Prahaar Marathi News Live 26 November 2026: महाराष्ट्रासह देश-विदेशातील घडामोडी, एका क्लिकवर वाचा आजच्या घडामोडी!

Prahaar Marathi News Live Updates: राज्यातील ताज्या राजकीय हालचाली, हवामान अंदाज, मुंबई-पुण्यासह राज्याच्या कानाकोपऱ्यातील महत्त्वाच्या बातम्या आणि देश-विदेशातील सर्वात वेगवान लाईव्ह अपडेट्स येथे पाहा.

Prahaar Marathi News Live दिनांक 26 नोव्हेंबर 2026 च्या लाईव्ह ब्लॉगमध्ये महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, स्थानिक बातम्या, राष्ट्रीय राजकारण, अर्थजगत, क्रीडा आणि मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडींचे थेट प्रक्षेपण उपलब्ध करून देण्यात आले आहे. दिवसभरातील सर्व ब्रेकिंग न्यूज आणि महत्त्वाच्या घडामोडींचा सविस्तर आढावा एका क्लिकवर
LIVE UPDATES

Prahaar Marathi News Live, 26 November 2026: जात वैधता प्रमाणपत्रासाठी आता सरकारी कार्यालयांचे हेलपाटे बंद! अर्जापासून सुनावणीपर्यंत संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन

जात वैधता प्रमाणपत्र मिळवण्यासाठी विद्यार्थी आणि नागरिकांना आता सरकारी कार्यालयांच्या फेऱ्या मारण्याची गरज भासणार नाही. राज्य सरकारने जात प्रमाणपत्र पडताळणीची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन करण्याचा निर्णय घेतला आहे. नव्या नियमानुसार यापुढे ऑफलाइन अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. अर्जदारांना आवश्यक कागदपत्रे ऑनलाइन अपलोड करता येणार असून, अर्जाची स्थितीदेखील घरबसल्या तपासता येणार आहे.

Prahaar Marathi News Live, 26 November 2026: एसटीच्या NCMC कार्डधारकांसाठी खुशखबर! ११.८० रुपयांचे कमिशन बंद, रिचार्जची मर्यादा ५ रुपयांवर

एसटी महामंडळाने NCMC कार्डधारकांना मोठा दिलासा दिला आहे. कार्ड रिचार्ज करताना आकारले जाणारे ११.८० रुपयांचे अतिरिक्त कमिशन रद्द करण्यात आले असून, किमान रिचार्जची मर्यादा ५० रुपयांवरून थेट ५ रुपयांपर्यंत कमी करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांना आता गरजेनुसार कमी रकमेचे रिचार्ज करता येणार असून, या निर्णयामुळे एसटी प्रवाशांची अतिरिक्त शुल्कातून सुटका होणार आहे.

Comments
Add Comment

Nitesh Rane : गोसीखुर्द जलाशयाच्या मत्स्यविकासासाठी 1 ते 2 महिन्यांत डीपीआर तयार करा; मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

भंडारा : भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्द जलाशय आणि मामा तलाव परिसरातील मत्स्यव्यवसायाला चालना देण्यासाठी राज्य

Nitesh Rane : उजनी धरण परिसरासह पंढरपुरात आधुनिक मत्स्य बाजार उभारणार; महिनाभरात प्रस्ताव सादर करण्याचे मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरण परिसर आणि पंढरपूर भागातील मच्छीमारांसाठी आधुनिक मत्स्य बाजार

Maharashtra Cabinet Decision : आर्थिक फसवणूक प्रकरणांचा ९० दिवसांत निपटारा

मुंबई : आर्थिक फसवणूक करणाऱ्या वित्तीय संस्थांच्या मालमत्ता जप्तीची प्रक्रिया जलद करण्यासाठी विभागीय स्तरावर

Pune Accident : पुण्यात भरधाव ट्रकची विद्यार्थ्यांना धडक; 3 जणांचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी

पुणे : पुणे जिल्ह्यातील येवलेवाडी परिसरात बुधवारी भीषण रस्ते अपघात घडला. ट्रिनिटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड

दुष्काळग्रस्त ३३ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना तीन महिने मोफत धान्य; मंत्रिमंडळाचा निर्णय

मुंबई : राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुंबई शहर, मुंबई उपनगर आणि ठाणे जिल्हा वगळता उर्वरित ३३

Chandrashekhar Bawankule : राज्यात ‘पूल तिथे बंधारा बंधनकारक

मुंबई : राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी यापुढे राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून