मातोश्रीचा मागचा दरवाजा कशासाठी होता? टेम्पो आत कशासाठी यायचे? संजय राऊतांच्या लाचखोरीच्या आरोपांना मंत्री संजय शिरसाट यांचे प्रत्युत्तर

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या नावाने लातूरमध्ये प्रशिक्षण केंद्र उभारण्यासाठी पाच कोटी रुपयांची लाच मागितल्याचा आरोप उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्यावर केला आहे.

मुंबई: लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या नावाने लातूरमध्ये प्रशिक्षण केंद्र उभारण्यासाठी पाच कोटी रुपयांची लाच मागितल्याचा आरोप उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्यावर केला आहे. या आरोपांना उत्तर देताना शिरसाट यांनी “मातोश्रीचा मागचा दरवाजा कशासाठी होता? त्या दरवाजातून टेम्पो आत कशासाठी यायचे?”, असा सवाल करीत, गेल्या दोन वर्षांत मी 25 कोटी रुपयांचा एकही प्रस्ताव मंजूर केल्याचे दाखवून द्यावे, असे आव्हानही दिले.


शिरसाट यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेऊन राऊत यांच्या आरोपांवर भूमिका मांडली. ते म्हणाले, “मी गेल्या दोन वर्षांत 25 कोटी रुपयांचा एक तरी प्रस्ताव मंजूर केल्याचे दाखवा. मंत्री म्हणून मला 10 कोटी रुपयांपर्यंतचा प्रस्ताव मंजूर करण्याचा अधिकार आहे. त्यापेक्षा अधिक रकमेच्या प्रस्तावासाठी मुख्यमंत्र्यांची परवानगी घ्यावी लागते. उदगीरकर नावाच्या एका व्यक्तीने 25 कोटी रुपयांचा प्रस्ताव दिला होता. माझ्याकडे अनेक प्रस्ताव येत असतात. त्यातील काही फेटाळले जातात, तर काहींना मंजुरी दिली जाते. हा प्रक्रियेचा भाग आहे. मात्र, राऊत यांनी त्याचा संबंध साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्याशी जोडला. अण्णा भाऊ साठे यांचे योगदान मला माहीत आहे का, असा जावईशोधही त्यांनी लावला. त्या प्रकरणाचा अण्णा भाऊ साठे यांच्याशी संबंध काय? लेटरहेडवर महापुरुषांचे नाव लावायचे आणि काम झाले नाही की त्यांची बदनामी करायची, असा प्रकार सुरू असतो,” असे शिरसाट म्हणाले.


“तुम्ही अण्णा भाऊ साठे यांचे नाव घेता. तुमच्या पक्षाच्या अध्यक्षांनी कधी त्यांच्या छायाचित्राला हार घातला का? हार घातल्याचा एखादा फोटो दाखवू शकता का? आम्हाला या भानगडीत तुम्ही खेचू शकत नाही. अण्णा भाऊ साठे आमच्यासाठी महत्त्वाचे आहेत. वाटेगावात जाऊन पाहा. इतिहासात एवढा मोठा पुतळा बसवला नसेल, असा पुतळा उभारण्यात येणार आहे. त्यासाठी 50 कोटी रुपये मंजूर केले आहेत. पाच एकर जागेत त्यांचे मोठे स्मारक उभारत आहोत. महाडला जाऊन पाहा. चवदार तळ्याचे सुशोभीकरण करीत असून त्यासाठी 90 कोटी रुपये खर्च करीत आहोत. डोळे उघडे ठेवून पाहा. महापुरुषांच्या छायाचित्रांचा वापर राजकारणासाठी करू नका. मजबुरी म्हणून तुम्हाला त्यांचे फोटो ठेवावे लागतात,” असे ते म्हणाले.


मंत्री शिरसाट म्हणाले, “उद्धव ठाकरेंना हे माहीत होते की, आमच्याकडे पैसे नाहीत, म्हणूनच त्यांनी आम्हाला मंत्री केले नाही. अपक्ष आमदार शंकर गडाख यांचा पक्षाशी संबंध नसतानाही त्यांना एका दिवसात मंत्री करण्यात आले. पक्षासाठी त्यांचे असे कोणते योगदान होते? आपल्या जवळच्या चौकडीतील लोक मंत्रिमंडळात कसे येतील, हेच उद्धव ठाकरे यांनी पाहिले. अनिल परब आणि सुभाष देसाई यांना मंत्रिमंडळात घेतले. मलिदा कसा खायचा, हेच त्यांचे लक्ष्य होते. मातोश्रीचा मागचा दरवाजा कशासाठी होता, हे सांगायला लावू नका. त्या मागच्या दरवाजातून टेम्पो कसे आत यायचे? आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करता? आमच्याकडे पैसा नाही आणि आमची जात आडवी येते. तुमच्या मंत्रिमंडळात कोणता दलित मंत्री होता? बौद्ध समाजाचा कोणता मंत्री होता? अडीच वर्षे तुम्ही सत्तेत होता, त्या काळात कोणत्या दलिताला मंत्री केले, हे नाव सांगता येईल का?” असा सवाल त्यांनी केला.

Comments
Add Comment

अमेरिकेतील म्युझिक कॉन्सर्टदरम्यान अंदाधुंद गोळीबार; 9 जण जखमी, एकाची प्रकृती गंभीर

वॉशिंग्टन: अमेरिकेतील कॅलिफॉर्निया राज्यातील एका कार्यक्रमामध्ये अंदाधुंद गोळीबाराची घटना घडली आहे. या

हिंजवडीकरांसाठी आनंदाची बातमी! वर्ष अखेरीस पुणे मेट्रो मार्गिकेवरील दोन स्थानक येणार सेवेत

पुणे: पुणेकरांच्या दृष्टीने महत्त्वाची बातमी आहे. हिंजवडी आयटी पार्कमधील नोकरदारांना कायमच मोठ्या प्रमाणावर

Rinku Meets Modi: क्रिकेटर रिंकु सिंगने सहकुटुंब घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट, दिलं लग्नाचं आमंत्रण...

मुंबई: भारतीय क्रिकेट संघातील फलंदाज रिंकू सिंग लवकरच आयुष्यातील नव्या इनिंगची सुरूवात करणार आहे. यासाठी रिंकू

थिएटरमध्ये तुफान कमाई केल्यानंतर 'हनुमान अंश' OTT वर रिलीज होणार, कुठे होणार रिलीज; जाणून घ्या तारीख

मुंबई: विशाल चतुर्वेदी दिग्दर्शित, 'हनुमान अंश' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई करत सर्वांचेच लक्ष वेधले. 2

Mumbai Fire: परळच्या कामगार स्टेडियममध्ये भीषण आग, लाकूड आणि बांबूच्या साहित्याला आग; जीवितहानी नाही

मुंबई: मुंबईतील दादर पश्चिमेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर परिसरातील प्रसिद्ध कामगार स्टेडियममध्ये रविवारी

ठाण्यात खळबळ! मासुंदा तलावात 32 वर्षीय महिलेची उडी; पुढे जे घडलं ते पाहून सर्वच थक्क!

ठाणे: ठाण्यातील मध्यवर्ती आणि गजबजलेल्या तलावपाळी (मासुंदा तलाव) परिसरात शुक्रवारी रात्री एक थरारक घटना समोर