न्युयॉर्क: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा टॅरिफच्या शुल्कामध्ये वाढ करण्याच्या तयारीमध्ये आहेत. यावेळी त्यांनी भारतासह 16 देशांतील टॅरिफ शुल्क वाढवण्याच्या तयारीमध्ये असल्याचे कळत आहे. दरम्यान, एका अहवालानुसार, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नव्या यादीमध्ये भारताचा समावेश केला आहे, त्यामुळे एकाअर्थी भारतासाठी ही बाब चिंताजनक आहे. त्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, अमेरिका 16 देशांमधील टॅरिफ शुल्कामध्ये वाढ करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे भारतालाही त्या नवीन शुल्काचा धोका आहे.
वॉल स्ट्रीट जर्नलने दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सरकारकडून अनुदान आणि इतर सरकारी मदतीच्या माध्यमातून देशांतर्गत उद्योगांना पाठिंबा दिल्याचा आरोप असलेल्या देशांवरील सध्याचे शुल्क वाढवण्याच्या तयारीत आहे. भारताला ट्रम्प यांच्याकडून टॅरिफ शुल्काच्या आणखी एका फेरीला सामोरे जावे लागू शकते. ट्रम्प यांच्या टॅरिफ शुल्काच्या कारवाईमध्ये भारत, चीन, जपान, दक्षिण कोरिया, युरोपियन युनियन आणि इतर अनेक प्रमुख अर्थव्यवस्थांचा समावेश होण्याची शक्यता आहे. औद्योगिक अनुदानांसंदर्भात अमेरिकेने अनेक महिने केलेल्या चौकशीनंतर हे घडले आहे.
अमेरिकेच्या CIA च्या डेटाबेसवर सायबर हल्ला! सुरक्षा यंत्रणेत खळबळ
मुंबई: अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेला मोठा धक्का देणारी घटना समोर आली असून, CIA च्या एका प्रणालीवर सायबर हल्ला करण्यात आला आहे. सोशल मीडिया, सॅटेलाईट ...
अमेरिकेचा असा युक्तिवाद आहे की, ही अनुदाने परदेशी उत्पादकांना अमेरिकन कंपन्यांच्या तुलनेत मोठ्या प्रमाणावर फायदा होतो, कारण त्यामुळे त्यांना स्वस्तात वस्तूंचे उत्पादन करून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात पुरवठा करता येतो. सोप्या भाषेत सांगायचे तर, अमेरिकेचा असा विश्वास आहे की अनुदान, आर्थिक मदत आणि इतर धोरणात्मक पाठिंब्यामुळे परदेशी उत्पादकांना कमी किंमतीत वस्तूंचे उत्पादन करता येते. मग या कंपन्या आंतरराष्ट्रीय बाजारात आपली उत्पादने जास्त किंमतीत विकतात, ज्यामुळे अमेरिकन उत्पादकांना स्पर्धा करणे कठीण होते. ट्रम्प प्रशासनाचा दावा आहे की यामुळे अमेरिकन व्यवसायांसाठी देशांतर्गत उत्पादनाला बाधा येते.
ट्रम्प यांच्या टॅरिफ कार्डच्या योजनेशी परिचित असलेल्या लोकांचा हवाला देत, वॉल स्ट्रीट जर्नलच्या (WSJ) रिपोर्टमध्ये असे नमूद करण्यात आले आहे की, अमेरिकेचे व्यापार प्रतिनिधी जेमिसन ग्रीअर या आठवड्यात अमेरिकेच्या चौकशीचे निकाल जाहीर करू शकतात. शिवाय, त्यांनी असा इशाराही दिला आहे की या वेळापत्रकात बदल होऊ शकतो. ट्रम्प यांच्या शुल्क योजनेची वेळ भारतासाठी विशेषतः महत्त्वाची आहे, कारण नवी दिल्ली आणि वॉशिंग्टन अजूनही त्यांच्या स्वतःच्या व्यापार करारावर वाटाघाटी करण्याचा प्रयत्न करत आहेत. ट्रम्प यांच्यावरील अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर अमेरिकेच्या धोरणात झालेल्या बदलांमुळे हा करार अद्याप अंतिम झालेला नाही.
