आयसीसीने का घातली होती बंदी?
कोरोना काळात क्रिकेट खेळताना बरीच बंधनं लादली गेली होती. कालांतराने कोरोनाचा जोर ओसरला आणि बंधनं शिथिल होत गेली. कोरोना काळात आयसीसीने चेंडूला शाईन करण्यासाठी लाळेचा वापर करण्यास बंदी घातली होती. मात्र ही बंदी कोरोना ओसरल्यानंतरही कामय ठेवण्यात आली. मेरीलेबोन क्रिकेट क्लबच्या नियमानुसार, चेंडूची स्थिती बदलण्याच्या इतर कोणत्याही अयोग्य साधनांप्रमाणेच लाळ एक आहे. लाळ ही मिठाई, च्युइंग गम आणि मिंट्स यांसारख्या पदार्थांसोबत मिसळल्यास चेंडूची स्थिती लक्षणीयरीत्या बदलू शकते. त्यामुळे लाळेच्या वापराचे निरीक्षण करणे आणि नियमन करणे खूप कठीण होते.
वेलिंग्टन कसोटीत ड्रॉ? अश्विनचा संताप शिगेला! शुभमन गिलच्या निर्णयावर थेट हल्ला, कोहलीची आठवण काढत म्हणाला...
India vs New Zealand : वेलिंग्टनमध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या 5 व्या दिवशी भारताने अनपेक्षितपणे ड्रॉवर समाधान मानल्यानंतर माजी फिरकीपटू ...
लाळ खेळाडूंसाठी धोकादायक
आयसीसीच्या मते, लाळेच्या वापरामुळे खेळाडू, पंच आणि सामन्यात निगडीत असलेल्यांना धोका होऊ शकतो. युरोपियन सेंटर फॉर डिसीज प्रिव्हेंशन अँड कंट्रोलनुसार, नव्याने उदयास येणारे SARS-CoV-2 चे प्रकार आरोग्यासाठी घातक आहे. लाळेच्या माध्यमातून त्याचा प्रसार होऊ शकतो.
लाळेमुळे काय होतं?
- गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक चेंडूच्या फक्त एकाच बाजूला लाळ लावून पँटवर घासतात. यामुळे चेंडूची ती बाजू गुळगुळीत आणि चमकदार राहते, तर दुसरी बाजू खेळपट्टीवर आदळून खडबडीत होते.
- चेंडूची एक बाजू गुळगुळीत आणि दुसरी बाजू खडबडीत झाल्यामुळे चेंडू हवेतून जाताना दोन्ही बाजूंना हवेचा दाब वेगवेगळा असतो. या फरकामुळे चेंडू स्विंग होतो आणि फलंदाजाला चकवा देणे सोपे जाते.
- लाळ ही घामापेक्षा थोडी जड आणि चिकट असते . चेंडूच्या एका बाजूला सतत लाळ लावल्यामुळे ती बाजू दुसऱ्या बाजूच्या तुलनेत जड होते. चेंडू जुना झाल्यावर या वजनाच्या आणि पृष्ठभागाच्या फरकामुळे वेगवान गोलंदाजांना चेंडू उलट दिशेने वळवता म्हणजेच 'रिव्हर्स स्विंग' करता येतो.
- थंड वातावरणात खेळाडूंना पुरेसा घाम येत नाही. तसेच, चेंडू घाम जास्त शोषून घेतो, ज्यामुळे चेंडू मऊ पडतो आणि त्याची उसळी कमी होते. याउलट, लाळ चेंडूला मऊ न करता आवश्यक ओलावा आणि जडपणा देते.