Bangalore Cab Driver: बंगळूरनमध्ये एका प्रवासी आणि टॅक्सी चालक यांच्यातील एका अनौपचारिक संभाषणामुळे आश्चर्यकारक गोष्टी समोर आल्या आहेत. या अनौपचारिक संवादांमधून सोशल मीडियावर कमाई, उत्पन्नाचे विविध स्रोत आणि टॅक्सी व्यवसायाबद्दल सुरु झालेली चर्चा चालकाच्या दैनंदिन कमाई आणि त्याच्याकडील गाड्यांच्या ताफ्याबद्दलच्या अनपेक्षित संभाषणात बदलली.
कॅबच्या प्रवासात प्रवासी आणि चालक यांच्यात अनेकदा संवाद होतो, ज्यात ते एकमेकांच्या कामाबद्दल, उत्पन्नाबद्दल आणि दैनंदिन जीवनाबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. अशीच एक बंगळूर मधील घटना ज्यात एका प्रवाशासोबत कॅब बुक केलेल्या प्रवासी आणि ड्रायव्हर सोबत झाला. प्रवासादरम्यान, ड्रायव्हरच्या कमाईबद्दल जाणून तो प्रवासी आश्चर्यचकित झाला. हा ड्रायव्हर फक्त कॅब चालवूनच पैसे कमवत नाही, तर त्याचा स्वतःचा कॅबचा व्यवसायही आहे. त्याची कमाई आणि वाहनांची संख्या कळल्यावर, त्या प्रवाशाने आपला अनुभव सोशल मीडियावर शेअर केला.
Bus Truck Collision UAE: UAE मध्ये भीषण बस-ट्रक अपघात! 13 जणांचा मृत्यू, भारतीयांचाही समावेश
Bus Truck Collision UAE: संयुक्त अरब अमीरात (UAE) मधील रास अल खैमाह येथे एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला असून 14 जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये भारतीय ...
सोशल मीडिया पोस्ट
काल रात्री बेंगळुरूमध्ये, मी 'मॅजेस्टिक'ला जाण्यासाठी एक कॅब बुक केली. कॅब ड्रायव्हर आणि माझ्यामध्ये आयुष्याबद्दल आणि इतर गोष्टींवर चर्चा सुरू झाली. मग आम्ही त्याच्या दैनंदिन कमाईबद्दल बोलू लागलो. त्याने मला उबेर (Uber) ॲपवर त्या दिवसाची त्याची कमाई दाखवली: 4,800 रुपये, आणि ही कमाई रात्री १०:३० वाजेपर्यंतची होती. तो अजून 2 तास गाडी चालवणार होता. त्यानंतर त्याने मला त्याच्या संपूर्ण कॅब व्यवसायाबद्दल एक महत्त्वाची गोष्ट सांगितली.
त्याच्याकडे मुंबईत 10 'अर्टिगा' (Ertiga) गाड्या आहेत आणि प्रत्येक गाडीतून त्याला दिवसाला १,५०० रुपये भाडे मिळते. म्हणजेच, फक्त तिथूनच तो दररोज 15,000 रुपये कमावत आहे. तर, एकूण मिळून तो दिवसाला सुमारे 20,000 रुपये कमावत आहे. ही एक खूप मोठी रक्कम आहे आणि तो खरोखरच आपल्या कष्टाने हे पैसे कमावत आहे. ही रक्कम एखाद्या प्रॉडक्ट कंपनीतील 'सीनिअर मॅनेजर'च्या पगारापेक्षाही जास्त आहे, अशा इपोस्ट त्या प्रवाशाने सोशल मीडियावर शेयर केली आहे.
प्रवाशाने आपला अनुभव केला शेयर
प्रवाशाने हा अनुभव 'X' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केला. त्याने सांगितले की, तो ड्रायव्हरच्या कमाईने आणि त्याच्या कॅब व्यवसायाने प्रभावित झाला आहे. त्याने उत्पन्नाचे अनेक स्रोत निर्माण करण्यासाठी ड्रायव्हरने केलेल्या मेहनतीची आणि प्रयत्नांची कौतुक केले. तसेच आपल्या पोस्टमध्ये, त्याने ड्रायव्हरच्या कमाईची तुलना एका प्रॉडक्ट कंपनीत काम करणाऱ्या वरिष्ठ व्यवस्थापकाच्या पगाराशी केली. प्रवाशाने लोकांना असेही विचारले की, त्यांच्या ओळखीचे त्याच्यासारखे इतर लोक आहेत का आणि ड्रायव्हरच्या बोलण्यावर विश्वास ठेवता येईल का? या पोस्ट नंतर सोशल मीडियावर नागरिकांनी आपली मते व्यक्त केली आहेत. काही वापरकर्त्यांनी ड्रायव्हरच्या व्यावसायिक चातुर्याचे आणि कॅब चालवत असताना स्वतःचा व्यवसाय उभारण्याच्या क्षमतेचे कौतुक केले.