India Japan Relations : जपानच्या ओकायामा प्रांताच्या शिष्टमंडळाची विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट; महाराष्ट्र-जपान सहकार्यावर चर्चा

यावेळी महाराष्ट्र आणि जपान यांच्यातील संबंध अधिक दृढ करण्यासह व्यापार, गुंतवणूक आणि सांस्कृतिक देवाणघेवाणीबाबत चर्चा करण्यात आली.

मुंबई : जपानमधील ओकायामा प्रांताचे राज्यपाल रयुता इबारागी आणि ओकायामा प्रांतीय विधानसभेचे अध्यक्ष मसाताका ओटा यांच्या नेतृत्वाखालील उच्चस्तरीय शिष्टमंडळाने महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतली. 23 नोव्हेंबर 2026 रोजी महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयात ही सदिच्छा भेट झाली. यावेळी महाराष्ट्र आणि जपान यांच्यातील संबंध अधिक दृढ करण्यासह व्यापार, गुंतवणूक आणि सांस्कृतिक देवाणघेवाणीबाबत चर्चा करण्यात आली.






विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिष्टमंडळाचे स्वागत करत या भेटीबद्दल आनंद व्यक्त केला. महाराष्ट्र आणि जपानमधील संसदीय आदान-प्रदान, आर्थिक सहकार्य, सांस्कृतिक देवाणघेवाण आणि नागरिकांमधील संपर्क वाढवण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली.



व्यापार आणि गुंतवणुकीच्या संधींवर चर्चा


या शिष्टमंडळात ओकायामा प्रांतातील वरिष्ठ सरकारी अधिकारी, प्रांतीय विधानसभेचे सदस्य, ओकायामा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे पदाधिकारी तसेच विविध उद्योग आणि व्यावसायिक क्षेत्रांतील प्रतिनिधींचा समावेश होता. मुंबईतील जपानच्या महावाणिज्यदूत हितोमी सातो आणि उप-वाणिज्यदूत यो निशिओ यांच्यासह इंडो-जपान बिझनेस कौन्सिल आणि असोसिएशन ऑफ फ्रेंड्स ऑफ जपानचे प्रतिनिधीही उपस्थित होते.


या बैठकीत महाराष्ट्र आणि ओकायामा प्रांत यांच्यातील संस्थात्मक संबंध मजबूत करण्यावर भर देण्यात आला. व्यापार, गुंतवणूक, औद्योगिक विकास, तंत्रज्ञान, शिक्षण, पर्यटन आणि सांस्कृतिक क्षेत्रांमध्ये सहकार्याच्या नव्या संधी निर्माण करण्याबाबत विचारविनिमय झाला.



जपानी उद्योगांसाठी महाराष्ट्रात गुंतवणुकीच्या संधी


भारताच्या औद्योगिक आणि पायाभूत सुविधा विकासात जपान महत्त्वाचा भागीदार राहिला आहे. जपानचे अत्याधुनिक तंत्रज्ञान, गुंतवणूक आणि औद्योगिक कौशल्य भारतातील विविध विकास प्रकल्पांसाठी उपयुक्त ठरले आहे. महाराष्ट्र हे देशातील प्रमुख औद्योगिक आणि आर्थिक केंद्र असल्याने वाहन उद्योग, इलेक्ट्रॉनिक्स, उत्पादन क्षेत्र, पायाभूत सुविधा, नवीकरणीय ऊर्जा आणि आधुनिक तंत्रज्ञान या क्षेत्रांत जपानी उद्योगांसाठी गुंतवणुकीच्या संधी उपलब्ध आहेत.



2027 मध्ये भारत-जपान मैत्रीची 75 वर्षे


भारत आणि जपान यांच्यात 28 एप्रिल 1952 रोजी राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले. 2027 मध्ये या संबंधांना 75 वर्षे पूर्ण होणार आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र आणि ओकायामा प्रांतातील सहकार्य वाढवण्यासाठी झालेली ही भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे. दोन्ही देशांमधील मैत्रीपूर्ण संबंध अधिक दृढ करण्यासाठी राज्य आणि प्रांतीय स्तरावरील संवाद वाढवण्यावरही यावेळी भर देण्यात आला.


Comments
Add Comment

दुष्काळग्रस्त ३३ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना तीन महिने मोफत धान्य; मंत्रिमंडळाचा निर्णय

मुंबई : राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुंबई शहर, मुंबई उपनगर आणि ठाणे जिल्हा वगळता उर्वरित ३३

IFFI 2026 : IFFI 2026 मध्ये ‘क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमॉरो’चा समारोप; ‘वन लास्ट स्टॉप’ ठरला सर्वोत्कृष्ट चित्रपट

गोवा : गोव्यात सुरू असलेल्या 57 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (IFFI) तरुण चित्रपट निर्मात्यांसाठी

Uttar Pradesh : मेरठमध्ये 2,900 कोटींची गुंतवणूक! बॉल कॉर्पोरेशनच्या अ‍ॅल्युमिनियम कॅन उत्पादन प्रकल्पाचे योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते भूमिपूजन

उत्तर प्रदेशातील मेरठ हे शहर आता प्रगत उत्पादन उद्योगांचे नवे केंद्र म्हणून विकसित होत आहे. मुख्यमंत्री योगी

गोव्यात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात 'भाई बँड'ची जोरदार चर्चा; दोन भावांची गोष्ट प्रेक्षकांच्या मनात घर करणार

गोव्यात सुरू असलेल्या 57 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आज एका वेगळ्याच धाटणीच्या गुजराती

वीज प्रकल्प ठप्प आणि थेट लिबियापर्यंत ड्रोनचा तडाखा! रशिया-युक्रेन युद्धाचा भडका कुठे जाऊन थांबणार?

कीव : रशियाने बुधवारी युक्रेनच्या डोनबास फ्युएल अँड एनर्जी कंपनीच्या (डीटीईके) एका औष्णिक वीज प्रकल्पाला लक्ष्य

Chandrashekhar Bawankule : राज्यात ‘पूल तिथे बंधारा बंधनकारक

मुंबई : राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी यापुढे राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून