आधी बॉयफ्रेंडला पळवलं, नंतर तरूणीवर जंगलात अत्याचार; घटनेमुळे नागपूर शहर हादरलं...

नागपुरातील सोनेगाव तलाव परिसरातील एका निर्जन जंगलात 19 वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपीने तरुणीच्या प्रियकराला मारहाण करून पिटाळून लावल्यानंतर हा गुन्हा केला, तिचे व्हिडिओ बनवले, मौल्यवान ऐवज हिसकावला आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत पळ काढला. या प्रकरणी गुन्हा दाखल करून पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला असून स्केच आणि सीसीटीव्हीच्या आधारे तपास वेगाने सुरू आहे.

नागपूर: नागपूर शहरातील सोनेगाव तलाव परिसरापासून जवळ असलेल्या एका निर्जन जंगल भागात 19 वर्षीय तरुणीवर अत्याचार झाल्याची अत्यंत संतापजनक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये तीव्र असंतोष व्यक्त केला जात आहे. प्राथमिक माहितीनुसार, पीडित तरुणी आपल्या प्रियकरासोबत सोनेगाव तलावाजवळील जंगलाच्या एका निर्जन परिसरामध्ये गेली होती. त्याच दरम्यान एका अनोळखी युवकाने तेथे आला आणि त्याने तरूणीसोबत हा संतापजनक प्रकार केला आहे.






केलेल्या आरोपांनुसार, त्या युवकाने सर्वात आधी तरुणीच्या प्रियकराला बेदम मारहाण केली आणि त्याला घटनास्थळावरून पळून जाण्यास भाग पाडले. प्रियकर तिथून गेल्यानंतर आरोपीने असहाय्य झालेल्या तरुणीवर लैंगिक अत्याचार केला. इतक्यावरच न थांबता त्याने पीडितेची व्हिडिओ सुद्धा शुटिंग केली. त्यानंतर आरोपीने तरुणीकडील मौल्यवान वस्तू सुद्धा हिसकावून घेतल्या आणि ह्या व्हिडिओ त्याने सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत तिथून पोबारा केला. ही भयानक घटना घडल्यानंतर सुमारे 24 तासांच्या आत पीडित तरुणीने कुटुंबीयांसह सोनेगाव पोलीस ठाणे गाठले. तिथे तिने घडलेला संपूर्ण प्रकार सांगत आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. तक्रारीची दखल घेत पोलिसांनी तत्काळ गुन्हा नोंदवला आणि पुढील तपास सुरू केला.






घटनेचे गांभीर्य लक्षात घेता सोनेगाव पोलीस ठाण्यासह गुन्हे शाखेची विविध पथके आरोपीचा शोध घेण्यासाठी कामाला लागली आहेत. तपासाचा भाग म्हणून पोलीस जंगल परिसरात ये- जा करण्याच्या मार्गांवर बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासत आहेत. आरोपी नेमका कोणत्या मार्गाने घटनास्थळी आला आणि गुन्हा केल्यानंतर कोणत्या दिशेने पसार झाला, याचा शोध तपास पथकाकडून घेतला जात आहे. नागपूर गुन्हे शाखेचे उपायुक्त दीपक अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, या संपूर्ण प्रकारात एकाच आरोपीचा सहभाग असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.


पीडितेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केल्यानंतर आरोपीचा माग काढण्यासाठी पोलिसांनी शोधमोहीम तीव्र केली आहे. तसेच संशयित आरोपीची ओळख पटवता यावी यासाठी पोलिसांनी त्याचा स्केचही प्रसिद्ध केला आहे. या स्केचच्या मदतीने तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरू आहे. विविध स्तरांवर तपास सुरू असून आरोपीला लवकरच ताब्यात घेतले जाईल, असा विश्वास पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे.





Comments
Add Comment

Nagpur Crime: एमडी ड्रग्सचा वाद अन् थेट जीवघेणा हल्ला! नागपुरात पाच जणांनी तरुणाला घेरलं; मित्रालाही मारहाण

उपराजधानी नागपुरात गुन्हेगारीच्या घटनांमुळे पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. एमडी ड्रग्सच्या कथित तस्करीच्या

Gondia breaking news today : गोंदियात मोठी दुर्घटना! भरधाव पोलीस वाहनाने दुचाकीला चिरडले; ३ तरुणांचा जागीच अंत, संतप्त ग्रामस्थांनी महामार्ग रोखला!

गोंदिया : गोंदिया जिल्ह्यात भरधाव वेगातील पोलीस गाडीने एका दुचाकीला जोरदार धडक दिल्याची अत्यंत दुःखद घटना घडली

Beed Crime Case: जप्त केलेलं साहित्य परत दिलं नाही म्हणून संतापला! तलाठी कार्यालयात घुसून तलाठ्याला बेदम मारहाण

राज्यात शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. बीड जिल्ह्यातील

Bopdev Ghat Accident: तीन विद्यार्थ्यांच्या मृत्यूला जबाबदार कोण? बोपदेव घाट अपघातातील चालकाला पोलीस कोठडी

पुण्यातील बोपदेव घाट परिसरात झालेल्या भीषण अपघाताने संपूर्ण शहर हादरले आहे. या अपघातात तीन महाविद्यालयीन

Prahaar Marathi News Live 27 November 2026: महाराष्ट्रासह देश-विदेशातील घडामोडी, एका क्लिकवर वाचा आजच्या घडामोडी!

Prahaar Marathi News Live दिनांक 27 नोव्हेंबर 2026 च्या लाईव्ह ब्लॉगमध्ये महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, स्थानिक बातम्या,

बंजारा समाजाच्या तांड्यांसाठी स्वतंत्र प्राधिकरण! 3 वर्षांत मूलभूत सुविधा, ग्रामपंचायती आणि महसुली गावांचा दर्जा देण्यावर भर

बंजारा समाजाच्या तांडा वस्त्यांच्या विकासासाठी आता स्वतंत्र प्राधिकरण स्थापन करण्यात येणार आहे. पुढील तीन