CJP : सौरभ दास यांचा लंडन प्रवास रोखला! CJP च्या तीन नेत्यांविरोधात LOC जारी

या प्रकरणाच्या तपासासाठी तिघांची चौकशी आवश्यक असल्याने त्यांना देशाबाहेर जाण्यापासून रोखण्यासाठी LOC जारी केल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

मुंबई : मुंबई पोलिसांनी सिटिझन्स फॉर जस्टिस अँड पीस (CJP) या संस्थेचे अध्यक्ष अभिजित दीपके, सौरभ दास आणि आशुतोष रांका यांच्याविरोधात लुक आऊट सर्क्युलर (LOC) जारी केले आहे. गांधी जयंतीच्या दिवशी मुंबईत पूर्वपरवानगीशिवाय आंदोलन केल्याच्या आरोपावरून पोलिसांनी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाच्या तपासासाठी तिघांची चौकशी आवश्यक असल्याने त्यांना देशाबाहेर जाण्यापासून रोखण्यासाठी LOC जारी केल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.



आंदोलनाप्रकरणी मुंबई पोलिसांची कारवाई


मिळालेल्या माहितीनुसार, हे LOC चार ते पाच दिवसांपूर्वी जारी करण्यात आले. तपासादरम्यान संबंधित व्यक्तींची चौकशी करण्याची गरज भासू शकते. त्यामुळे त्यांची देशात उपस्थिती आवश्यक असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.



सौरभ दास यांना विमानतळावर रोखले


या प्रकरणाची माहिती केंद्र सरकारने दिल्ली उच्च न्यायालयात दिली आहे. मुंबई पोलिसांनी CJP चे सह-संयोजक सौरभ दास यांच्याविरोधात 23 नोव्हेंबर रोजी LOC जारी केले होते. त्यामुळे त्यांना लंडनला जाण्यापासून दिल्ली विमानतळावर रोखण्यात आल्याचे न्यायालयात सांगण्यात आले.


केंद्र सरकारच्या वकिलांनी सुनावणीदरम्यान सांगितले की, सौरभ दास यांना या संदर्भात कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. मात्र, त्यांनी अद्याप त्याला उत्तर दिलेले नाही. दुसरीकडे, दास यांच्या वकिलांनी न्यायालयात असा युक्तिवाद केला की, त्यांच्या अशिलाला LOC जारी केल्याची माहिती देण्यात आली नव्हती. तसेच ते जारी करण्यामागील कारणही स्पष्ट करण्यात आले नव्हते.



ऑक्सफर्ड विद्यापीठातील कार्यक्रमासाठी जाणार होते लंडनला


सौरभ दास यांनी दाखल केलेल्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठातील एका कार्यक्रमात ‘झुरळांची चळवळ’ या विषयावर बोलण्यासाठी ते ब्रिटनला जाणार होते. मात्र, 23 नोव्हेंबरच्या रात्री लंडनला जाणाऱ्या विमानात बसण्यापूर्वी दिल्ली विमानतळावर आपल्याला थांबवण्यात आल्याचा दावा त्यांनी याचिकेत केला आहे.


या प्रकरणाची पुढील सुनावणी 9 डिसेंबर रोजी होणार आहे. LOC जारी करण्यामागील कारणे आणि त्यासंदर्भातील कायदेशीर बाबींवर न्यायालयात पुढील सुनावणीदरम्यान चर्चा होण्याची शक्यता आहे.


Comments
Add Comment

Forced landing in Hyderabad : हैदराबादमध्ये प्रशिक्षण विमानाचं फोर्स लँडिंग; विद्यार्थी पायलट जखमी

हैदराबादमध्ये गुरुवारी एका प्रशिक्षण विमानाला फोर्स लँडिंग करावं लागलं. तेलंगणा राज्य विमानन अकादमीचं (Telangana State

रिझर्व्ह बँकेकडून परदेशातील 60 टन सोनं मायदेशात परत; भारताचा 84 टक्के सुवर्णसाठा आता देशांतर्गत तिजोरीत

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्यातील गुंतवणूक ही सर्वात सुरक्षित मानली जाते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर

Maharashtra Drought Relief : महाराष्ट्रातील 96.48 लाख शेतकऱ्यांना 4,824 कोटींची दुष्काळ मदत; पात्र शेतकरी वंचित राहणार नाहीत

मुंबई : राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारकडून दुष्काळ अग्रीम मदतीचे वितरण सुरू आहे.

राज्यात 174 नव्या डिजिटल सेवांचा शुभारंभ! 26 जानेवारीपर्यंत सरकारी कामकाजात मोठा बदल; मुख्यमंत्र्यांची घोषणा

राज्यातील शासकीय सेवा आणि योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत पारदर्शक, गतिमान आणि मानवी हस्तक्षेप कमीत कमी ठेवून

"जे हातात संविधान घेऊन फिरत आहेत...", केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी विरोधी पक्षांवर जोरदार हल्ला चढवला

संविधान दिनानिमित्त दिल्लीत आयोजित एका कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी विरोधी पक्षांवर जोरदार

Raigad News : फ्लॅट नव्हे, गावाच्या पद्धतीनुसार घरे बांधणार; दरडग्रस्तांच्या पुनर्वसनाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्राधान्य

रायगड: दरड दुर्घटनांमध्ये घरांचे नुकसान झालेल्या कुटुंबांना आता फ्लॅट पद्धतीने नव्हे, तर त्यांच्या गावाच्या