Sunetra Pawar : अजित दादांचे पिंपरी-चिंचवडच्या विकासाचे स्वप्न पूर्ण करणार- उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

शहराच्या विकासाच्या प्रत्येक टप्प्यावर आणि अडचणीच्या वेळी महापालिका प्रशासनाच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहीन, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिली.

पिंपरी चिंचवड : पिंपरी-चिंचवडला पुन्हा देशातील अग्रगण्य आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम महापालिका बनवण्यासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी एकत्रितपणे काम करावे. अजित पवार यांनी या शहराच्या विकासासाठी पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी सर्वांची आहे. शहराच्या विकासाच्या प्रत्येक टप्प्यावर आणि अडचणीच्या वेळी महापालिका प्रशासनाच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहीन, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिली. (Sunetra Pawar)






पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील सुरू असलेल्या विकासकामांचा आढावा आणि भविष्यातील गरजांचे नियोजन करण्यासाठी त्यांनी सोमवारी महापालिका प्रशासनासोबत बैठक घेतली. यावेळी शहरातील विविध प्रश्नांवर चर्चा करून विकासकामांना गती देण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.



अजितदादांचे स्वप्न पूर्ण करण्याचा निर्धार


अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवडच्या विकासासाठी मोठे योगदान दिले. शहराला सुंदर, नियोजनबद्ध आणि विकसित बनवण्याचे स्वप्न त्यांनी पाहिले होते. त्यासाठी त्यांनी वेळ, मेहनत आणि निष्ठेने काम केले. शहराच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या बाबींना त्यांनी नेहमी निधी उपलब्ध करून दिला, असे सुनेत्रा पवार म्हणाल्या.


पालकमंत्री म्हणून आपलेही या शहरावर प्रेम असून, महायुती सरकार पिंपरी-चिंचवडच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सुरू असलेली सर्व विकासकामे दर्जेदार आणि ठरलेल्या वेळेत पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.



मोशी कचरा प्रक्रिया प्रकल्पाचे काम तातडीने पूर्ण करा


मोशी येथील कचरा दुर्घटना अत्यंत वेदनादायी होती. भविष्यात अशा घटना घडू नयेत, यासाठी प्रशासनाने खबरदारी घ्यावी, असे सुनेत्रा पवार यांनी सांगितले. दुर्घटनेनंतर मोशी येथे कचरा नेणे थांबवण्यात आले आहे. त्यामुळे शहरात निर्माण होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट कशी लावली जात आहे, याची माहिती त्यांनी अधिकाऱ्यांकडून घेतली.


मोशी येथे उभारण्यात येत असलेल्या कचरा प्रक्रिया प्रकल्पाची स्वतः पाहणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रकल्पाचे काम कोणत्या टप्प्यावर आहे, याचा आढावा घेऊन ते तातडीने पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी प्रशासनाला दिल्या.



दुष्काळामुळे स्थलांतरित होणाऱ्या नागरिकांसाठी नियोजन


राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे रोजगार आणि इतर कारणांसाठी नागरिक पिंपरी-चिंचवडमध्ये स्थलांतरित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शहरावर अचानक वाढणारा लोकसंख्येचा भार लक्षात घेऊन पाणीपुरवठा, निवारा, आरोग्य आणि स्वच्छता यांसारख्या मूलभूत सुविधांचे आतापासूनच नियोजन करण्याचे निर्देश सुनेत्रा पवार यांनी दिले.



नदी पुनरुज्जीवन आणि औद्योगिक विकासावर भर


पवना आणि इंद्रायणी नद्यांवरील अतिक्रमणे रोखण्यासाठी तसेच नदी पुनरुज्जीवनाच्या कामांना गती देण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यास त्यांनी सांगितले. पिंपरी-चिंचवडच्या औद्योगिक क्षेत्रात अधिकाधिक गुंतवणूक यावी, यासाठी पोषक वातावरण निर्माण करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. औद्योगिक परिसरातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या सूचनाही प्रशासनाला देण्यात आल्या.


दरम्यान, नाशिक फाटा ते एलिव्हेटेड कॉरिडॉरचे काम पूर्णत्वाकडे असून, लवकरच त्याचे उद्घाटन करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. राज्य शासनाकडे प्रलंबित असलेल्या शहराच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत स्वतंत्र बैठक घेण्यात येईल, असेही सुनेत्रा पवार यांनी स्पष्ट केले.


Comments
Add Comment

Nashik Kumbhmela : पाच विश्रामगृहांचे नूतनीकरण, तर एका विश्रामगृहाची नव्याने उभारणी ; कुंभमेळ्यासाठी विश्रामगृहांना 23 कोटी

Nashik Kumbhmela : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये विकासकामे वेगाने सुरु आहेत. विकासकामांसोबतच

Pratap Movie: 'स्वतःची ओळख कधीही गमावू नका'; ईशा देओलचा तरुणांना संदेश

मुंबई: आगामी 'प्रताप' चित्रपटाच्या प्रोमोशन निमित्ताने अभिनेत्री ईशा देओल, अभिनेता अमित साध आणि चित्रपट

पहिल्या कसोटी सामन्यातून मोहम्मद सिराजला वगळल्याने क्रीडाप्रेमींचा संताप, अखेर कर्णधार शुभमन गिलने मौन सोडलं

न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातील प्लेइंग 11 मधून मोहम्मद सिराजला वगळण्याचा निर्णय घेतला.

अमृता खानविलकरच्या 'अमूल्य'ची बॉलिवूडमध्ये चर्चा; माधुरी, श्रद्धाही मराठमोळ्या साजात!

[caption id="attachment_1078242" align="alignnone" width="800"] बॉलिवूडच्या तारकांनाही मराठमोळ्या साजाची भुरळ; अमृताच्या नऊवारी साड्यांची चर्चा

Cooperative Sugar Factories Revival Committee : सहकारी साखर कारखान्यांच्या पुनरुज्जीवनासाठी अभ्यास समिती; साखर आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली तयार होणार सर्वसमावेशक मॉडेल

दोन महिन्यांत अहवाल सादर करण्याचे निर्देश मुंबई : आर्थिक अडचणींमुळे राज्यातील सहकारी साखर कारखान्यांची संख्या

Political News: डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या ‘विधानपरिषद कामकाज : माझा सहभाग’ पुस्तकाचा चौथा खंड प्रकाशित

मुंबई : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या माजी उपसभापती आणि आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या ‘विधानपरिषद कामकाज : माझा