doctorate University: मराठी चित्रपटसृष्टीतील महागुरुंचा ग्वालेरमध्ये डॉक्टर ऑफ लिट्रेचर पदवीने गौरव करण्यात आला आहे.

Nitesh Rane : ‘सिरीयल किलर’ नाटकाच्या 100 व्या प्रयोगाला मंत्री नितेश राणे यांची खास उपस्थिती; टीमचे केले कौतुक

मुंबई : मराठी रंगभूमीवरील ‘सिरीयल किलर’ या नाटकाने 100 प्रयोगांचा महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. मुंबईतील दादर