झारखंडमध्ये खाकी वर्दीचा गैरवापर, पोलीस कर्मचारीच निघाला अंमली पदार्थाचा तस्करी; अटकेने खळबळ!

गुन्हेगारांची माहिती पोलिसांपर्यंत पोहोचवणाराच जर काळ्या धंद्यात गुंतला असेल, तर कायदा आणि सुव्यवस्थेचे काय होईल? झारखंडमधील पश्चिम सिंहभूम जिल्ह्यात विशेष पोलीस अधिकारी म्हणजेच एसपीओ म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीला 1.04 किलो अफूसह अटक केल्याने पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे स्थानिक माहिती यंत्रणेच्या विश्वासार्हतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण केला जात आहे.

मुंबई: गुन्हेगारी रोखणे आणि गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी पोलिसांना स्थानिक पातळीवरून माहिती मिळणे अत्यंत महत्त्वाचे असते. मात्र, झारखंडच्या पश्चिम सिंहभूम जिल्ह्यातील सोनुआ परिसरात घडलेल्या एका घटनेमुळे संपूर्ण व्यवस्थेलाच धक्का बसला आहे. ज्याच्यावर गावे आणि जंगलातील हालचालींची माहिती पोलिसांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी होती, तोच व्यक्ती कथितपणे अफूच्या अवैध व्यापारात सामील असल्याचे समोर आले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव कुंवर सिंह गागराई असे असून, तो पोलिसांसाठी विशेष पोलीस अधिकारी (एसपीओ) म्हणून कार्यरत होता.






23 नोव्हेंबर रोजी सोनुआ पोलिसांनी बांझीकुसुम वळणाजवळ नाकाबंदी सुरू होती, यावेळी पोलिसांनी ही धडक कारवाई केली. कारवाईदरम्यान कुंवर सिंह गागराई आणि त्याचा साथीदार रेला होरो ऊर्फ रेला कच्छप यांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडून 1.04 किलोग्रॅम अफू जप्त करण्यात आला असून, या अंमली पदार्थांची किंमत पाच लाख रुपयांपेक्षा अधिक असल्याचे सांगितले जात आहे. याशिवाय पोलिसांनी त्यांच्याकडून नंबर प्लेट नसलेली एक मोटारसायकल आणि तीन स्मार्टफोनही जप्त केले आहेत. चक्रधरपूरचे एसडीपीओ डॉ. सैयद मुस्तफा हाशमी यांच्याकडून या संपूर्ण घटनेची माहिती देण्यात आली आहे.






चक्रधरपूरच्या एसडीओपी यांनी दिलेल्या सविस्तर माहितीनुसार, कुंवर सिंह गागराई याने एसपीओ पदाचा कथित गैरवापर करत अफूच्या काळ्या धंद्यात हात घातला. आरोपीवर कठोर कारवाई करण्यात येईल आणि त्याला एसपीओ पदावरून हटवण्याची प्रक्रियाही सुरू केली जाणार असल्याची माहितीही त्यांनी माध्यमांना दिली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास केवळ अफू जप्त करण्यापुरता मर्यादित न ठेवता, पोलीस यंत्रणेशी संबंधित पदावर असताना बेकायदेशीर धंदा कसा काय चालवला गेला? याचाही सखोल तपास करत आहेत. शिवाय, या प्रकरणाचे पाळेमुळे कुठपर्यंत पसरत गेलेली आहेत, ह्याचाही तपास केला जात आहे.






पोलिसांनी सुरूवातीला केलेल्या तपासात असे निष्पन्न झाले की, अटक करण्यात आलेले दोन्हीही आरोपी गेल्या तीन ते चार वर्षांपासून अफूची लागवड तसेच खरेदी- विक्रीच्या व्यवसायात सक्रिय होते. ते अफू कोठून मिळवत होते आणि कोणाकोणाला पुरवत होते, याचा शोध आता पोलीस घेत आहेत. तस्करीच्या जाळ्यात आणखी कोण कोण सामील आहे, याचाही तपास सुरू असून, दोघांची कसून चौकशी केली जात आहे. घटनेनंतर पोलिसांच्या स्थानिक माहिती यंत्रणेच्या देखरेखीवर आणि कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. माहिती देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या हालचालींवर आणि पार्श्वभूमीवर नियमित लक्ष ठेवले जाते की नाही, असा सवाल विचारला जात आहे. पोलीस यंत्रणेशी जोडलेल्या पदाचा वापर एखाद्याने स्वतःच्या बेकायदेशीर फायद्यासाठी करणे ही अत्यंत गंभीर बाब मानली जात आहे. आता या संपूर्ण तस्करीचे जाळे उध्वस्त करण्यासोबतच पोलिसांच्या माहिती यंत्रणेचा विश्वास कायम राखण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर उभे राहिले आहे.

Comments
Add Comment

Matrimonial Fraud: लग्नासाठी ॲपवर शोधला जोडीदार, पण पदरी पडली फसवणूक; गाझियाबादमध्ये आरोपी अटकेत

ऑनलाइन मॅट्रिमोनियल ॲपच्या माध्यमातून ओळख वाढवून लग्नाचे आश्वासन देत महिलेची फसवणूक केल्याचा धक्कादायक

शांघाय-कोलकाता इंडिगो विमानाचे अचानक आगरतळ्यात लँडिंग! नेमकं काय घडलं?

आगरतळा : शांघायहून कोलकात्याकडे येणाऱ्या इंडिगोच्या विमानात एका प्रवाशाची प्रकृती अचानक बिघडल्याने मंगळवारी

India Germany Relations : पंतप्रधान मोदी आणि जर्मनीचे चॅन्सेलर फ्रेडरिक मेर्झ यांच्यात फोनवर चर्चा; भारत-EU व्यापार करारावरही भर

दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जर्मनीचे चॅन्सेलर फ्रेडरिक मेर्झ यांच्यात मंगळवारी फोनवर संवाद झाला. या

उत्तराखंडमध्ये महिलांच्या खात्यात थेट ₹10,000! भाजपचा निवडणुकीपूर्वी मास्टरस्ट्रोक?

उत्तराखंडमधील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि स्वावलंबी करण्यासाठी धामी सरकारने एक नवीन योजना सुरू केली

धुक्यामुळे अपघात टाळण्यासाठी यमुना एक्स्प्रेसवेवर वेगमर्यादा घटली; आता ताशी 75 किमी वेगानेच प्रवास!

हिवाळ्यात यमुना द्रुतगती मार्गावर धुक्यामुळे होणारे रस्ते अपघात टाळण्याच्या उपाययोजनांचा एक भाग म्हणून २५

Raghav Chadha : ६ वर्षांनंतर भाजप आणि अकाली दल पुन्हा एकत्र; 'ही केवळ दोन पक्षांची नाही, तर पंजाबच्या जनतेची युती' - खासदार राघव चढ्ढा

नवी दिल्ली : आगामी २०२७ मध्ये होणाऱ्या पंजाब विधानसभा निवडणुकांच्या आधी देशाच्या राजकारणात एक अत्यंत