बलुचिस्तान हादरले! पाक लष्करावर ड्रोन आणि IED हल्ल्यांचा कहर, BLA चा 20 सैनिक ठार केल्याचा खळबळजनक दावा
इस्लामाबाद : बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने (BLA) बलुचिस्तानमध्ये केलेल्या विविध हल्ल्यांमध्ये 20 पाकिस्तानी सैनिक आणि कथित सहकाऱ्यांना ठार केल्याचा दावा ...
नवीन शुल्कांचा काय परिणाम होईल?
'द वॉल स्ट्रीट जर्नल'नुसार, ट्रम्प प्रशासनाने प्रस्तावित केलेले शुल्क अर्थव्यवस्थांमधून निर्यात होणाऱ्या बहुतांश उत्पादनांना लागू केले जाणार आहे. तथापि, पोलाद, ॲल्युमिनियम आणि ऑटोमोबाईल्स यांसारख्या काही औद्योगिक वस्तूंना वगळले जाऊ शकते, कारण राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव त्यांच्यावर आधीच स्वतंत्र शुल्क आकारले जाते. भारत किंवा यादीतील इतर कोणत्याही देशावरील ट्रम्प यांचे अंतिम शुल्क दर अद्याप निश्चित झालेले नसले तरी, अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी वारंवार असे संकेत दिले आहेत की, ट्रम्प प्रशासनाचा 2025 मध्ये लागू केलेल्या शुल्का इतकेच शुल्क लावण्याच्या विचारात आहे.
याचा परिणाम सर्व देशांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने होऊ शकतो, याचा सुद्धा विचार करण्यात आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेशी व्यापार करार केलेल्या जपान, युरोपियन युनियन आणि दक्षिण कोरिया यांना 15% किंवा त्याहून कमी शुल्काचा सामना करावा लागू शकतो. दुसरीकडे, अमेरिकी सरकारसोबतच्या त्यांच्या स्वतंत्र व्यापार करारांच्या अटींमुळे भारत आणि व्हिएतनामवरील शुल्क या देशांपेक्षा जास्त असू शकते. तथापि, चीनला शुल्काचा सर्वाधिक धोका असल्याचे दिसते, कारण चीनचे अनुदान खूप जास्त आहे.
Vietnam Gas Leak : हॉटपॉट रेस्टॉरंटमध्ये थरकाप उडवणारा स्फोट; 6 जणांचा मृत्यू, ढिगाऱ्याखाली अजूनही अनेक जण अडकले
हनोई : व्हिएतनामची राजधानी हनोईतील दाट लोकवस्तीच्या परिसरात मंगळवारी सकाळी भीषण स्फोट झाला असून या दुर्घटनेत किमान 6 जणांचा मृत्यू झाला आहे आणि 10 जण ...
भारत- अमेरिका व्यापार संबंध
ट्रम्प यांच्या प्रस्तावित टॅरिफच्या नव्या शुल्क आकारणीमुळे अमेरिकेशी व्यापार करार करण्याच्या भारताच्या प्रयत्नांमध्ये आणखी गुंतागुंत निर्माण होऊ शकते. दोन्ही देशांनी 7 फेब्रुवारी 2026 रोजी एक अंतरिम व्यापार आराखडा जाहीर केला होता, ज्यामध्ये अमेरिकेने भारतीय वस्तूंवरील आपले परस्पर शुल्क 25% वरून 18% पर्यंत कमी करण्यास आणि भारताच्या रशियन तेल खरेदीवर (भारत- रशिया तेल आयात) दंड म्हणून लादलेले 25% दुय्यम शुल्क मागे घेण्यास सहमती दर्शवली होती.
मार्च अखेरीस, जेव्हा अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने आंतरराष्ट्रीय आपत्कालीन आर्थिक शक्ती कायद्यांतर्गत (IEEPA) ट्रम्प यांनी लादलेले शुल्क रद्द केले, तेव्हा व्यापार करार अनिश्चित झाला. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे अमेरिकेला आपल्या शुल्क व्यवस्थेवर पुनर्विचार करण्यास आणि विविध देशांकडून होणाऱ्या आयातीवरील शुल्कासाठी एक नवीन चौकट तयार करण्यास भाग पडले. भारतीय वाणिज्य सचिव राजेश अग्रवाल यांनीही 18 नोव्हेंबर रोजी सांगितले की, जोपर्यंत अमेरिकेची नवीन शुल्क रचना अंतिम होत नाही, तोपर्यंत भारत- अमेरिका मुक्त व्यापार करारावर औपचारिकपणे स्वाक्षरी केली जाऊ शकत नाही.