Delhi NCR : दिल्ली-NCR मध्ये आत्मघाती हल्ल्याचा कट उधळला; मेरठमधून उज्जैदला अटक, पाकिस्तानी हँडलरशी संपर्काचा संशय

त्याचा पाकिस्तानमध्ये असलेला दहशतवादी हँडलर शहजाद भट्टी याच्या नेटवर्कशी संपर्क असल्याचा संशय आहे.

दिल्ली : राजधानी दिल्ली आणि एनसीआर परिसरात आत्मघाती हल्ला घडवण्याचा कथित दहशतवादी कट सुरक्षा यंत्रणांनी उधळून लावल्याची माहिती समोर आली आहे. उत्तर प्रदेश पोलिसांनी जम्मू-काश्मीर पोलिसांकडून मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे मेरठमधून उज्जैद नावाच्या संशयिताला अटक केली आहे. त्याचा पाकिस्तानमध्ये असलेला दहशतवादी हँडलर शहजाद भट्टी याच्या नेटवर्कशी संपर्क असल्याचा संशय आहे. या प्रकरणी एटीएस, आयबी आणि इतर गुप्तचर यंत्रणा त्याची चौकशी करत आहेत.






सहा महिन्यांपासून पाकिस्तानी हँडलरच्या संपर्कात?


मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री उशिरा मेरठ पोलिसांनी ही कारवाई केली. उज्जैद गेल्या सहा महिन्यांपासून काश्मीरमध्ये अटक करण्यात आलेल्या मोहम्मद साजिद आणि पाकिस्तानी हँडलर शहजाद भट्टी यांच्या संपर्कात होता, असा तपास यंत्रणांचा संशय आहे. त्यांच्या सांगण्यावरून तो दिल्ली-एनसीआरमध्ये हल्ल्याची तयारी करत असल्याची माहिती समोर आली आहे.



सोशल मीडियावरील पोस्टमुळे संशय वाढला


तपास यंत्रणांना मिळालेल्या माहितीनुसार, उज्जैदने सोशल मीडियावर काही चिथावणीखोर पोस्ट केल्या होत्या. तो आत्मघाती हल्ल्यासाठी स्वतःला तयार करत असल्याचा संशयही व्यक्त करण्यात आला आहे. जम्मू-काश्मीर पोलिसांकडून याबाबत माहिती मिळाल्यानंतर मेरठ पोलिसांनी त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवले होते. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली.



नीट परीक्षेच्या तयारीदरम्यान साजिदचे नाव आले समोर


या प्रकरणाच्या तपासात जम्मू-काश्मीर पोलिसांनी यापूर्वी केलेली कारवाई महत्त्वाची ठरली. गेल्या वर्षी पोलिसांनी मोहम्मद साजिदसह दोन संशयितांना अटक केली होती. साजिद जम्मूच्या बठिंडी परिसरात राहून वैद्यकीय प्रवेश परीक्षेची तयारी करत होता. त्याच्या चौकशीत शहजाद भट्टीच्या कथित स्लीपर सेल नेटवर्कची माहिती समोर आली. याच तपासादरम्यान मेरठमधील उज्जैदचे नाव पुढे आल्याचे वृत्त आहे.



मोबाईलमध्ये पाकिस्तानी क्रमांक आणि संशयास्पद चॅट्स


मिळालेल्या माहितीनुसार, साजिदने भारतीय लष्करावर आत्मघाती हल्ला करण्याची योजना आखली होती. या कथित कटात उज्जैदचाही सहभाग असल्याचा संशय आहे. पोलिसांनी उज्जैदचा मोबाईल फोन जप्त केला असून, त्यामध्ये पाकिस्तानमधील अनेक मोबाईल क्रमांक आणि संशयास्पद चॅट्स आढळल्याचे सांगण्यात येत आहे.


या नेटवर्कमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे, हल्ल्याची तयारी कितपत झाली होती आणि संशयितांना कोणाकडून मदत मिळत होती, याचा तपास सुरक्षा यंत्रणा करत आहेत. मात्र, या प्रकरणातील आरोपांची पुष्टी पुढील तपासातून होणे बाकी आहे.



Comments
Add Comment

Raghav Chadha : ६ वर्षांनंतर भाजप आणि अकाली दल पुन्हा एकत्र; 'ही केवळ दोन पक्षांची नाही, तर पंजाबच्या जनतेची युती' - खासदार राघव चढ्ढा

नवी दिल्ली : आगामी २०२७ मध्ये होणाऱ्या पंजाब विधानसभा निवडणुकांच्या आधी देशाच्या राजकारणात एक अत्यंत

Fairness Cream : 'या' क्रीमचा भयंकर साईड इफेक्ट! क्रीममध्ये सापडला पारा, 17 वर्षांच्या मुलीची किडनी धोक्यात

केरळ : गोरे दिसण्याच्या हव्यासापोटी सोशल मीडियावरील जाहिरातींना भुलून फेअरनेस क्रीम वापरणे किती धोकादायक ठरू

उत्तर प्रदेशात शिवसेनेची 35 जागांवर निवडणूक लढवण्याची तयारी, भाजपसोबत युती करण्याचे प्रयत्न

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील

BHEL Recruitment: इंजिनिअर्ससाठी सरकारी नोकरीची संधी! BHEL मध्ये 200 पदांची भरती

इंजिनिअरिंग क्षेत्रातील उमेदवारांसाठी भारत सरकारच्या नामांकित सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीत नोकरीची मोठी

Indian Navy : भारतीय नौदल आणि तटरक्षक दलासाठी 15 हजार कोटींचा हेलिकॉप्टर खरेदी प्रस्ताव; 76 नवीन हेलिकॉप्टर ताफ्यात येणार

दिल्ली : भारतीय नौदल आणि भारतीय तटरक्षक दलाच्या जुन्या हेलिकॉप्टर ताफ्याचे आधुनिकीकरण करण्यासाठी मोठी तयारी

BJP Akali Dal Alliance : 6 वर्षांचा दुरावा संपला! भाजप-अकाली दल पुन्हा एकत्र; 2020 मध्ये का तुटली होती युती?

भारतीय जनता पक्ष आणि शिरोमणी अकाली दल यांनी आज (२४ नोव्हेंबर) २०२७च्या पंजाब विधानसभा निवडणुका एकत्र लढवण्याची