CRPF Recruitment: CRPF मध्ये डॉक्टरांसाठी भरती! 19 पदांसाठी थेट मुलाखत, 85 हजार रुपये पगार

सीआरपीएफमध्ये नोकरीची एक महत्त्वपूर्ण संधी उपलब्ध झाली आहे. वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलेले तरुण थेट मुलाखतीला बसून हे पद मिळवू शकतात. केंद्रीय राखीव पोलीस दलाने (सीआरपीएफ) वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलेल्या आणि शासकीय सेवेत काम करण्याची इच्छा असलेल्या डॉक्टरांसाठी रोजगाराची संधी जाहीर केली आहे.

CRPF Recruitment 2026: सीआरपीएफमध्ये नोकरीची एक महत्त्वपूर्ण संधी उपलब्ध झाली आहे. वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलेले तरुण थेट मुलाखतीला बसून हे पद मिळवू शकतात. केंद्रीय राखीव पोलीस दलाने (सीआरपीएफ) वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलेल्या आणि शासकीय सेवेत काम करण्याची इच्छा असलेल्या डॉक्टरांसाठी रोजगाराची संधी जाहीर केली आहे. कंत्राटी तत्त्वावर 19 विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी पदांच्या भरती जाहीर केली आहे. सीआरपीएफ संचालनालयाने देशभरातील आपल्या विविध संयुक्त रुग्णालयांमध्ये याबाबत अधिकृत अधिसूचना जारी केली आहे.


महत्वाचं म्हणजे या पदांसाठी कोणतीही लेखी परीक्षा होणार नाही; त्याऐवजी, उमेदवारांची निवड थेट मुलाखत, कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय तपासणीच्या आधारे करण्यात येणार आहे. या भरती प्रक्रियेत पुरुष आणि महिला दोन्ही उमेदवार सहभागी होऊ शकतात. तसेच निवड झालेल्या डॉक्टरांना ₹85,000 मासिक वेतन मिळणार आहे. बहुतांश केंद्रांसाठी थेट मुलाखती (वॉक-इन इंटरव्ह्यू) 15 डिसेंबर 2026 रोजी सकाळी 9:00 वाजल्यापसून सुरु होईल. आवडी, जगदलपूर आणि गांधीनगर केंद्रांसाठी मुलाखतीची तारीख बदलून 17 डिसेंबर करण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार सीआरपीएफच्या अधिकृत वेबसाइट rect.crpf.gov.in वर भरती मार्गदर्शक सूचना पाहू शकतात. तसेच अधिक माहितीसाठी तुम्ही ही वेबसाईट पाहू शकता.






रुग्णालयात रिक्त जागा


प्रयागराज, आवडी, रायपूर, भोपाळ, मुझफ्फरपूर, रामपूर, रांची, सिलचर आणि गांधीनगर येथील रुग्णालयांमध्ये नऊ सर्जन पदे भरली जाणार आहेत. हैदराबाद, जम्मू, भुवनेश्वर आणि जगदलपूर येथे चार रेडिओलॉजी पदे भरली जातील. तर भोपाळ आणि पुणे येथे दोन नेत्ररोगशास्त्र पदे भरली जाणार आहेत. रामपूर आणि रांची येथे दोन भूलशास्त्र पदे, आणि रांची व सिलचर येथे दोन प्रसूती व स्त्रीरोगशास्त्र पदे भरली जाणार आहेत. असे विविध सीआरपीएफ संयुक्त रुग्णालयांत 14 पदांअंतर्गत एकूण 19 जागा भरल्या जातील.



