रिझर्व्ह बँकेकडून परदेशातील 60 टन सोनं मायदेशात परत; भारताचा 84 टक्के सुवर्णसाठा आता देशांतर्गत तिजोरीत

गेल्या काही दिवसात सोन्याच्या दरात चढउतार पाहायला मिळत आहे. असं असताना आरबीआयने मागच्या सहा महिन्यात 60 टन सोनं भारतात परत आणलं आहे. यामुळे देशातील सुवर्णसाठा 84 टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्यातील गुंतवणूक ही सर्वात सुरक्षित मानली जाते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर काहीही उलथापालथ झाली तर त्याचे थेट परिणाम सोन्याच्या किमतीवर दिसून येत असतात. गेल्या काही दिवसात सोन्याच्या दरात सातत्याने घसरण होत आहे. अशा स्थितीत भारतीय रिझर्व्ह बँकेने एक उल्लेखनीय कामगिरी केली आहे. गेल्या सहा महिन्यात आरबीआयने परदेशातून 60 टक्के सोनं मायदेशी परत आणलं आहे. त्यामुळे आरबीआयच्या एकूण सुवर्णसाठ्यापैकी जवळपास 84 टक्के साठा आता देशांतर्गत तिजोरीत आहे. यापूर्वी हा वाटा 77 टक्क्यांपेक्षा किंचित अधिक होता. त्यामुळे भारत आता आपल्या सुवर्णसाठ्याचा एक मोठा भाग देशांतर्गत साठवत असल्याचं दिसून येत आहे. आरबीआयने हे पाऊल जागतिक आर्थिक आणि राजकीय अनिश्चिततेच्या काळात उचललं आहे. या निर्णयामागील मुख्य कारण म्हणजे आपला सुवर्णसाठा देशातच सुरक्षित ठेवणे हा आहे. जगभरातील तणाव आणि युद्धजन्य स्थितीत आर्थिक अनिश्चिततता आहे. त्यामुळे परदेशात साठवलेलं सोनं अडचणीत येऊ शकते. त्यामुळे भारताला आपल्या सोन्याचा मोठा हिस्सा आता देशांतर्गत ठेवायचा आहे. कारण गरज पडल्यास त्यावर सहज नियंत्रण मिळवता येईल.

सोन्याच्या साठ्यात वाढ झाली आहे का?


रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, मार्च ते सप्टेंबर 2026 या कालावधीत परदेशातून 60.08 टन सोने मायदेशात परत आणण्यात आले आहे. सप्टेंबर 2026 अखेर आरबीआयकडे एकूण 880.52 टन सुवर्णसाठा असून, त्यापैकी तब्बल 740.13 टन सोने आता भारताच्या तिजोरीत सुरक्षित आहे, तर उर्वरित सोने अद्याप परदेशात आहे. मात्र, या प्रक्रियेमुळे भारताच्या एकूण सुवर्णसाठ्यात कोणतीही नवी भर पडलेली नाही; परदेशात साठवलेले आपलेच सोने केवळ देशात परत आणले गेले आहे. यापूर्वी,2025-26 या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीत १०४ टन सोने भारतात परत आणण्यात आले होते.





आंतरराष्ट्रीय बाजारात सोने 9 टक्क्यांनी गडगडले


एप्रिल ते सप्टेंबर 2026 या सहा महिन्यांच्या कालावधीत आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात मोठे चढ-उतार पाहायला मिळाले असून, एकूणच सोन्याचे दर खाली आले आहेत. एप्रिलमध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा सरासरी दर प्रति ट्रॉय औंस (सुमारे 31.10 ग्रॅम) 4721 डॉलर इतका होता, तो सप्टेंबरअखेर सुमारे 9 टक्क्यांनी घसरून 4,319 डॉलर प्रति ट्रॉय औंसवर आला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोने मोजण्यासाठी 'ट्रॉय औंस' हे एकक वापरले जाते (1 ट्रॉय औंस म्हणजे सुमारे 31.10 ग्रॅम, म्हणजेच जवळपास तीन तोळे सोने).अमेरिकी ट्रेझरी बाँड्सवरील वाढता परतावा, डॉलरची मजबुती आणि व्याजदर वाढीची भीती यांमुळे सोन्याच्या किमतींवर दबाव निर्माण झाला आहे. सुरक्षित गुंतवणूक आणि पोर्टफोलिओमध्ये विविधता आणण्यासाठी सोन्याला मागणी कायम असली, तरी जागतिक बाजारात दर दबावाखालीच राहिले आहेत.
Comments
Add Comment

मोदी सरकारकडून संसदेचे विशेष अधिवेशन! लोकसभा 30 नोव्हेंबर, तर राज्यसभा 2 डिसेंबरला होणार

केंद्र सरकारने लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभा सभापतींना संसदेची दोन्ही सभागृहे पुन्हा बोलावण्याची विनंती केली

Forced landing in Hyderabad : हैदराबादमध्ये प्रशिक्षण विमानाचं फोर्स लँडिंग; विद्यार्थी पायलट जखमी

हैदराबादमध्ये गुरुवारी एका प्रशिक्षण विमानाला फोर्स लँडिंग करावं लागलं. तेलंगणा राज्य विमानन अकादमीचं (Telangana State

"जे हातात संविधान घेऊन फिरत आहेत...", केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी विरोधी पक्षांवर जोरदार हल्ला चढवला

संविधान दिनानिमित्त दिल्लीत आयोजित एका कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी विरोधी पक्षांवर जोरदार

सपा-काँग्रेस युतीवर सुधांशू त्रिवेदींचा जोरदार टोला; 10 मिनिटांत बैठक संपतेय, मग जागावाटप कसे होणार?

उत्तर प्रदेशच्या राजकारणात समाजवादी पक्ष (सपा) आणि काँग्रेस यांच्यातील जागावाटपाच्या चर्चेवरून सुरू असलेल्या

दिल्लीत बाटली-गुटख्यावर नवे नियम! जास्तीचे पैसे भरा आणि रिकामे पॅकेट परत देऊन मिळवा रिफंड?

राजधानी दिल्लीतील प्लास्टिक आणि इतर कचऱ्याची समस्या आटोक्यात आणण्यासाठी दिल्ली सरकारने एका नव्या संकल्पनेवर

Uttarakhand Government : उत्तराखंड सरकारचे 5 वर्षांचे रिपोर्ट कार्ड जाहीर; 36 हजारांहून अधिक तरुणांना सरकारी नोकऱ्या

उत्तराखंडमधील मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने गेल्या 5 वर्षांतील कामगिरीचा अहवाल