Mumbai Crime News: पोलिसांच्या नव्या व्हॅनचा पहिलाच दणका; महालक्ष्मी रेसकोर्सवरील कॉन्सर्टमध्ये 12 जणांची ड्रग्ज चाचणी पॉझिटिव्ह

यापैकी 12 जणांची प्राथमिक चाचणी पॉझिटिव्ह आल्याची माहिती समोर आली आहे.

मुंबई : मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्स येथे आयोजित लाईव्ह कॉन्सर्टमध्ये अमली पदार्थांचे सेवन केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांच्या अँटी नार्कोटिक्स सेलने विशेष कारवाई केली. अत्याधुनिक अँटी नार्कोटिक्स व्हॅनच्या माध्यमातून कॉन्सर्टमध्ये उपस्थित असलेल्या 55 जणांची तपासणी करण्यात आली. यापैकी 12 जणांची प्राथमिक चाचणी पॉझिटिव्ह आल्याची माहिती समोर आली आहे.






12 जणांना वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात दाखल


प्राथमिक चाचणीत पॉझिटिव्ह आढळलेल्या 12 जणांना पुढील कारवाईसाठी ताडदेव पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी त्यांना जवळच्या रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी दाखल केले. वैद्यकीय चाचणी आणि अहवाल आल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.





नव्या अँटी नार्कोटिक्स व्हॅनचा पहिल्यांदाच वापर


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या अत्याधुनिक अँटी नार्कोटिक्स व्हॅनचा प्रत्यक्ष कारवाईसाठी पहिल्यांदाच वापर करण्यात आला. उद्घाटनानंतर दुसऱ्याच दिवशी या व्हॅनच्या मदतीने महालक्ष्मी रेसकोर्समधील कॉन्सर्टमध्ये तपासणी करण्यात आली.


या व्हॅनच्या माध्यमातून मोठे सार्वजनिक कार्यक्रम, लाईव्ह कॉन्सर्ट आणि गर्दीच्या ठिकाणी अमली पदार्थांच्या सेवनावर लक्ष ठेवणे पोलिसांना शक्य होणार आहे. अशा कार्यक्रमांमध्ये संशयितांची तातडीने तपासणी करण्यासाठी या सुविधेचा उपयोग होईल.



गोरेगावमधील कॉन्सर्टमध्ये दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू


काही महिन्यांपूर्वी गोरेगावमधील एका लाईव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये अमली पदार्थांच्या अतिसेवनामुळे दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. 11 एप्रिल रोजी आयोजित या कार्यक्रमाला सुमारे 3 ते 4 हजार लोक उपस्थित होते, अशी माहिती समोर आली होती. या कार्यक्रमादरम्यान काही तरुणांची प्रकृती बिघडली होती. त्यापैकी दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला, तर एका तरुणीला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.


या घटनेनंतर मोठ्या कार्यक्रमांमधील अमली पदार्थांच्या वापराचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला होता. महालक्ष्मी रेसकोर्समधील ताज्या कारवाईनंतर अशा कार्यक्रमांवर पोलिसांकडून अधिक लक्ष ठेवले जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.


Comments
Add Comment

Nirmala Sitharaman : देशातील सुमारे ५० कोटी नागरिक गरिबीतून बाहेर; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडली गरिबी निर्मूलनाच्या पुढील टप्प्याची दिशा

नवी दिल्ली : भारताने गरिबी निर्मूलनाच्या क्षेत्रात मिळवलेले यश टिकवून ठेवण्यासाठी आता आर्थिक सेवा, बाजारपेठ आणि

भारताची मोठी झेप ! स्वदेशी 'JWALA MK-1' अँटी-ड्रोन मिसाईल सिस्टमची यशस्वी चाचणी

भारताने संरक्षण क्षेत्रात आणखी एक महत्त्वाची कामगिरी केली आहे. शत्रूच्या ड्रोन हल्ल्यांना प्रत्युत्तर

Chandrashekhar Bawankule : पडीक जमीन ताब्यात घेण्याचा नियम जमीन मालक शेतकऱ्यांना लागू नाही !

मुंबई : तीन वर्षे जमीन पडीक ठेवल्यास ती शासनाच्या व्यवस्थापनाखाली येऊ शकते, या विधानावरून निर्माण झालेल्या

Dhruv Rathee : युट्यूबर ध्रुव राठीच्या अडचणी वाढल्या; 2018 च्या मानहानी प्रकरणात अजामीनपात्र वॉरंट जारी

दिल्ली  : युट्यूबर ध्रुव राठीच्या अडचणी वाढल्या आहेत. दिल्लीतील साकेत न्यायालयाने 2018 मधील मानहानीच्या प्रकरणात

Avinash Mishra-Eisha Singh: 'पुरावे सार्वजनिक करण्याची वेळ आणू नका'; ईशा सिंहचा सोशल मीडियावरून इशारा

Avinash Mishra-Eisha Singh: टीव्ही अभिनेत्री अभिनेत्री ईशा सिंह आणि खतरो के खिलाडी विजेता अविनाश मिश्रा यांच्या नात्यात दुरावा

India Nepal MoU: भारत-नेपाळमध्ये 8 सामंजस्य करारांवर स्वाक्षरी; अंतराळ, आरोग्य ते सुशासन क्षेत्रात सहकार्य

सोमवारी (२३ नोव्हेंबर) नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे नेपाळचे पंतप्रधान बालेंद्र शाह यांच्यात