अमेरिकेकडून आयात शुल्क जाहीर, भारतासाठी एक महत्त्वाची अट...

अमेरिकेच्या व्यापार प्रतिनिधींनी (USTR) भारतासह अनेक प्रमुख देशांवर 25 टक्क्यांपर्यंत टॅरिफ लादण्याचा प्रस्ताव मांडला आहे. पण अमेरिकेने भारतासमोर एक अट ठेवली आहे, जर ती अट पूर्ण झाल्यास दर 17 टक्क्यांपर्यंत येऊ शकतो.

मुंबई: अमेरिकेच्या व्यापार प्रतिनिधींनी (USTR) भारतासह अनेक प्रमुख देशांवर 25 टक्क्यांपर्यंत आयात शुल्क लावण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. जर, व्यापार करार झाल्यास हा दर 17 टक्क्यांपर्यंत येऊ शकतो. मात्र, अमेरिका प्रशासनाने घेतलेल्या ह्या निर्णयामुळे जागतिक व्यापारामध्ये पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, भारताकडून या निर्णयावरून असहमती दर्शवली आहे. अमेरिकेच्या व्यापार प्रतिनिधींच्या (USTR) नव्या धोरणामुळे जागतिक बाजारपेठेत मोठी उलथापालथ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.


रॉयटर्स वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, अमेरिकेने भारतीय वस्तूंवर 25 टक्क्यांपर्यंत आयात शुल्क (टॅरिफ) लादण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. भारतासह कंबोडिया, इंडोनेशिया, दक्षिण कोरिया, मलेशिया, तैवान आणि थायलंड या सहा देशांवरही 25 टक्क्यांपर्यंतच्या टॅरिफचा प्रस्ताव देण्यात आला आहे. चीनवर सर्वाधिक म्हणजेच, 40 टक्क्यांपर्यंत टॅरिफ वाढवण्याचा विचार पुढे आला आहे. या घडामोडींमुळे आयात- निर्यात क्षेत्रात चिंतेचे वातावरण पसरले असून आगामी काळात दोन्ही देशांमधील आर्थिक संबंधांवर याचा थेट परिणाम होऊ शकतो.






भारताच्या बाबतीत अमेरिकेने एक वेगळी अट किंवा पर्याय समोर ठेवला आहे. जर भारत आणि अमेरिका यांच्यात यशस्वी व्यापार करार (ट्रेड डील) झाला, तर हा टॅरिफ दर 17 टक्क्यांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. जर, करार होऊ शकला नाही, तर 25 टक्के टॅरिफ लागू होऊ शकतो. जर, भारत आणि अमेरिकेदरम्यान, व्यापार करार झाला तर, टॅरिफ रेट हा 17 टक्क्यांपर्यंत येणार ही बाब भारताच्या दृष्टीने दिलासादायक असेल. थोडक्यात सांगायचे तर, भारतावर किमान 17 टक्के टॅरिफचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणावर भारत सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. अतिरिक्त उत्पादन क्षमतेबाबत अमेरिकेने केलेले दावे भारताला मान्य नसून, हा प्रश्न केवळ परस्पर व्यापार चर्चेतूनच सोडवला गेला पाहिजे, असे भारताचे ठाम मत आहे.


इतर देशांसाठी प्रस्तावित केलेले टॅरिफ दरही लक्षवेधी आहेत. बांगलादेश, युरोपियन युनियन (EU), जपान, स्वित्झर्लंड आणि सिंगापूरसाठी 20 टक्क्यांपर्यंत, व्हिएतनामसाठी 35 टक्क्यांपर्यंत, तर चीनसाठी 40 टक्क्यांपर्यंत दर प्रस्तावित करण्यात आले आहेत. काही देशांसाठी कमाल मर्यादाही निश्चित करण्यात आली असून, कंबोडिया, इंडोनेशिया, मलेशिया, थायलंड आणि बांगलादेशसाठी हे दर कमाल 18 टक्क्यांपर्यंत मर्यादित राहतील. दक्षिण कोरिया, तैवान, युरोपियन युनियन (EU), जपान आणि स्वित्झर्लंडसाठी (मोस्ट फेवर्ड नेशन ड्यूटी वगळून) 15 टक्के दर असेल, तर चीनसाठी आधीच लागू असलेल्या शुल्कावर अतिरिक्त 20 टक्के दर आकारला जाईल. ब्राझील संदर्भातील प्रस्तावित बदलांवर 14 जानेवारी 2027 रोजी सुनावणी घेण्यात येणार आहे.






