Pune Accident : पुण्यात भरधाव ट्रकची विद्यार्थ्यांना धडक; 3 जणांचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी

जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे महाविद्यालय परिसरात शोककळा पसरली आहे.

पुणे : पुणे जिल्ह्यातील येवलेवाडी परिसरात बुधवारी भीषण रस्ते अपघात घडला. ट्रिनिटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्चच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरील बस थांब्यावर उभ्या असलेल्या विद्यार्थ्यांना भरधाव ट्रकने धडक दिली. या दुर्घटनेत 3 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला, तर अन्य 2 विद्यार्थी गंभीर जखमी झाले. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे महाविद्यालय परिसरात शोककळा पसरली आहे.



बोपदेव घाटाच्या उतारावर ट्रकवरील नियंत्रण सुटले


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डीजेचे अवजड साहित्य घेऊन जाणारा ट्रक बोपदेव घाटावरून येवलेवाडीच्या दिशेने खाली येत होता. ट्रिनिटी कॉलेजच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ पोहोचताच चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटले. अनियंत्रित ट्रकने प्रथम एका कारला धडक दिली. त्यानंतर ट्रक रस्त्याच्या कडेला असलेल्या बस थांब्याकडे वळला. यावेळी बसची वाट पाहत असलेले विद्यार्थी ट्रकच्या धडकेत सापडले.



तीन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू


अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, महाविद्यालय प्रशासन आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या अपघातात 3 विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला. गंभीर जखमी झालेल्या अन्य 2 विद्यार्थ्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.



ट्रक जप्त; चालक पोलिसांच्या ताब्यात


येवलेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांनी अपघाताला दुजोरा दिला. पोलिसांनी अपघातात सहभागी ट्रक जप्त केला असून, चालक प्रतीक मारुती चव्हाण (वय 22, रा. माळशिरस, ता. पुरंदर) याला ताब्यात घेतले आहे. अपघातावेळी चालक मद्यधुंद होता का, हे तपासण्यासाठी त्याला वैद्यकीय तपासणीकरिता ससून रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.



अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास


प्राथमिक माहितीनुसार, घाटाच्या उतारावर ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचा अंदाज आहे. चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलीस पुढील तपास करत आहेत.



Comments
Add Comment

दुष्काळग्रस्त ३३ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना तीन महिने मोफत धान्य; मंत्रिमंडळाचा निर्णय

मुंबई : राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुंबई शहर, मुंबई उपनगर आणि ठाणे जिल्हा वगळता उर्वरित ३३

Chandrashekhar Bawankule : राज्यात ‘पूल तिथे बंधारा बंधनकारक

मुंबई : राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी यापुढे राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून

Single Mothers : एकल मातांच्या मुलांसाठी सरकारचा महत्त्वाचा निर्णय; राज्यातील 1,238 महाविद्यालयांत समुपदेशकांची नियुक्ती

मुंबई : एकल मातांच्या पाल्यांचे शिक्षण कोणत्याही अडचणीमुळे थांबू नये, यासाठी राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण

जात वैधता प्रमाणपत्राची प्रक्रिया आता पूर्णपणे ऑनलाइन; ऑफलाइन अर्ज ग्राह्य धरणार नाही

मुंबई : जात वैधता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी माराव्या लागणाऱ्या कार्यालयीन फेऱ्या आणि कागदपत्रांच्या प्रत्यक्ष

Aaple Sarkar Seva Kendra : ग्रामीण भागातील नागरिकांसाठी मोठी बातमी! प्राथमिक कृषी पतसंस्थांना मिळणार ‘आपले सरकार सेवा केंद्रा’चा दर्जा

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना शासकीय आणि डिजिटल सेवा गावातच उपलब्ध व्हाव्यात, यासाठी सरकारने

Anganwadi Workers: अंगणवाडी सेविका-मदतनीसांना आता 2 हजारांपर्यंत प्रोत्साहन भत्ता; नोव्हेंबरपासून नवे निकष लागू

मुंबई : अंगणवाडीतील बालकांचे पोषण, आरोग्य आणि शिक्षणासाठी अविरत कार्यरत असणाऱ्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस