Devendra Fadnavis : न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी तीन सदस्यीय समिती - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्णय

न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या संघटनांसोबत बैठक

मुंबई : दुय्यम न्यायालयातील कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत शासन संवेदनशील आहे. मागण्यांची पूर्तता करण्यासाठी शासनाने एक पाऊल पुढे टाकले आहे. या मागण्यांबाबत यापूर्वी उच्च न्यायालयाने गठित केलेल्या समितीचा अहवाल प्राप्त झाला असून या अहवालातील शिफारशींच्या अंमलबजावणीसाठी तीन सदस्यांची समिती स्थापन करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी सांगितले.


सह्याद्री अतिथिगृह येथे दुय्यम न्यायालयातील कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधी सोबत आयोजित बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. बैठकीला विधी व न्याय राज्यमंत्री आशिष जयस्वाल उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, उच्च न्यायालयाच्या गठित समितीच्या अहवालाच्या शिफारशीवर अंमलबजावणी करण्याकरिता स्थापन करण्यात येणाऱ्या समितीमध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे महाप्रबंधक, विधी व न्याय विभागाचे प्रधान सचिव आणि वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव असतील. या समितीला आपला अहवाल सादर करण्यासाठी निश्चित कालावधी देण्यात येईल. या नवीन गठीत होणाऱ्या समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर यावर सकारात्मक कार्यवाही करण्यात येईल.






मुंबई उच्च न्यायालयाने त्यांच्याकडे सबंधित कर्मचाऱ्यांच्या आलेल्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी यापूर्वी दोन न्यायाधीश यांची समिती स्थापन केली होती. या समितीने दिलेल्या अहवालातील शिफारशी लागू करण्याबाबत सर्वांग विचार होणे गरजेचे आहे. निर्णय घेण्याआधी शासनातील अन्य विभागात कार्यरत त्याच संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणीचा तुलनात्मक अभ्यास करावा लागेल. तसेच या निर्णयामुळे राज्याच्या तिजोरीवर येणारा आर्थिक ताण लक्षात घ्यावा लागेल. ही समिती याबाबत सखोल अभ्यास करून निश्चित कालावधीत आपला अहवाल सादर करेल, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

Comments
Add Comment

Auto Rickshaw Scheme : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार रिक्षा व्यवसायाची संधी; 5 वर्षांत 1 लाख रिक्षांचे वाटप

मुंबई : दुष्काळ, शेतीमालाला कमी भाव आणि वाढता उत्पादन खर्च यामुळे आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या शेतकरी

हजारो दिवे आणि मशालींनी रायगड कसा उजळला, थरारक सोहळा पाहून डोळ्यांचे पारणे फिटेल; पाहा Video

रायगड: हिंदवी स्वराज्याचे अस्मिता आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देणारा दुर्गराज रायगडावर

Caste Validity Certificate: जात वैधता प्रमाणपत्रासाठी आता सरकारी कार्यालयांचे हेलपाटे बंद! अर्जापासून सुनावणीपर्यंत संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन होणार

जात वैधता प्रमाणपत्र मिळवण्यासाठी विद्यार्थी आणि नागरिकांना करावी लागणारी सरकारी कार्यालयांची धावपळ आता कमी

NCMC कार्डधारकांसाठी खुशखबर! 11.80 रुपयांचे कमिशन बंद, रिचार्जची मर्यादा कमी झाली

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) एनसीएमसी (National Common Mobility Card) कार्ड वापरणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाचा

Prahaar Marathi News Live 26 November 2026: महाराष्ट्रासह देश-विदेशातील घडामोडी, एका क्लिकवर वाचा आजच्या घडामोडी!

Prahaar Marathi News Live दिनांक 26 नोव्हेंबर 2026 च्या लाईव्ह ब्लॉगमध्ये महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, स्थानिक बातम्या,

Nitesh Rane : गोसीखुर्द जलाशयाच्या मत्स्यविकासासाठी 1 ते 2 महिन्यांत डीपीआर तयार करा; मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

भंडारा : भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्द जलाशय आणि मामा तलाव परिसरातील मत्स्यव्यवसायाला चालना देण्यासाठी राज्य