'त्या' एका फोटोमुळे मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांची उत्सुकता शिगेला; रोहित शर्मा पुन्हा कर्णधार होणार?

मुंबई इंडियन्सने ट्विट केलेल्या एका फोटोमुळे क्रीडाप्रेमींमध्ये चर्चेला उधाण आलं आहे. मुंबई इंडियन्सचा २०२७ चा कर्णधार पुन्हा एकदा रोहित शर्मा होणार अशा शक्यता चाहत्यांकडून वर्तवल्या जात आहेत.

मुंबई इंडियन्सने आपल्या आयपीएल 2027  साठीच्या कर्णधाराबद्दल उत्सुकता वाढवली आहे. मुंबई इंडियन्सने बुधवारी संध्याकाळी सोशल मीडियावर टाकलेल्या एका छोट्याशा पोस्टने क्रिकेट चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. पोस्टमध्ये फक्त एक अॅनिमेटेड हात दिसत आहे, ज्यात MI ची कॅप आहे. त्याला कोणतेही कॅप्शन नाही, कोणतंही स्पष्टीकरण नाही. पण चाहत्यांनी लगेच त्याचा अर्थ लावला - रोहित शर्मा पुन्हा कर्णधार होणार! मुंबईने आपली पाचही आयपीएल ट्रॉफी रोहितच्या नेतृत्वातच जिंकली आहे. 2013, 2015, 2017, 2019 आणि 2020 अशी पाच विजेतेपदं त्याच्या नावावर आहेत. त्यामुळे MI चा कॅप हातात घेणारा हात पाहून चाहत्यांना रोहितचीच आठवण झाली. तर काहींना 2013 च्या पहिल्या विजेतेपदानंतरचं त्याचं सेलिब्रेशन आठवलं.


खरं तर ही चर्चा सुरू होण्याचं कारणही तसंच आहे. हार्दिक पंड्या आता पंजाब किंग्जमध्ये गेला आहे. त्याच्या बदल्यात वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग मुंबईत आला आहे. हार्दिक गेल्यामुळे मुंबईच्या कर्णधारपदाची जागा रिकामी झाली आहे. 2024 मध्ये हार्दिक पंड्या परत आल्यावर रोहितकडून कर्णधारपद काढून घेण्यात आलं होतं. हार्दिकच्या पहिल्या सीझनमध्ये मुंबई 9 व्या स्थानी राहिली होती, 2025 मध्ये प्लेऑफमध्ये पोहोचली, पण 2020 नंतर ट्रॉफी जिंकता आली नाही.





कर्णधारपदासाठी सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्माचीही नावं पुढे होती. हार्दिक नसताना सूर्यकुमारने मुंबईचं नेतृत्व केलं होतं. तिलकला तर भारतीय T20 संघाचा उपकर्णधारही करण्यात आलं आहे, त्यामुळे तो दीर्घकालीन पर्याय मानला जात होता. पण आता सूत्रांनुसार रोहितचं नाव सगळ्यात पुढे आहे. त्याचा अनुभव आणि मुंबईसोबतचा विक्रम पाहता तोच नैसर्गिक पर्याय वाटतो. मात्र, ही फक्त शक्यता आहे. मुंबई इंडियन्सने अजून अधिकृत घोषणा केलेली नाही. सोशल मीडियावरील पोस्ट म्हणजे कर्णधारपदाची पुष्टी नाही, हे लक्षात ठेवायला हवं.मुंबईने आयपीएल 2027 च्या लिलावाआधी 16 खेळाडूंना कायम ठेवलं आहे. यात रोहित, सूर्यकुमार, तिलक, जसप्रीत बुमराह यांचा समावेश आहे. ट्रेंट बोल्ट आणि दीपक चहर यांना सोडण्यात आलं आहे. मुंबईकडे आता 32.60 कोटी रुपये शिल्लक आहेत. 16 डिसेंबरला गोव्यात होणाऱ्या लिलावाकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

Comments
Add Comment

World Heritage Week: लखनऊ राज्य संग्रहालयात जागतिक वारसा सप्ताहाचा समारोप; स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव

उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ येथील राज्य संग्रहालयात जागतिक वारसा सप्ताहाच्या निमित्ताने आयोजित

'या' रेल्वे शेअरमध्ये तुफान तेजी! एका दिवसात 20% वाढ, गुंतवणूकदारांचे लक्ष

बुधवारी शेअर बाजारात मोठी तेजी पाहायला मिळाली असून सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशकांनी मोठी उसळी घेतली

Modi cabinet decisions today : मोदी मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय! तब्बल १९,९३४ कोटींची तरतूद; देशांतर्गत उत्पादनाला मिळणार मोठी चालना

विमानतळ, बंदर विस्तार आणि टपाल सेवांच्या आधुनिकीकरणाचा आराखडा मंजूर नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM narendra Modi)

Yogi Adityanath : "कमळ हेच आमचे सर्वस्व; मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण, हे सर्वांनाच माहीत आहे" : योगी आदित्यनाथ यांचे ठाम वक्तव्य

मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्यावरून सुरू असलेल्या चर्चांना योगींचे उत्तर उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशमधील पुढील

Flipkart CEO : फ्लिपकार्टचे CEO कल्याण कृष्णमूर्ती पद सोडणार; 11 वर्षांच्या कार्यकाळात कंपनीची पाचपट वाढ

ई-कॉमर्स क्षेत्रातील आघाडीची कंपनी फ्लिपकार्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) कल्याण कृष्णमूर्ती आपल्या पदाचा

Gold Rate Today : सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण! चांदी 2.78 लाखांनी, तर सोने 70 हजारांनी स्वस्त; पाहा आजचे दर

सोने आणि चांदीच्या दरातील घसरण सुरूच आहे. मंगळवारी मोठी घसरण झाल्यानंतर मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर वायदे