Palghar Accident : खेळताना खिडकीजवळ गेला अन् तोल गेला, सहा वर्षांच्या मुलाचा दुर्दैवी अंत ; 15 दिवसांपूर्वीच हरवले होते आईचे छत्र

Palghar News : महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. नायगाव पूर्व येथील एका निवासी इमारतीच्या ११व्या मजल्यावरून पडून सहा वर्षांच्या चिमुरड्याचा मृत्यू झाला आहे. फ्लॅटबाहेरील कॉरिडॉरमध्ये एका मुलीसोबत खेळत असताना हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती आहे. विशेष म्हणजे, अवघ्या १५ दिवसांपूर्वीच या चिमुरड्याने आई गमावली होती. त्यामुळे या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.



खेळता खेळता ११व्या मजल्यावरून पडला


मिळालेल्या माहितीनुसार, नायगाव पूर्व येथील नवकार टॉवर सोसायटीमध्ये ही घटना घडली. सहा वर्षांचा मुलगा आपल्या फ्लॅटबाहेरील कॉरिडॉरमध्ये एका मुलीसोबत खेळत होता. याचवेळी खिडकीजवळ त्याचा तोल गेला आणि तो थेट ११व्या मजल्यावरून खाली कोसळला.


खाली पडताना मुलगा आधी अग्निसुरक्षा व्यवस्थेसाठी बसवलेल्या पाइपवर आदळला आणि त्यानंतर जमिनीवर पडला. घटनेनंतर त्याला तातडीने वसई येथील कार्डिनल ग्रेशियस रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली. या घटनेतील सर्वात वेदनादायी बाब म्हणजे, या चिमुरड्याच्या आईचे अवघ्या १५ दिवसांपूर्वी निधन झाले होते. आईच्या निधनानंतर मुलाच्या वडिलांनी त्याला महाबळेश्वर येथील एका वसतिगृहात पाठवण्याचा विचार केला होता, अशी माहिती समोर आली आहे.







सोसायटीतील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर


या दुर्घटनेनंतर सोसायटीतील सुरक्षेचा मुद्दा चर्चेत आला आहे. इमारतीच्या कॉरिडॉरमधील खिडक्यांना सुरक्षा जाळ्या नसल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांनी केला आहे. सुरक्षा जाळ्या बसवण्याची मागणी वारंवार करूनही बिल्डरने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा दावा रहिवाशांनी केला आहे. इतकेच नाही, तर सोसायटीमधील लिफ्टच्या खराब स्थितीबाबतही रहिवाशांनी चिंता व्यक्त केली आहे. एका विंगमधील लिफ्ट सध्या बंद असल्याचेही सांगण्यात आले आहे. दरम्यान, याप्रकरणी सोसायटी प्रशासनाकडून तातडीने कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.


घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. मुलाच्या वडिलांचा जबाब अद्याप नोंदवण्यात आलेला नसल्याचे पोलिसांनी सांगितले. या दुर्घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

Comments
Add Comment

CRPF Recruitment: CRPF मध्ये डॉक्टरांसाठी भरती! 19 पदांसाठी थेट मुलाखत, 85 हजार रुपये पगार

CRPF Recruitment 2026: सीआरपीएफमध्ये नोकरीची एक महत्त्वपूर्ण संधी उपलब्ध झाली आहे. वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलेले तरुण थेट

PM Kisan Yojana : 25व्या हप्त्यापूर्वी शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट ! Farmer ID नसेल तर काय होणार ? जाणून घ्या नियम

PM Kisan Samman Nidhi : पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून दरवर्षी ६

नागपूरमध्ये 3.74 कोटी रुपयांची फिल्मी स्टाईल चोरी, थरारक लुटीचा मध्य प्रदेशात 'असा' झाला पर्दाफाश!

नागपूर: नागपूर शहरामध्ये करण्यात आलेल्या कोट्यवधी रुपयांच्या चोरीचा पर्दाफाश मध्य प्रदेशातील बालाघाट

Prahaar Marathi News Live 25 November 2026: महाराष्ट्रासह देश-विदेशातील घडामोडी, एका क्लिकवर वाचा आजच्या घडामोडी!

Prahaar Marathi News Live दिनांक 25 नोव्हेंबर 2026 च्या लाईव्ह ब्लॉगमध्ये महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, स्थानिक बातम्या,

संविधान दिनी राज्यातील 11 गड-किल्ल्यांवर स्वच्छता अभियान! रायगडावर 'गडांचा मान, संविधानाचा सन्मान'

रायगड : भारतीय संविधानातील मूलभूत कर्तव्यांची जाणीव आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा ऐतिहासिक वारसा जतन

Uday Samant : ‘गाव तिथे उद्योजक’ योजना धाराशिवमधून सुरू होणार; नवउद्योजकांना 1 कोटीपर्यंत अर्थसहाय्य

धाराशिव : राज्यातील ग्रामीण भागात उद्योजकतेला चालना देण्यासाठी उद्योग विभागाच्या माध्यमातून ‘गाव तिथे