Dry Fruits Benefits: बदाम, अक्रोड, मनुका अन् काजू... रोज सुकामेवा खाल्ल्याने शरीराला काय फायदे होतात?

हिवाळ्यात तुळशीचे लग्न झाले की लग्नसराईला सुरुवात होते आणि वेगवेगळ्या खाद्यपदार्थांची त्यात रेलचेल असते. त्यामुळे अनेकवेळा आपल्या आहाराकडे दुर्लक्ष होतं. या दिवसांत कधी गोड पदार्थ, तर कधी तळलेले पदार्थ खाण्याचं प्रमाण वाढतं. अशा वेळी रोजच्या आहारात एक पौष्टिक पदार्थ समाविष्ट केल्यास आरोग्याला अनेक फायदे मिळू शकतात.

Dry Fruits Benefits: हिवाळ्यात तुळशीचे लग्न झाले की लग्नसराईला सुरुवात होते आणि वेगवेगळ्या खाद्यपदार्थांची त्यात रेलचेल असते. त्यामुळे अनेकवेळा आपल्या आहाराकडे दुर्लक्ष होतं. या दिवसांत कधी गोड पदार्थ, तर कधी तळलेले पदार्थ खाण्याचं प्रमाण वाढतं. अशा वेळी रोजच्या आहारात एक पौष्टिक पदार्थ समाविष्ट केल्यास आरोग्याला अनेक फायदे मिळू शकतात.

रोज मूठभर सुकामेवा (Nuts) खाणं आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतं. त्यामुळे सुकामेवा खाण्याचे नेमके फायदे काय?


1. सुकामेव्यामध्ये फायबर आणि इतर पोषक घटक असतात. त्यामुळे आतड्यांच्या आरोग्याला फायदा होऊ शकतो.


2. बदाम, अक्रोड,अंजीर,मनुका यांसारखा सुकामेवा खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होतेच.


3. सुकामेव्यामध्ये व्हिटॅमिन ई असतं. हे एक अँटीऑक्सिडंट असून लिव्हरच्या पेशींचं संरक्षण करण्यास मदत करू शकतं.


4. सुकामेव्याचे सेवन पित्ताशयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते. तसेच पित्ताशयात खडे होण्याचा धोका कमी होण्यास मदत होऊ शकते.


5. सुकामेव्यामध्ये फायबर आणि कॅल्शियम असतं. त्यामुळे पचनक्रियेला मदत होऊ शकते.


6. सुकामेव्यामध्ये असलेले पोषक घटक मेंदूच्या आरोग्यासाठी उपयुक्त असतात. त्यामुळे स्मरणशक्ती आणि मेंदूच्या कार्याला फायदा होऊ शकतो.


7. जर तुम्ही ड्रायफ्रुट्स भिजवून खाल्ले तर तुमची पचनक्रिया निरोगी राहते. याशिवाय ड्रायफ्रूट्स रात्रभर भिजवून सकाळी खाल्ल्याने तुमचे आरोग्य सुधारते. यामुळे बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून आराम मिळतो.






कोणत्या सुकामेव्यामध्ये किती पोषक घटक असतात?


बाजारात बदाम, काजू, अक्रोड, पिस्ता, शेंगदाणे असे अनेक प्रकारचे सुकामेवे उपलब्ध मिळतात. प्रत्येकामध्ये ऊर्जा, प्रथिने आणि स्निग्ध पदार्थांचे (Fat) प्रमाण वेगवेगळे असते.



आहारात सुकामेव्याचा समावेश करा!


रोजच्या आहारात योग्य प्रमाणात सुकामेव्याचा समावेश केल्यामुळे आरोग्यासाठी फायदा होतो. तसेच संतुलित आहार आणि नियमित व्यायामही तितकेच महत्त्वाचे आहेत.

Comments
Add Comment

Devendra Fadnavis : ...तर अवैध होर्डिंग लावणाऱ्यांच्या पुरस्कार यादीत माझेही नाव टाका !

मुंबई : पुणे शहरातील अवैध होर्डिंग आणि अतिक्रमणांविरोधात महापालिका प्रशासनाने सुरू केलेल्या कारवाईचे

Pune News : पुण्यातील कॅम्प परिसरात बेवारस बॅगमुळे खळबळ, बॉम्बशोधक पथकाची तातडीने धाव

पुणे : पुण्यातील कॅम्प परिसरातील 15 ऑगस्ट चौकाजवळ एका बँकेबाहेर बेवारस बॅग आढळल्याने शुक्रवारी काही काळ घबराट

भिवंडीत चिकन शोरमामुळे विषबाधा; रुग्णसंख्या 116 वर, 107 जण रुग्णालयात

भिवंडीत रस्त्याच्या कडेला असलेल्या शोरमाच्या गाड्यावर चिकन शावरमा खाल्ल्याने विषबाधा झालेल्या रुग्णांची

पासपोर्ट कार्यालयाच्या धर्तीवर मुंबईत 'आदर्श दुय्यम निबंधक' कार्यालय

मुंबई : पासपोर्ट कार्यालयाच्या धर्तीवर राज्यात प्रायोगिक तत्त्वावर उभारण्यात आलेले पहिले आदर्श सह दुय्यम

Fulwara Marathi Movie: 'फुलवरा'चा लावणीसाज! वैदेही परशुरामी आणि प्रियदर्शिनी इंदलकर यांच्या नव्या लूकची चर्चा

Fulwara Marathi Movie: रवी जाधव दिग्दर्शित आणि झी स्टुडिओजची निर्मिती असलेल्या ‘फुलवरा’ या चित्रपटाची उत्सुकता आता

Tu Aahes Na: इफ्फीच्या मंचावर मराठी चित्रपटाची भावुक झलक! ‘तू आहेस ना’ला प्रेक्षकांचा प्रतिसाद

Tu Aahes Na: गोव्यात सुरू असलेल्या 57 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) येथे लव फिल्म्स फिल्म्सची