Anganwadi Workers: अंगणवाडी सेविका-मदतनीसांना आता 2 हजारांपर्यंत प्रोत्साहन भत्ता; नोव्हेंबरपासून नवे निकष लागू

अंगणवाडीतील बालकांचे पोषण, आरोग्य आणि शिक्षणासाठी अविरत कार्यरत असणाऱ्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना दरमहा देण्यात येणाऱ्या प्रोत्साहन भत्त्याच्या निकषात सुधारणा करण्यात आल्याचे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले.

मुंबई : अंगणवाडीतील बालकांचे पोषण, आरोग्य आणि शिक्षणासाठी अविरत कार्यरत असणाऱ्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना दरमहा देण्यात येणाऱ्या प्रोत्साहन भत्त्याच्या निकषात सुधारणा करण्यात आल्याचे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले. राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांच्या कामांना गती देण्यासाठी राज्य सरकारने कामगिरीवर आधारित प्रोत्साहन भत्ता योजनेत सुधारणा केली आहे. राज्यात एकूण 1,10,664 अंगणवाड्या असून 1,08,627 अंगणवाडी सेविका आणि 1,05,470 अंगणवाडी मदतनीस कार्यरत आहेत. एकात्मिक बाल विकास सेवा योजनेची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचे गुणात्मक मूल्यमापन करून पात्र ठरणाऱ्याना दरमहा प्रोत्साहन भत्ता दिला जातो. या भत्त्याच्या निकषांमध्ये सर्वसमावेशकता, सुसूत्रता यावी तसेच अधिकाधिक सेविका आणि मदतनीस यासाठी पात्र ठराव्यात यासाठी निकषांमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या अध्यक्षतेतील समितीने घेतला आहे.







अंगणवाडी केंद्रांसाठी निर्धारित 10 निकषांपैकी किमान 7 निकष पूर्ण करणाऱ्या अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना अनुक्रमे 1400, 700 प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार आहे. तर सर्व 10 निकष पूर्ण केल्यास अनुक्रमे 2000, 1000 भत्ता देण्यात येणार आहे. 7 ते 10 दरम्यान निकष पूर्ततेनुसार भत्ता निश्चित करण्यात आला आहे. हे निकष नोव्हेंबर 2026 पासून लागू करण्यात आले आहेत.


अंगणवाडी केंद्रांच्या मूल्यमापनात समुदाय आधारित कार्यक्रम, घरपोच पोषण आहार, बालकांचे पूर्वशालेय शिक्षण, गरम ताजा आहार, आरोग्य दिवस, सकाळचा नाश्ता, अंगणवाडी केंद्राचे दैनंदिन कामकाज, बालकांचे वजन व उंचीची नोंद तसेच गृहभेटी या बाबींचा समावेश करण्यात आला आहे. या सर्व बाबींची पडताळणी पोषण ट्रॅकर ॲपवरील नोंदींच्या आधारे दरमहा केली जाणार आहे.



मंत्री आदिती तटकरे काय म्हणाल्या?


राज्याच्या शहरी आणि अतीदुर्गम भागातही अंगणवाडी सेविका आणि मदतनीस बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी काम करत आहेत. अधिकाधिक सेविका आणि मदतनीस भत्त्यासाठी पात्र ठरून त्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी निकषात सुधारणा करण्यात आल्या आहेत.

Comments
Add Comment

Aaple Sarkar Seva Kendra : ग्रामीण भागातील नागरिकांसाठी मोठी बातमी! प्राथमिक कृषी पतसंस्थांना मिळणार ‘आपले सरकार सेवा केंद्रा’चा दर्जा

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना शासकीय आणि डिजिटल सेवा गावातच उपलब्ध व्हाव्यात, यासाठी सरकारने

Kanda bajar bhav today : नवीन लाल कांद्याची आवक वाढताच दर घसरले; येवला आणि लासलगाव बाजार समितीत कांदा उत्पादक चिंतेत

येवला : नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना पुन्हा एकदा मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे.

पुढील पाच वर्षांत महाराष्ट्रात पायाभूत सुविधा क्षेत्रात 100 अब्ज डॉलर्स गुंतवणुकीचे उद्दिष्ट- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : शहरीकरण ही समस्या नसून आर्थिक आणि सामाजिक विकासाची मोठी संधी आहे. देशाच्या एकूण जीडीपीमध्ये शहरांचा वाटा

कोयनेचे पाणी मुंबईला आणण्याच्या आरोपांमध्ये तथ्य नाही - मंत्री गिरीश महाजन

मुंबई : कोयना धरणातील पाणी मुंबईला वळवले जात असल्याच्या आरोपांवर जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी बुधवारी

NCMC Smart Card : एनसीएमसी स्मार्ट कार्ड निविदा प्रक्रियेची संपूर्ण माहिती सादर करा; प्रताप सरनाईक यांचे एसटी प्रशासनाला निर्देश

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) NCMC स्मार्ट कार्ड प्रकल्पाच्या निविदा प्रक्रियेबाबत

मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय! 42 लाख शेतकऱ्यांना मोफत धान्य, नर्मदा-तापी वळण योजनेला 5548 कोटींची मंजुरी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बुधवार, २५ नोव्हेंबर २०२६ रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत