गोव्यात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात 'भाई बँड'ची जोरदार चर्चा; दोन भावांची गोष्ट प्रेक्षकांच्या मनात घर करणार

गोव्यात सुरू असलेल्या ५७ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (IFFI) गुजराती चित्रपट 'भाई बँड'चा प्रीमियर पार पडला. मनीष सैनी दिग्दर्शित या चित्रपटात दोन भावांचं नातं, पारंपरिक लग्नातील बँड आणि आधुनिक डीजे यांच्यातील संघर्ष हलक्याफुलक्या आणि भावनिक शैलीत मांडण्यात आला आहे.

गोव्यात सुरू असलेल्या 57 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आज एका वेगळ्याच धाटणीच्या गुजराती चित्रपटाची झलक पाहायला मिळाली. मनीष सैनी यांनी दिग्दर्शन केलेला 'भाई बँड' हा चित्रपट गाला प्रीमियर विभागात दाखवण्यात आला आणि त्याने उपस्थितांची मने जिंकली. हा चित्रपट आहे दोन भावांच्या नात्याचा. गावातल्या लग्नांमध्ये पारंपरिक बँड वाजवून पोट भरणारे हे दोन भाऊ. एकाच व्यवसायात असूनही त्यांच्यात मतभेद होतात आणि दोघेही वेगवेगळ्या वाटेला जातात. कथा इथेच थांबत नाही. काही आठवड्यांनंतर त्यातला एक भाऊ गावात परत येतो, पण यावेळी त्याच्याकडे पारंपरिक वाद्यं नसतात. त्याच्याकडे असतो भलामोठा डीजे, मोठे स्पीकर आणि फोनमध्ये साठवलेली गाण्यांची यादी.


आता प्रश्न उभा राहतो, पारंपरिक बँड टिकणार की डीजे जिंकणार? या संघर्षातूनच चित्रपट पुढे सरकतो. बदलतं तंत्रज्ञान, लग्नांची बदललेली पद्धत आणि त्याचा पारंपरिक व्यवसायांवर होणारा परिणाम याचं खूप सहज, हलक्याफुलक्या पद्धतीनं चित्रण या चित्रपटात केलं आहे. सोबतच भावांमधलं प्रेम, रुसवे-फुगवे आणि कुटुंबाला एकत्र ठेवणारी माया याचीही सुंदर गोष्ट यातून उलगडते. पत्रकारांशी बोलताना दिग्दर्शक मनीष सैनी म्हणाले, चित्रपट गुजराती असला तरी त्याची भावना सगळ्या भारताला आपलीशी वाटेल. 'भाई बँड' हे नाव मला दोन कारणांसाठी आवडलं. एक तर दोन भावांची मैत्री आणि दुसरं म्हणजे लग्नातला बँड. दोन्ही अर्थ या नावात बसतात.


http://prahaar.in/2026/11/25/gautam-adani-attends-mumbai-book-festival-urges-students-to-learn-from-books-and-contribute-to-nation-building/

या चित्रपटातून गुजराती सिनेमात पदार्पण करणारा अभिनेता प्रित कमानी यानेही आपला अनुभव शेअर केला. हा चित्रपट खूपच एनर्जेटिक आणि मजेशीर असल्याचं त्याने सांगितलं. शूटिंगदरम्यान मिळालेलं मोकळं वातावरण आणि सर्जनशील स्वातंत्र्य यामुळे काम करायला खूप मजा आली, असं तो म्हणाला. विशेष म्हणजे, या भूमिकेसाठी त्याने स्वतःहून दिग्दर्शकांकडे स्क्रीन टेस्टची मागणी केली होती, असा रंजक किस्साही त्याने सांगितला. तर गायकाची भूमिका साकारणाऱ्या चिराग कत्रेचा याने पात्रात शिरण्यासाठी किती मेहनत घेतली, याबद्दल सांगितलं. गायक होणं सोपं नव्हतं, पण तो अनुभव खूपच भारी होता, असं तो म्हणाला. अभिनेत्री श्रद्धा डांगरने आपलं पात्र गोड आणि आनंदी स्वभावाचं असल्याचं सांगत संपूर्ण टीमसोबत काम करताना खूप आनंद मिळाल्याचं सांगितलं. एकंदरीत, विनोद, संगीत आणि नात्यांची हळवी गोष्ट यांचा सुंदर मिलाफ म्हणजे 'भाई बँड'.

Comments
Add Comment

Dalimb Movie: दोन रहस्यं, एक थरारक तपास! 'डाळिंब'मध्ये जितेंद्र कुमार आणि प्रिया बापटची दमदार जोडी

Dalimb Movie: विविध शैलींमधील दर्जेदार कथा प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याची परंपरा कायम ठेवत, हिंदी ZEE5 ने आपल्या आगामी

'कमळी'च्या ऋषीची नवी आवड! निखिल दामलेने 2026 मध्ये वाचनातून जोपासली इतिहासाची गोडी

Nikhil Damle: सरत्या वर्षातील अनुभव, शिकवण आणि आठवणी सोबत घेऊन नव्या वर्षात काही नवीन गोष्टी करण्याचा संकल्प केला जातो.

Pooja Birari New Serial: ‘चुकीच्या गोष्टी खपवून घेत नाही!’ ‘येतेच आता मी नांदायला’मधील शिवानीबद्दल पूजा बिरारी काय म्हणाली?

Pooja Birari New Serial: झी मराठीवरील 'येतेच आता मी नांदायला' ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत असून, या मालिकेत अभिनेत्री

रिलीजच्या 22 दिवस आधीच 60 कोटींचा धमाका! 'Avengers: Doomsday' च्या तिकीट विक्रीचा आकडा पाहून चाहते थक्क!

मार्व्हल स्टुडिओजच्या बहुप्रतिक्षित 'Avengers: Doomsday' चित्रपटाने देशभरात प्रचंड उत्सुकता निर्माण केली आहे.

प्रदर्शनापूर्वीच श्रद्धा कपूरच्या ‘ईठा’ चित्रपटाची चर्चा, 'एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स'मध्ये कोरलं नाव

पुणे: बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित ‘ईठा’ चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी अवघे काही दिवसच शिल्लक राहिले आहेत.

‘किल्ला’मधील बालकलाकार अर्चित आता ‘झिम्मा 3’मध्ये! हेमंत ढोमे यांनी दिली खास संधी

Archit Deodhar: ‘किल्ला’सारख्या गाजलेल्या चित्रपटामधून बालकलाकार म्हणून आपली ओळख निर्माण करणारा अर्चित आता हेमंत ढोमे