शैक्षणिक पात्रता


या भरतीसाठी, उमेदवारांकडे इंडियन मेडिकल कौन्सिल ॲक्ट 1956 अंतर्गत मान्यताप्राप्त ॲलोपॅथिक वैद्यकीय पदवी आणि अनिवार्य रोटेटिंग इंटर्नशिप पूर्ण केल्याचा पुरावा असणे गरजेचे आहे. याव्यतिरिक्त, संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवीसह दीड वर्षांचा अनुभव किंवा पदव्युत्तर पदविका आणि अडीच वर्षांचा अनुभव आवश्यक आहे. दरम्यान, थेट मुलाखतीच्या तारखेपर्यंत उमेदवारांचे वय 70 वर्षांपेक्षा कमी असावे. या पदांसाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा ₹85,000 पगार मिळेल. तसेच कराराच्या कालावधीत कोणताही प्रवास भत्ता किंवा दैनिक भत्ता दिला जाणार नाही. तर, या अधिसूचनेत कोणत्याही अर्ज शुल्काचा उल्लेख नाही.



मुलाखतीसाठी प्रक्रिया


मुलाखतीची ठिकाणे तीच राहणार आहेत. इतर सर्व केंद्रांसाठी आणि पदांसाठी थेट मुलाखती (वॉक-इन इंटरव्ह्यू) पूर्वी नियोजित तारखेला, म्हणजेच 15 डिसेंबर रोजीच होतील. मुलाखतीसाठी उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांनी संबंधित संयुक्त रुग्णालयात येताना, पदाचा स्पष्ट उल्लेख असलेला साध्या कागदावरील अर्ज, पदवी, वयाचा दाखला आणि अनुभव पत्रासह सर्व संबंधित कागदपत्रांच्या मूळ प्रती व छायाप्रती आणि तीन अलीकडील पासपोर्ट आकाराचे छायाचित्र सोबत आणणे अनिवार्य आहे. यासंदर्भात अधिक माहितीसाठी, उमेदवार rect.crpf.gov.in या संकेतस्थळाला भेट देऊ शकतात किंवा 01124368630 या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधू शकतात.

Comments
Add Comment

PM Kisan Yojana : 25व्या हप्त्यापूर्वी शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट ! Farmer ID नसेल तर काय होणार ? जाणून घ्या नियम

PM Kisan Samman Nidhi : पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून दरवर्षी ६

नागपूरमध्ये 3.74 कोटी रुपयांची फिल्मी स्टाईल चोरी, थरारक लुटीचा मध्य प्रदेशात 'असा' झाला पर्दाफाश!

नागपूर: नागपूर शहरामध्ये करण्यात आलेल्या कोट्यवधी रुपयांच्या चोरीचा पर्दाफाश मध्य प्रदेशातील बालाघाट

Prahaar Marathi News Live 25 November 2026: महाराष्ट्रासह देश-विदेशातील घडामोडी, एका क्लिकवर वाचा आजच्या घडामोडी!

Prahaar Marathi News Live दिनांक 25 नोव्हेंबर 2026 च्या लाईव्ह ब्लॉगमध्ये महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, स्थानिक बातम्या,

संविधान दिनी राज्यातील 11 गड-किल्ल्यांवर स्वच्छता अभियान! रायगडावर 'गडांचा मान, संविधानाचा सन्मान'

रायगड : भारतीय संविधानातील मूलभूत कर्तव्यांची जाणीव आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा ऐतिहासिक वारसा जतन

Uday Samant : ‘गाव तिथे उद्योजक’ योजना धाराशिवमधून सुरू होणार; नवउद्योजकांना 1 कोटीपर्यंत अर्थसहाय्य

धाराशिव : राज्यातील ग्रामीण भागात उद्योजकतेला चालना देण्यासाठी उद्योग विभागाच्या माध्यमातून ‘गाव तिथे

FDA Action : पुण्यातील इंडुकेअर फार्मास्युटिकलचे उत्पादन परवाने पुन्हा रद्द; परवानगीशिवाय 9 औषधांची निर्मिती केल्याचे उघड

पुणे : पुणे जिल्ह्यातील जेजुरी येथील इंडुकेअर फार्मास्युटिकल अँड रिसर्च फाउंडेशन या कंपनीवर अन्न व औषध