Maharashtra Cabinet Decision : आर्थिक फसवणूक प्रकरणांचा ९० दिवसांत निपटारा

- विभागीय स्तरावर ‘एमपीआयडी’ न्यायाधिकरण; दानपत्राचे मुद्रांक शुल्क ५०० रुपये, महसूल न्यायालयीन प्रकरणांसाठी ‘एक जिल्हा, एक अपील’ व्यवस्था

मुंबई : आर्थिक फसवणूक करणाऱ्या वित्तीय संस्थांच्या मालमत्ता जप्तीची प्रक्रिया जलद करण्यासाठी विभागीय स्तरावर स्वतंत्र एमपीआयडी न्यायाधिकरण स्थापन करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने बुधवारी घेतला. या न्यायाधिकरणाकडे दाखल होणारी प्रकरणे ९० दिवसांत निकाली काढण्याची कालमर्यादाही निश्चित करण्यात येणार आहे. यासाठी महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थांमधील) हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम, १९९९ मध्ये सुधारणा करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.


वित्तीय संस्थांकडून अवास्तव परताव्याचे आमिष दाखवून ठेवीदारांची फसवणूक केली जाते. अशा संस्थांवर कारवाई करण्यासाठी १९९९ मध्ये एमपीआयडी कायदा करण्यात आला. या कायद्यानुसार संबंधित संस्था आणि व्यक्तींच्या मालमत्ता जप्त करून विशेष न्यायालयाकडून जप्ती अंतिम केली जाते. त्यानंतर मालमत्तांच्या विक्रीतून मिळणाऱ्या रकमेतून फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांना पैसे परत केले जातात. मात्र, मालमत्ता जप्तीची प्रक्रिया जलद व्हावी यासाठी विशेष न्यायालयाऐवजी विभागीय स्तरावर स्वतंत्र न्यायाधिकरण स्थापन करण्याची तरतूद करण्यात येणार आहे. प्रकरण दाखल झाल्यापासून ९० दिवसांत त्याचा निकाल लावणे बंधनकारक करण्यासाठी सुधारणा विधेयक विधिमंडळात मांडण्यास मंजुरी देण्यात आली.


महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमातील विविध तरतुदींमध्ये एकरूपता आणण्यासाठीही सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार निवासी किंवा कृषी मालमत्ता पती, पत्नी, मुलगा, मुलगी, नातू, नात किंवा मृत मुलाची पत्नी यांच्या नावे दानपत्राद्वारे हस्तांतरित करताना आकारले जाणारे मुद्रांक शुल्क २०० रुपयांवरून ५०० रुपये करण्यात येणार आहे. मुद्रांक अधिनियमाच्या कलम ३२ (ब) आणि ५३ (१अ) अंतर्गत अपील दाखल करण्यासाठी आकारले जाणारे ३०० रुपयांचे शुल्क वाढवून एक हजार रुपये करण्यात येणार आहे. तसेच मुद्रांक शुल्क परताव्यासाठी अर्ज करण्याची मुदत सहा महिन्यांवरून एक वर्ष करण्यात येणार आहे. मुद्रांक खरेदी केल्यापासून ही मुदत लागू असेल. यासंबंधीच्या कायद्यात सुधारणा करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली.



महसूल प्रकरणांसाठी ‘एक जिल्हा, एक अपील’


- महसूल विभागातील अर्धन्यायिक प्रकरणांचा निपटारा जलद करण्यासाठी ‘महसूल न्यायालय दावा व्यवस्थापन प्रणाली’ लागू करण्यात येणार आहे. तसेच अनावश्यक अपिलांचे टप्पे कमी करण्यासाठी ‘एक जिल्हा, एक अपील’ ही व्यवस्था आणण्यात येणार आहे. यासाठी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ मध्ये सुधारणा करण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. महसूल विभागाच्या विविध स्तरांवर जमिनींसंदर्भातील अर्धन्यायिक प्रकरणे दीर्घकाळ प्रलंबित राहतात. त्यामुळे संबंधित जमिनींचा विकास, हस्तांतरण यांसारख्या व्यवहारांवर परिणाम होऊन नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतो.


- तसेच शासनाच्या महसुलाचेही नुकसान होते. ही स्थिती बदलण्यासाठी प्रकरणांच्या सुनावणीची प्रक्रिया ऑनलाइन करण्यात येणार आहे. महसूल न्यायालय दावा व्यवस्थापन प्रणालीच्या माध्यमातून प्रकरणांचे व्यवस्थापन आणि सुनावणी अधिक गतिमान करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. प्रकरणे निर्धारित वेळेत निकाली काढण्यासाठी अपिलांचे अनावश्यक टप्पे कमी करून ‘एक जिल्हा, एक अपील’ पद्धती लागू केली जाणार आहे. या बदलांसाठी जमीन महसूल संहितेत आवश्यक सुधारणा करण्यात येणार आहेत.

Comments
Add Comment

Pune Accident : पुण्यात भरधाव ट्रकची विद्यार्थ्यांना धडक; 3 जणांचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी

पुणे : पुणे जिल्ह्यातील येवलेवाडी परिसरात बुधवारी भीषण रस्ते अपघात घडला. ट्रिनिटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड

दुष्काळग्रस्त ३३ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना तीन महिने मोफत धान्य; मंत्रिमंडळाचा निर्णय

मुंबई : राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुंबई शहर, मुंबई उपनगर आणि ठाणे जिल्हा वगळता उर्वरित ३३

Chandrashekhar Bawankule : राज्यात ‘पूल तिथे बंधारा बंधनकारक

मुंबई : राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी यापुढे राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून

Single Mothers : एकल मातांच्या मुलांसाठी सरकारचा महत्त्वाचा निर्णय; राज्यातील 1,238 महाविद्यालयांत समुपदेशकांची नियुक्ती

मुंबई : एकल मातांच्या पाल्यांचे शिक्षण कोणत्याही अडचणीमुळे थांबू नये, यासाठी राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण

जात वैधता प्रमाणपत्राची प्रक्रिया आता पूर्णपणे ऑनलाइन; ऑफलाइन अर्ज ग्राह्य धरणार नाही

मुंबई : जात वैधता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी माराव्या लागणाऱ्या कार्यालयीन फेऱ्या आणि कागदपत्रांच्या प्रत्यक्ष

Aaple Sarkar Seva Kendra : ग्रामीण भागातील नागरिकांसाठी मोठी बातमी! प्राथमिक कृषी पतसंस्थांना मिळणार ‘आपले सरकार सेवा केंद्रा’चा दर्जा

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना शासकीय आणि डिजिटल सेवा गावातच उपलब्ध व्हाव्यात, यासाठी सरकारने