IND vs NZ, 2nd Test: टीम इंडियाचा विजय सोपा होणार? न्यूझीलंडचा घातक गोलंदाज दुखापतीमुळे बाहेर

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात दुसरा कसोटी सामना क्राईस्टचर्च येथे होणार आहे. या मालिकेचा निकाल या सामन्याच्या निकालावर लागणार आहे. असं असताना या सामन्यापूर्वी न्यूझीलंडला धक्का बसला आहे.

भारत न्यूझीलंड यांच्यातील पहिला कसोटी सामना ड्रॉ झाल्यानंतर दुसऱ्या सामन्याकडे क्रीडाप्रेमींच्या नजरा लागल्या आहे. दुसरा कसोटी सामना क्राईस्टचर्च येथे होणार असून मालिकेचा निकाल या सामन्यावर अवलंबून आहे. पहिला सामना ड्रॉ झाल्याने दोन सामन्यातील मालिका आता 0-0 ने बरोबरीत आहे. त्यामुळे आता मालिका कोण जिंकणार? याची उत्सुकता आहे. तसेच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने करो या मरोची लढाई टीम इंडियासाठी आहे. अशा स्थितीत टीम इंडियासाठी एक आनंदाची बातमी आहे. न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ब्लेअर टिकनर हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे भारता विरुद्धच्या दुसऱ्या महत्त्वाच्या कसोटी सामन्यातून बाहेर पडला आहे. टिकनरच्या हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे न्यूझीलंडच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. वेलिंग्टनमध्ये सराव करताना टिकनरच्या उजव्या हॅमस्ट्रिंगला दुखापत झाली. त्यामुळे क्राइस्टचर्चमधील हॅगली ओव्हल येथे सुरू होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळू शकणार नाही.

मॅट फिशरला मिळाली संधी


न्यूझीलंडचा महत्त्वाचा अष्टपैलू क्रिकेटपटू आणि मर्यादित षटकांच्या फॉरमॅटचा कर्णधार मिचेल सँटनर आधीच दुखापतीमुळे संघाबाहेर आहे. आता सहा कसोटी सामन्यांत 22 बळी मिळवणारा टिकनरही क्राइस्टचर्च कसोटीतून बाहेर पडल्यामुळे, भारताच्या तगड्या फलंदाजीचा सामना करण्यासाठी न्यूझीलंडकडे अनुभवी वेगवान गोलंदाजांची कमतरता जाणवणार आहे. ब्लेअर टिकनरच्या जागी वेगवान गोलंदाज मॅट फिशरचा 14 सदस्यीय कसोटी संघात समावेश करण्यात आला आहे. भारताविरुद्धच्या वनडे मालिकेत फिशरने प्रभावी कामगिरी केली होती. त्याने तीन सामन्यांत 13.66 च्या सरासरीने सहा बळी घेतले होते, ज्यामध्ये 31 धावा देत 3 विकेट ही त्याची सर्वोत्तम कामगिरी होती. फिशरला क्राइस्टचर्चमध्ये आपल्या कारकिर्दीतील दुसरी कसोटी खेळण्याची संधी मिळू शकते.





वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेत काय स्थिती?


वेलिंग्टन कसोटी अनिर्णित राहिल्यामुळे न्यूझीलंडला जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेतून दुसऱ्या स्थानावरून खाली यावे लागले आहे. आता क्राइस्टचर्चमध्ये सकारात्मक निकाल मिळवून पुन्हा एकदा आपल्या प्रतिस्पर्ध्याच्या पुढे जाण्याचा प्रयत्न न्यूझीलंड संघ करेल. भारत सध्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेत 50 टक्के गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. भारताला उर्वरित सहा कसोटी सामन्यात दमदार कामगिरी करण्याची गरज आहे. यापैकी पाच सामने पुढील वर्षी जानेवारीपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतात खेळले जाणार आहेत.
Comments
Add Comment

India vs UAE Live Streaming: आशिया कप रायझिंग स्टार्ग स्पर्धेत भारत युएई सामना, कधी आणि कुठे पाहाल? जाणून घ्या

आशिया कप रायझिंग स्टार्स 2026 स्पर्धेतील साखळी फेरीचे सामने आता रंजक वळणावर आले आहे. गट अ मधून श्रीलंका आणि

ऐतिहासिक विजय! अलेक्झांडर झ्वेरेव्हला धूळ चारत कार्लोस अल्काराजने पटकावले पहिले एटीपी फायनल्स विजेतेपद

[caption id="attachment_1078268" align="aligncenter" width="800"] स्पॅनिश टेनिस स्टार कार्लोस अल्कारजने पहिल्यांदाच एटीपी फायनल्सचे विजेतेपद पटकावले

पहिल्या कसोटी सामन्यातून मोहम्मद सिराजला वगळल्याने क्रीडाप्रेमींचा संताप, अखेर कर्णधार शुभमन गिलने मौन सोडलं

न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातील प्लेइंग 11 मधून मोहम्मद सिराजला वगळण्याचा निर्णय घेतला.

टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम फेरीत अशी पोहोचणार! गणित काय ते समजून घ्या

[caption id="attachment_1078219" align="aligncenter" width="800"] भारत न्यूझीलंड यांच्यातील पहिला कसोटी सामना ड्रॉ झाला. यामुळे टीम इंडियाचं वर्ल्ड

IND vs NZ: वेलिंग्टन कसोटीत टीम इंडियाचं विजयाचं गणित कसं चुकलं? सौरव गांगुलीने उपस्थित केला प्रश्न

भारत न्यूझीलंड पहिला कसोटी सामना ड्रॉ झाला. या सामन्यावर खरं तर भारताची मजबूत पकड होती. मात्र गोलंदाजी हवी तशी

काय झालं? तिलक वर्माची कृती आणि पंचांची चूक! पाकिस्तानी खेळाडूंचा संताप, मैदानावर थेट पंचांसोबत केला राडा Video

एसीसी पुरूष आशिया कप रायझिंग स्टार्स 2026 स्पर्धेत भारत ए आणि पाकिस्तान ए संघात सामना पार पडला. या सामन्यात