मुंबई (विशेष प्रतिनिधी): कुर्ला येथील उद्यानानातील तरुण तरुणीला काही अल्पवयीय मुलांकडून झालेल्या मारहाणीच्या प्रकरणानंतर मुंबईतील उद्यान आणि मनोरंजन मैदानातील सुरक्षा ऐरणी आली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी महापालिका आयुक्त आश्विनी भिडे यांची भेट घेवून चर्चा केली. मुंबईतील उद्याने, खेळाची मैदाने आणि मोकळ्या जागांमधील सुरक्षा व्यवस्था अधिक बळकट करण्याबाबतही चर्चा झाली. यासाठी शहरातील असुरक्षित आणि संवेदनशील उद्याने व मोकळ्या जागांची यादी तयार करणे, महाराष्ट्र सुरक्षा मंडळाचे सुरक्षा कर्मचारी तैनात करणे, आवश्यक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे तसेच सध्या अस्तित्वात असलेल्या सुरक्षा व्यवस्थेचे परीक्षण करणे, अशा उपाययोजना करण्याच्या सूचना अमित साटम यांनी केल्या.(Safer Public Spaces)
आमदार अमीत साटम यांच्या पुढाकाराने महापालिका आयुक्त अश्विनी भिडे, अतिरिक्त महापालिका आयुक्त अविनाश ढाकणे आणि प्राजक्ता लवंगारे-वर्मा तसेच महापालिका क्षमता बांधणी व संशोधन केंद्राच्या (एमसीएमसीआर) अधिकाऱ्यांसोबत चर्चा झाली. यामध्ये पायाभूत सुविधांसह उद्यान आणि मैदानांच्या सुरक्षा तसेच देखभालीबाबतही झालेल्या चर्चेत त्यांनी या सूचना केल्या.
Pune Crime : पुण्यात प्रेमसंबंधाचा भयानक शेवट ! आयटी इंजिनिअर प्रियकरानेच केली प्रेयसीची हत्या, मृतदेहाशेजारी रात्रभर बसून राहिला अन्...
Pune Crime : पुण्यातील आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंजवडी परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ज्या प्रियकरासोबत गेली साडेतीन वर्षे प्रेमसंबंध ...
मुंबई महापालिकेच्या पायाभूत सुविधांच्या जाळ्यांचे व्यापक दस्तऐवजीकरण करण्यासाठी माहिती व्यवस्थापन उपक्रमाचा विस्तार, सर्व महापालिका कर्मचाऱ्यांसाठी वार्षिक प्रशिक्षण कार्यक्रम आणि पर्यावरणपूरक उपक्रम राबविणाऱ्या गृहनिर्माण संस्थांना मालमत्ता करात मिळणारी सवलत प्रत्यक्षात मिळते की नाही, याची खातरजमा करण्यासाठी त्रयस्थ संस्थेमार्फत लेखापरीक्षण व्यवस्था अशा महत्त्वपूर्ण सूचना केल्याची माहिती मुंबई भाजप अध्यक्ष व आमदार अमीत साटम यांनी दिली.
महापालिकेच्या प्रशासकीय कामकाजाला अधिक सक्षम करण्यासाठी एमसीएमसीआरची भूमिका बळकट करून हे केंद्र अधिक प्रभावी करण्याचा या बैठकीमागील उद्देश असल्याचे साटम यांनी बैठकीनंतर बोलताना सांगितले.(Secure Our Parks)
सर्व कर्मचाऱ्यांसाठी दरवर्षी प्रशिक्षण अनिवार्य
घनकचरा व्यवस्थापन विभागातील कर्मचाऱ्यांपासून ते महापालिका उपायुक्तांपर्यंत प्रत्येक कर्मचाऱ्याने दरवर्षी किमान निर्धारित प्रशिक्षण तास पूर्ण करणे प्रस्तावित आहे. महापालिकेच्या प्रत्येक कर्मचाऱ्यामध्ये नागरिककेंद्रित कार्यसंस्कृती विकसित करणे, हा या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे.मुंबईकरांना महापालिकेचे ग्राहक मानून त्यांना अधिक चांगल्या आणि कार्यक्षम सेवा कशा देता येतील, याची जाणीव प्रत्येक कर्मचाऱ्याला असणे आवश्यक आहे. त्यासाठी कर्मचाऱ्यांच्या संवादकौशल्यापासून ते सेवा देण्याच्या पद्धतीपर्यंत सर्वच बाबींमध्ये सुधारणा करण्यावर भर दिला जाईल, असे साटम यांनी स्पष्ट केले.(Safe Playgrounds)
Nashik : पंचवटीत खोदकामादरम्यान पुरातन मंदिरांचा शोध ! नंदी, शिवलिंगासह मंदिरांचे अवशेष आढळले
नाशिक : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पंचवटी परिसरात सुरू असलेल्या रामकाल पथ विकासकामादरम्यान एक महत्त्वपूर्ण ऐतिहासिक शोध समोर आला ...
पर्यावरणपूरक उपक्रम राबविणाऱ्या सोसायट्यांना करसवलतीचा लाभ
पर्यावरणपूरक उपक्रम राबविणाऱ्या गृहनिर्माण संस्थांना मालमत्ता करात 15 टक्क्यांपर्यंत सवलत देण्याचे महापालिकेचे विद्यमान धोरण आहे. कचऱ्याचे वर्गीकरण, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी) कार्यान्वित करणे आणि पावसाच्या पाण्याचे संधारण (रेनवॉटर हार्वेस्टिंग) यांसारखे उपक्रम राबविणाऱ्या सोसायट्यांना या सवलतीचा लाभ मिळणे अपेक्षित आहे. मात्र, धोरण अस्तित्वात असूनही पात्र गृहनिर्माण संस्थांना प्रत्यक्षात या सवलतीचा लाभ मिळत नसल्याचे निदर्शनास आले आहे.ही अडचण दूर करण्यासाठी एमसीएमसीआरच्या माध्यमातून त्रयस्थ संस्थेमार्फत लेखापरीक्षणाची यंत्रणा विकसित करण्यात येणार असल्याचेही साटम यांनी या बैठकीनंतर माध्यमांशी बोलतांना सांगितले.(Protect Public Spaces)
दर सहा महिन्यांनी ऑडीट करा
कचऱ्याचे वर्गीकरण, एसटीपी प्रकल्पांचे संचालन, पावसाच्या पाण्याचे संधारण तसेच सौरऊर्जा प्रकल्पांची उभारणी यांसारखे उपक्रम राबविणाऱ्या गृहनिर्माण संस्थांचे दर सहा महिन्यांनी लेखापरीक्षण केले जाईल.या लेखापरीक्षणानंतर पात्रतेबाबतचा अहवाल सादर करण्यात येईल. त्यामुळे पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्यक्ष प्रयत्न करणाऱ्या गृहनिर्माण संस्थांना नियमानुसार मालमत्ता कर सवलत मिळण्याचा मार्ग मोकळा होईल.