अमेरिका हे पाऊल का उचलत आहे, यामागे मोठी आर्थिक कारणे सांगितली जात आहेत. प्रमुख व्यापारी भागीदारांकडील अतिरिक्त औद्योगिक क्षमतेला आळा घालणे आणि व्यापार तूट (ट्रेड डिफिसिट) कमी करणे, हा यामागील मुख्य उद्देश असल्याचे अहवालात नमूद आहे. वॉल स्ट्रीट जर्नलने दिलेल्या वृत्तानुसार, डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने अनुदाने आणि सरकारी मदतीद्वारे देशांतर्गत उद्योगांना बळ देणाऱ्या देशांवरील शुल्क वाढवण्याची तयारी सुरू केली होती. अनेक महिन्यांच्या तपासानंतर अमेरिकेचा असा दावा आहे की, परदेशी उत्पादकांना मिळणाऱ्या अनुदानामुळे ते स्वस्तात वस्तू तयार करून मोठ्या प्रमाणावर आंतरराष्ट्रीय बाजारात पाठवतात, ज्यामुळे अमेरिकन उद्योगांची स्पर्धात्मकता आणि देशांतर्गत उत्पादन क्षेत्र कमकुवत होते. त्यामुळे या संभाव्य व्यापार संघर्षाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment

वीज प्रकल्प ठप्प आणि थेट लिबियापर्यंत ड्रोनचा तडाखा! रशिया-युक्रेन युद्धाचा भडका कुठे जाऊन थांबणार?

कीव : रशियाने बुधवारी युक्रेनच्या डोनबास फ्युएल अँड एनर्जी कंपनीच्या (डीटीईके) एका औष्णिक वीज प्रकल्पाला लक्ष्य

Strait of Hormuz explosion : होर्मुझ सामुद्रधुनीत मोठा अपघात : पाण्याखालील बॉम्बला धडकून चार तेलवाहू जहाजांचा स्फोट

तेहरान : जगभरातील तेल वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या 'होर्मुझ सामुद्रधुनी' या सागरी मार्गावर

Donald Trump advice to Huang : "मौन बाळगण्याऐवजी थेट खरं सांगा"; संसदीय चौकशीपूर्वी ट्रम्प यांचा हुआंग यांना सल्ला!

पुढील आठवड्यात अमेरिकन संसदेच्या (काँग्रेस) समितीसमोर साक्ष देण्यापूर्वी 'एनव्हीडिया'चे सीईओ जेन्सन हुआंग

Bus Truck Collision UAE: UAE मध्ये भीषण बस-ट्रक अपघात! 13 जणांचा मृत्यू, भारतीयांचाही समावेश

Bus Truck Collision UAE: संयुक्त अरब अमीरात (UAE) मधील रास अल खैमाह येथे एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला असून 14

Trump Tariff Threat: डोनाल्ड ट्रम्प 16 देशांना मोठा धक्का देण्याच्या तयारीमध्ये; नव्या टॅरिफ धोरणाचा भारतावरही परिणाम?

न्युयॉर्क: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा टॅरिफच्या शुल्कामध्ये वाढ करण्याच्या

अमेरिकेच्या CIA च्या डेटाबेसवर सायबर हल्ला! सुरक्षा यंत्रणेत खळबळ

मुंबई: अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेला मोठा धक्का देणारी घटना समोर आली असून, CIA च्या एका प्रणालीवर सायबर हल्ला