दिल्ली : युट्यूबर ध्रुव राठीच्या अडचणी वाढल्या आहेत. दिल्लीतील साकेत न्यायालयाने 2018 मधील मानहानीच्या प्रकरणात त्याच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. तक्रारदार विकास संकृत्यायन यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या तक्रारीवर सुनावणी करताना न्यायालयाने हा आदेश दिला. या प्रकरणाची पुढील सुनावणी 3 डिसेंबर रोजी होणार आहे.
OTT Releases This Week : नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात OTT वर मनोरंजनाचा धमाका ! 'दृश्यम 3' सह 7 चित्रपट-सिरीज होणार रिलीज
नोव्हेंबर २०२६ चा शेवटचा आठवडा मनोरंजनप्रेमींसाठी खास ठरणार आहे. कारण या आठवड्यात ओटीटीवर अनेक बहुप्रतीक्षित चित्रपट आणि वेब सीरिज रिलीज होणार आहेत. ...
‘भाजप आयटी सेल भाग 2’ व्हिडिओवरून वाद
तक्रारदार विकास संकृत्यायन यांच्या आरोपानुसार, ध्रुव राठीने ‘भाजप आयटी सेल भाग 2’ नावाचा व्हिडिओ प्रसिद्ध केला होता. या व्हिडिओमध्ये आपल्याविषयी खोटे आणि बदनामीकारक दावे करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. याच प्रकरणी त्यांनी ध्रुव राठीविरोधात मानहानीची तक्रार दाखल केली होती.
न्यायालयाने यापूर्वी बजावले होते जामीनपात्र वॉरंट
या प्रकरणात न्यायालयाने यापूर्वी ध्रुव राठीला समन्स बजावले होते. त्यानंतर ऑक्टोबरमध्ये त्याच्याविरोधात जामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले होते. मात्र, नोटीस बजावण्यासाठी संबंधित ठिकाणी गेलेल्या कर्मचाऱ्यांना निवासस्थान बंद असल्याचे आढळल्याची माहिती न्यायालयासमोर मांडण्यात आली.
त्यानंतर 23 नोव्हेंबर रोजी साकेत न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट जारी केले. मुख्य न्यायाधीश रजेवर असल्याने कर्तव्यावरील दंडाधिकाऱ्यांसमोर या प्रकरणाची सुनावणी झाली.
3 डिसेंबरला पुढील सुनावणी
तक्रारदार विकास संकृत्यायन हे ‘आय सपोर्ट नरेंद्र मोदी’ नावाचे पेज चालवतात. ध्रुव राठीने आपल्या व्हिडिओमधून आपली बदनामी केल्याचा त्यांचा आरोप आहे. या प्रकरणात न्यायालयाने यापूर्वीही ध्रुव राठीला न्यायालयात उपस्थित राहण्यासंदर्भात आदेश दिले होते.
आता अजामीनपात्र वॉरंट जारी झाल्यानंतर या प्रकरणातील पुढील कायदेशीर घडामोडींकडे लक्ष लागले आहे. 3 डिसेंबर रोजी होणाऱ्या सुनावणीत न्यायालय काय भूमिका घेते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.