ACC Men's Asia Cup Rising Stars 2026 : भारताला उपांत्य फेरीत श्रीलंकेचे आव्हान

युएई आणि नेपाळला पराभूत केल्यानंतर भारत 'ए' संघाने एसीसी मेन्स रायझिंग स्टार्स आशिया कपच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला असून, त्यांचा सामना अपराजित राहिलेल्या श्रीलंका 'ए' संघाशी दोहा येथील वेस्ट एंड पार्क स्टेडियमवर होणार आहे.

भारत 'ए' संघाने युएईला पराभूत करून एसीसी मेन्स रायझिंग स्टार्स आशिया कपच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. नेपाळ आणि युएईला पराभवाची धूळ चारत भारताने उपांत्य फेरीत स्थान मिळवलं आहे. उपांत्य फेरीत भारताचा सामना श्रीलंका 'ए' संघाशी होणार आहे. आतापर्यंत श्रीलंकेच्या संघाने स्पर्धेत एकही सामना गमावलेला नाही. त्यात भारताने साखळी फेरीत पाकिस्तानविरुद्ध सामना गमावला आहे. त्यामुळे या लढतीकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यातील सामना दोहा येथील वेस्ट एंड पार्क आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जाईल. या सामन्यात दोन्ही संघ सामना जिंकून अंतिम फेरीत स्थान मिळवण्यासाठी प्रयत्न करतील. दुसरीकडे, पाकिस्तानचा सामना बांगलादेशशी होणार आहे. हा सामना 27 नोव्हेंबरल होणार आहे.  त्यामुळे उपांत्य फेरीत भारत आणि पाकिस्तानने विजय मिळवला तर अंतिम फेरीत पुन्हा एकदा पारंपरिक प्रतिस्पर्धी भिडतील.

स्पर्धेच्या 'ब' गटात असलेल्या भारतीय संघाने पहिल्या सामन्यात नेपाळला पराभूत केले. प्रथम फलंदाजी करताना, तिलक वर्मा आणि कुमार कुशाग्र यांच्या शतकांच्या जोरावर भारताने नेपाळसमोर 333 धावांचे लक्ष्य ठेवले होते.या विशाल धावसंख्येचा पाठलाग करताना, नेपाळ पहिल्याच षटकापासून बॅकफूटवर गेला. प्रिन्स यादव आणि हर्षित राणा यांच्या भेदक गोलंदाजीमुळे नेपाळचा संघ केवळ 26  धावांवर सर्वबाद झाला आणि सामना गमावला. त्यानंतर, दुसऱ्या सामन्यात भारताचा सामना पाकिस्तानशी झाला. या सामन्यात टीम इंडियाला पराभवाला सामोरे जावे लागले होते. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने भारतासमोर 314 धावांचे लक्ष्य ठेवले. भारतीय संघाकडून शहबाज अहमद आणि अभिषेक शर्मा यांनी अर्धशतके झळकावली, तर कर्णधार तिलक वर्माने शतक केले. पण, भारताला विजय मिळवण्यासाठी हे पुरेसे नव्हते. भारत हा सामना 48 धावांनी गमावला. भारताचा गटातील शेवटचा सामना युएईविरुद्ध होता. भारतासाठी हा 'करा किंवा मरा' सामना होता. प्रथम फलंदाजी करताना युएईने भारतासमोर 250 धावांचे लक्ष्य ठेवले, जे भारतीय संघाने वैभव सूर्यवंशीच्या (53 चेंडूंत 204 धावा) धडाकेबाज खेळीच्या जोरावर अवघ्या 14.2 षटकांत पूर्ण करून उपांत्य फेरीत आपले स्थान निश्चित केले.






श्रीलंकेने 'ए' गटात वर्चस्व गाजवले असून ते आतापर्यंत स्पर्धेत अपराजित राहिले आहेत. पहिल्या सामन्यात श्रीलंकेने अफगाणिस्तानला एकतर्फी सामन्यात सहा गडी राखून पराभूत केले.दुसऱ्या सामन्यात त्यांनी हाँगकाँग आणि चीनला 24 धावांनी पराभूत केले. श्रीलंकेचा गटातील तिसरा आणि अंतिम सामना बांगलादेशविरुद्ध होता. दरम्यान, श्रीलंकेने सात गडी राखून सामना जिंकून अंतिम चारमध्ये प्रवेश केला असून, आता त्यांचा सामना भारताशी होईल.

दोन्ही संघांचे खेळाडू


श्रीलंका ए संघ: लसिथ क्रूसपुल्ले, सिनेथ जयवर्धने, निशान मदुष्का (यष्टीरक्षक), पवन रथनायके (कर्णधार), निपुन धनंजय, जनिथ लियानागे, वनुजा सहन, लाहिरू समरकून, रविंदू फर्नांडो, दुलाज समुदिथा, विजयकांत व्यासकांत, गरुका संकेथ, दुविंदू रणतुंगा, शरुजन षण्मुगनाथन, चामिका हीनतिगाला.

भारत ए संघ: वैभव सूर्यवंशी, अभिषेक शर्मा, प्रभसिमरन सिंग, तिलक वर्मा (कर्णधार), कुमार कुशाग्र (यष्टीरक्षक), रिंकू सिंग, सूर्यांश शेडगे, शाहबाज अहमद, हर्ष दुबे, हर्षित राणा, अर्शद खान, आयुष बडोनी, तनुष कोटियन, प्रिन्स यादव, विप्रज निगम
Comments
Add Comment

IND vs NZ: क्राइस्टचर्च कसोटीपूर्वी टीम इंडियाने सराव केला रद्द, कारण असं की...

भारत न्यूझीलंड यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना अनिर्णित ठरला. त्यामुळे

अवघ्या 53 चेंडूंमध्ये 204 धावा आणि 28 षटकार; पोराच्या वादळाने सूर्यकुमार यादवही म्हणाला, "आता तू माझी प्रेरणा आहेस"

दोहा येथे सुरू असलेल्या एसीसी रायझिंग स्टार्स आशिया कप 2026 मध्ये भारताच्या युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीने संयुक्त

Vaibhav Sooryavanshi: सर्वात जलद द्विशतकानंतर वैभव सूर्यवंशीचे नवे टार्गेट; आता मोडणार 'हे' दोन मोठे विक्रम?

[caption id="attachment_1079042" align="aligncenter" width="800"] वैभव सूर्यवंशीच्या बाबतीत मूर्ती लहान पण किर्ती महान ही म्हण तंतोतंत लागू होते. आशिया

सेहवागच्या लेकाची धमाकेदार एन्ट्री, तर स्टार्क-हेड बाहेर! IPL 2027 च्या लिलावापूर्वी सर्वात मोठे ट्विस्ट!

मुंबई: आयपीएल 2027 (IPL 2027) च्या लिलावासाठी अवघे काही दिवस शिल्लक असताना क्रिकेट वर्तुळातून एक महत्त्वाची बातमी समोर

IPL 2027: पारस म्हाम्ब्रे पंजाब किंग्सचे गोलंदाजी प्रशिक्षक होणार! मिनी लिलावापूर्वी घडामोडींना वेग

आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात पंजाब किंग्स फ्रेंचायझी सुरूवातीपासून खेळत आहे. मात्र मागच्या 19 पर्वात पंजाब

अहिल्यानगरमध्ये कुस्तीचा थरार! 191 कुस्तीपटूंची जिल्हास्तरीय निवड चाचणी

अहिल्यानगर (प्रतिनिधी) : अहिल्यानगर जिल्हा कुस्तीगीर संघाच्या वतीने भिस्तबाग, पवननगर येथील संभाजी महाराज कुस्ती