FDA Action : पुण्यातील इंडुकेअर फार्मास्युटिकलचे उत्पादन परवाने पुन्हा रद्द; परवानगीशिवाय 9 औषधांची निर्मिती केल्याचे उघड

विशेष म्हणजे, या औषधांची शासकीय विश्लेषकांकडून तपासणी करण्यात आली असता ती अप्रमाणित, चुकीचे लेबल लावलेली किंवा बनावट असल्याचे निष्पन्न झाले. 

पुणे : पुणे जिल्ह्यातील जेजुरी येथील इंडुकेअर फार्मास्युटिकल अँड रिसर्च फाउंडेशन या कंपनीवर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) पुन्हा एकदा कठोर कारवाई केली आहे. आवश्यक परवानगी नसताना 9 औषधांची निर्मिती आणि विक्री केल्याचे आढळल्यानंतर कंपनीचे औषध उत्पादन परवाने रद्द करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, या औषधांची शासकीय विश्लेषकांकडून तपासणी करण्यात आली असता ती अप्रमाणित, चुकीचे लेबल लावलेली किंवा बनावट असल्याचे निष्पन्न झाले.






9 औषधांच्या नमुन्यांमध्ये गंभीर त्रुटी


FDA च्या तपासणीत कंपनीने उत्पादन परवानगी नसतानाही 9 औषधांची निर्मिती केल्याचे समोर आले. या औषधांच्या नमुन्यांची शासकीय प्रयोगशाळेत चाचणी करण्यात आली. त्यामध्ये 'इब्युकेअर प्लस' आणि 'केअरव्हिटा-एम' या दोन औषधांमध्ये मूळ सक्रिय घटकच आढळून आले नाहीत. त्यामुळे ही औषधे बनावट घोषित करण्यात आली.


याशिवाय हृदयविकार, रक्तदाब आणि पचनसंस्थेच्या विकारांवर वापरल्या जाणाऱ्या इतर औषधांमध्येही सक्रिय घटकांचे प्रमाण कमी असणे आणि चुकीचे लेबलिंग यांसारख्या त्रुटी आढळल्या. त्यामुळे या औषधांच्या गुणवत्ता आणि सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.



यापूर्वीही कंपनीवर झाली होती कारवाई


सप्टेंबर 2026 मध्ये उत्तम उत्पादन पद्धतींचे (GMP) नियम पाळण्यात गंभीर त्रुटी आढळल्याने कंपनीचे परवाने रद्द करण्यात आले होते. तसेच पिंपरी-चिंचवड येथील वायसीएम रुग्णालयाच्या औषध भांडारातून 4 नोव्हेंबर 2026 रोजी सुमारे 1.72 कोटी रुपयांचा अप्रमाणित औषधसाठा जप्त करण्यात आला होता.



उत्पादन आणि वितरण बंद करण्याचे आदेश


सुनावणीनंतर परवाना प्राधिकरणाने 23 नोव्हेंबर 2026 रोजी कंपनीला औषधांचे उत्पादन, पॅकिंग, चाचणी आणि वितरण तातडीने बंद करण्याचे आदेश दिले. तसेच औषधे व सौंदर्यप्रसाधने कायदा, 1940 अंतर्गत कंपनीविरोधात न्यायालयीन कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे.


रुग्णांकडून तक्रारी आल्या नसल्या तरी कमी प्रभावी किंवा बनावट औषधांमुळे आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी अशा प्रकारच्या अनियमिततेविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असे FDA ने सांगितले आहे.


Comments
Add Comment

Philately quiz : 'विकास आणि वारसा' थीमवर रंगली फिलाटेली प्रश्नमंजुषा; विदर्भातील २० संघांचा सहभाग, विजेता संघ परिमंडळ स्तरावर झळकणार

नागपूर : तरुण पिढीमध्ये टपाल तिकीट संग्रहाची (फिलाटेली) गोडी निर्माण व्हावी आणि या माध्यमातून देशाचा गौरवशाली

Shivaji University Recruitment 2026 : शिवाजी विद्यापीठात नोकरीची संधी! शिववाणी कम्युनिटी रेडिओसाठी थेट मुलाखती

कोल्हापूर: कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठात नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. विद्यापीठाच्या ‘पद्मश्री ग. गो.

Railway News : रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! नगरसोल-तारूर मार्गावर 16 दिवसांचा ब्लॉक; अनेक गाड्या रद्द

ST प्रवाशांसाठी मोठा दिलासा! NCMC कार्डमध्ये धमाकेदार बदल, कोणाचे पैसे वाचणार आणि कसे?

महिला, ज्येष्ठ नागरिक आणि सवलतधारक प्रवाशांसाठी एसटी महामंडळाने सुरू केलेल्या नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड

शंभराव्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची धुरा शरणकुमार लिंबाळे यांच्याकडे; निवडणुकीविना ऐतिहासिक निवड!

पुणे: 100 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन येत्या 28 जानेवारी 2027 ते 31 डिसेंबर 2027 दरम्यान पुण्यातील सावित्रीबाई फुले

पेपरफुटीप्रकरणी १० कोटींचा दंड, १० वर्षांपर्यंत कारावासाची शिफारस

मुंबई : राज्यातील भरती आणि स्पर्धा परीक्षांमधील पेपरफुटी तसेच अन्य गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी कठोर