रक्षकच चोर निघाले! पोलीस आणि DRI कर्मचाऱ्यांनी सोनाराच्या सोन्यावर डोळा; अन् पुढे...

लखनौमध्ये दिल्लीतील व्यापाऱ्याचे कोट्यवधी रुपयांचे सोने लुटल्याच्या खळबळजनक प्रकरणात पोलीस आणि डीआरआयच्या कर्मचाऱ्यांचा सहभाग समोर आला आहे. जौनपूरमधील माहितीच्या आधारे सुशांत गोल्फ सिटी परिसरात ही लूट झाल्याचे उघड झाले असून, याप्रकरणी पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे तर तिघे अद्याप फरार आहेत.

लखनौ: उत्तर प्रदेशची राजधानी असलेल्या लखनौमध्ये कायदा- सुव्यवस्थेला आणि खाकी वर्दीला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दिल्लीहून आलेल्या एका व्यापाऱ्याकडील कोट्यवधी रुपयांचे सोने लुटण्याचा कट रचल्याप्रकरणी पोलीस विभागातील आणि केंद्रीय तपास यंत्रणा डीआरआयशी संबंधित कर्मचाऱ्यांचा सहभाग उघड झाला आहे. या गंभीर गुन्ह्याचा छडा लावत लखनौ गुन्हे शाखा आणि संयुक्त पोलीस आयुक्त (कायदा- सुव्यवस्था) यांच्या पथकाने मोठी कारवाई करत दोन पोलीस कर्मचाऱ्यांसह एकूण पाच आरोपींना गजाआड केले आहे. मात्र, या प्रकरणात जौनपूर पोलिसांच्या एका शिपायाचाही समावेश असून तो सध्या फरार असल्याची माहिती आहे.






प्राथमिक माहितीनुसार, दिल्लीचा एक व्यापारी सोन्याचे दागिने तयार करून घेण्यासाठी जौनपूरला आला होता. याच दरम्यान जौनपूरमध्ये कार्यरत असलेल्या एका पोलीस कर्मचार्‍याला या व्यापाऱ्याकडे मोठ्या प्रमाणावर सोने असल्याची माहिती मिळाली. या कर्मचाऱ्याने व्यापाऱ्याच्या हालचाली आणि त्याच्याकडील सोन्याबाबत गुप्त माहिती फोडल्याचा आरोप आहे. त्यानंतर त्याने लखनौ पोलीस दलात कार्यरत असलेल्या आपल्या सहकारी शिपायाशी चर्चा करून ते सोनं चोरी करण्याचा सविस्तर कट रचला. व्यापाऱ्याचा प्रवास आणि त्याच्याकडील मौल्यवान सोन्याची माहिती हेच या संपूर्ण कटाचे मुख्य सूत्र ठरले. पूर्व नियोजित कटाचा भाग म्हणून लखनौच्या सुशांत गोल्फ सिटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत व्यापाऱ्याला लक्ष्य करण्यात आले.






व्यापारी बसमधून प्रवास करत असताना आरोपींनी संधी साधून त्याच्याकडील सोने चोरी करण्याचा प्रयत्न केला. या गुन्ह्यात काही खाजगी व्यक्तींची आणि इतर कर्मचाऱ्यांचीही साथ असल्याचे तपासात पुढे स्पष्ट झाले आहे. जौनपूर येथून मिळालेल्या माहितीच्या आधारावरच लखनौमध्ये ही मोठी लूट पार पाडण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. या धक्कादायक खुलाशामुळे पोलीस आणि प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. लखनौ गुन्हे शाखा आणि संयुक्त पोलीस आयुक्त पथकाने केलेल्या संयुक्त कारवाईत पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये लखनौच्या गौतमपल्ली पोलीस ठाण्यात नेमणुकीस असलेला शिपाई दुर्गेश कुमार, याशिवाय महसूल गुप्तचर संचालनालय संबंधित असलेल्या मल्टी टास्किंग स्टाफचा कर्मचारी अविनाश शाही यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.






दोघांवरही व्यापाऱ्याला लुटण्याचा कट रचणे आणि प्रत्यक्ष गुन्ह्यात सहभागी असण्याचे गंभीर आरोप ठेवण्यात आले आहेत. तपासादरम्यान पोलिसांनी प्रीतम सोनी आणि तिलक मांझी या दोघांनाही अटक केली असून, दोघांनी व्यापाऱ्याची माहिती गोळा करणे आणि खबरी म्हणून काम केल्याचे समोर आले आहे. तसेच सुरक्षा रक्षक राहुल चौहान यालाही पोलिसांनी अटक केली आहे. अशा प्रकारे लखनौ पोलिसांचा एक शिपाई, डीआरआयचा कर्मचारी, दोन कथित खबरी आणि एक सुरक्षा रक्षक अशा पाच जणांना अटक करण्यात आली आहे. दुसरीकडे, व्यापाऱ्याची माहिती कथितपणे लीक करणारा जौनपूर पोलिसांचा शिपाई, त्याचा भाऊ आणि त्यांचा एक साथीदार हे तिघेही अद्याप फरार आहेत. पोलीस या तिघांचा कसून शोध घेत असून, लुटमारीचा हा संपूर्ण कट कसा रचला गेला आणि कोणाचा नेमका काय सहभाग होता, याचा सखोल तपास सुरू आहे.

Comments
Add Comment

जन्मदात्या बापाने साखरपुड्याच्या दोन दिवस आधीच लेकीला संपवलं, पुरावे लपवण्याचा डाव पण... तेलंगणातील धक्कादायक घटना 

तेलंगणामध्ये एक संतापजनक आणि खळबळजनक घटना घडली आहे. बापानेच पोटच्या लेकीचा खून केल्याच्या घटनेमुळे आदिलाबाद

WTC मध्ये सर्वाधिक विकेट्स घेऊनही सिराजला बाहेरचा रस्ता; टीम इंडियाचा मोठा डाव?

मुंबई: न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या आणि निर्णायक कसोटी सामन्यासाठी क्राइस्टचर्चच्या मैदानावर भारतीय संघ

बॉक्स ऑफिसवर 'रामायण'चा महापराक्रम! 20 दिवसांत तोडले 'हे' 20 ऐतिहासिक रेकॉर्ड; 'अवतार' आणि 'अव्हेंजर्स'लाही टाकले मागे!

मुंबई: नितेश तिवारी दिग्दर्शित, 'रामायण' चित्रपटामध्ये रणबीर कपूर, साई पल्लवी आणि यश यांच्यासह मराठी, बॉलिवूड,

उन्हाळ्यापूर्वीच पनवेलकरांवर पाणीसंकट! आठवड्यातून एक दिवस पाणीकपात, कोणत्या भागात केव्हा पाणी नसेल?

पनवेल: यंदाच्या वर्षी संपूर्ण राज्यामध्ये अल निनोच्या प्रभावामुळे पावसाचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर कमी आहे.

आता आवडत्या मालिकेतील पात्रासोबत काढा सेल्फी! जिओस्टारचा ‘Your Star Moment’ उपक्रम

Your Star Moment: मालिकांमधील पात्रं ही केवळ पडद्यावरची नसतात, तर ती अनेकदा आपल्या रोजच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनतात.

मुंबई २६/११: वीरांच्या शौर्याची कहाणी सांगणारे चित्रपट- वेब सीरिज

[caption id="attachment_1079450" align="alignnone" width="800"] The Attacks of 26/11 (2013): मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा थरार आणि त्या काळ्या रात्रीच्या घटनांचे