IPL ट्रेडिंगमध्ये मोठा धमाका! हार्दिक पांड्याचा RR व्यवहार का फिसकटला? शमी-आर्चर जोडीने रचला नवा डाव!

हार्दिक पांड्याला राजस्थान रॉयल्समध्ये घेण्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला असून, मुंबई इंडियन्सच्या अटींमुळे हा व्यवहार फिस्कटल्याचा अहवाल समोर आला आहे. दुसरीकडे, राजस्थान रॉयल्सने सॅम करनला सोडून मोहम्मद शमी आणि मनिमारन सिद्धार्थ यांना संघात घेत गोलंदाजी अधिक भक्कम केली आहे.

इंडियन प्रीमियर लीगच्या आगामी हंगामापूर्वी खेळाडूंच्या अदलाबदलीवरून (ट्रेड) मोठी उलथापालथ पाहायला मिळाली आहे. स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याला राजस्थान रॉयल्समध्ये घेण्याचा व्यवहार जवळपास निश्चित झाला होता, मात्र मुंबई इंडियन्सच्या मागणीमुळे तो फिसकटल्याचा दावा एका अहवालात करण्यात आला आहे. IPL रिटेन्शनच्या अंतिम मुदतीपूर्वी झालेल्या घडामोडींनंतर हार्दिक अखेरीस पंजाब किंग्सकडे गेला आणि बदल्यात वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग मुंबई इंडियन्समध्ये दाखल झाला.


हार्दिक पांड्या हा IPL 2026 पासून मैदानाबाहेर असून, यापूर्वी त्याचे नाव चेन्नई सुपर किंग्स, राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स या संघांशी जोडले गेले होते. मात्र, पंजाब किंग्सने बाजी मारत हा व्यवहार पूर्ण केला. या व्यवहारानंतर समोर आलेल्या एका अहवालानुसार, राजस्थान रॉयल्सकडेही हार्दिकला संघात घेण्याची संधी होती, परंतु वाटाघाटी पुढे जाऊ शकल्या नाहीत.


वृत्तानुसार, हार्दिक पांड्याच्या बदल्यात मुंबई इंडियन्सने राजस्थान रॉयल्सकडे यशस्वी जैस्वाल आणि जोफ्रा आर्चर या दोघांची मागणी केली होती. मुंबईच्या या अटी मान्य करण्यास राजस्थान रॉयल्सने स्पष्ट नकार दिला आणि हा व्यवहार पुढे न नेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे हार्दिकचा RR प्रवेश रखडला.



हार्दिकला संघात घेता आले नसले तरी, राजस्थान रॉयल्सने वेगळ्या पद्धतीने मोठा व्यवहार यशस्वी करून दाखवला. पहिल्या हंगामातील विजेत्या राजस्थानने इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू सॅम करनला लखनौ सुपर जायंट्स कडे पाठवले, तर बदल्यात वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि फिरकीपटू मनिमारन सिद्धार्थ यांना आपल्या ताफ्यात घेतले.


आर्थिक व्यवहाराच्या आकडेवारीनुसार, लखनौ सुपर जायंट्सने 10 कोटी रुपयांना घेतलेला मोहम्मद शमी आता 8 कोटी रुपयांच्या सुधारित किमतीत राजस्थान रॉयल्समध्ये खेळेल. डावखुरा फिरकीपटू मनिमारन सिद्धार्थ 75 लाख रुपयांच्या मूळ किमतीत लखनौकडून राजस्थानमध्ये येईल, तर सॅम करन 2.4 कोटी रुपयांच्या किमतीत लखनौ सुपर जायंट्सकडे जाईल.


या बदलामुळे राजस्थान रॉयल्सच्या वेगवान गोलंदाजीला मोठी धार मिळणार आहे. मोहम्मद शमी आणि जोफ्रा आर्चर यांची जोडी प्रतिस्पर्धी फलंदाजांसाठी धोकादायक ठरू शकते. विशेषतः आर्चरने 2024 च्या हंगामात राजस्थानसाठी सर्वाधिक बळी घेतले होते आणि त्याने आतापर्यंत 132 IPL सामन्यांत 145 बळी मिळवले आहेत. नवीन चेंडू हाताळण्याचा अनुभव आणि वेग यामुळे राजस्थानचे गोलंदाजी आक्रमण अधिक संतुलित झाले आहे.

Comments
Add Comment

क्रीजवर कोणीच नाही, तरीही बॉल टाकला अन् फलंदाज OUT! क्रिकेटमधील हा अजब नियम तुम्हाला माहिती आहे का? VIDEO

वुमन्स बिग बॅश लीग 2026 स्पर्धेतील 33 व्या सामन्यात मेलबर्न रेनेगेड्स आणि ब्रिस्बेन हीट यांच्यात लढत झाली. या

केन विल्यमसन आता थेट मुख्य प्रशिक्षकाच्या भूमिकेत; SA20 मध्ये नवी इनिंग!

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील शांत आणि संयमी नेतृत्व म्हणून ओळखल्या जाणाऱ्या केन विल्यमसनने आता एका नव्या आणि

उधार घेतलेली बॅट अन् बदललेलं नाव! दुसऱ्या कसोटीपूर्वी ऋषभ पंतने न्यूझीलंडमध्ये खेळला लोकल सामना; VIDEO व्हायरल

भारत न्यूझीलंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना 27 नोव्हेंबरपासून क्राइस्टचर्च येथे सुरू होमार आहे. या

IND vs SL Semifinal Live Streaming: फायनलच्या तिकिटासाठी भारत-श्रीलंका भिडणार! कधी, कुठे पाहता येणार सामना?

भारत ए संघाने साखळी फेरीच्या शेवटच्या सामन्यात युएईचा सात गडी राखून धुव्वा उडवत आशिया कप रायझिंग स्टार्स 2026 च्या

ACC Men's Asia Cup Rising Stars 2026 : भारताला उपांत्य फेरीत श्रीलंकेचे आव्हान

भारत 'ए' संघाने युएईला पराभूत करून एसीसी मेन्स रायझिंग स्टार्स आशिया कपच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. नेपाळ आणि

IND vs NZ: क्राइस्टचर्च कसोटीपूर्वी टीम इंडियाने सराव केला रद्द, कारण असं की...

भारत न्यूझीलंड यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना अनिर्णित ठरला. त्यामुळे