Nashik : डॉ. मनीषा जेजुरकर प्रकरणाला वेग ! हायप्रोफाईल खटला सत्र न्यायालयात

नाशिक : नाशिकमधील बहुचर्चित डॉ. मनीषा जेजुरकर आत्महत्या प्रकरणाच्या न्यायालयीन प्रक्रियेला आता वेग आला आहे. या प्रकरणाचा खटला नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाकडे वर्ग करण्यात आला आहे. दुसरे अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी आर. सी. नरवाडिया यांनी यासंदर्भात आदेश दिले आहेत. तसेच, या प्रकरणातील जप्त केलेला सर्व मुद्देमाल १ डिसेंबरपूर्वी सत्र न्यायालयात सादर करण्याचे निर्देश गंगापूर पोलिसांना देण्यात आले आहेत.


डॉ. मनीषा जेजुरकर यांच्या आत्महत्येप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम १०८ आणि सहकलम ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आत्महत्येस प्रवृत्त करण्याच्या या गुन्ह्याची सुनावणी सत्र न्यायालयात होणे आवश्यक असल्याने हे प्रकरण वर्ग करण्यात आले आहे. न्यायालयीन प्रक्रियेनुसार, भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम २३० अंतर्गत संशयितांना दोषारोपपत्र आणि संबंधित कागदपत्रांच्या प्रती सुपूर्द करण्यात आल्या आहेत. त्यानंतर न्यायदंडाधिकारी न्यायालयाने हे प्रकरण रीतसर जिल्हा व सत्र न्यायालयाकडे पाठवले आहे. त्यामुळे आता या प्रकरणाच्या प्रत्यक्ष सुनावणीचा मार्ग मोकळा झाला आहे.






डिजिटल पुरावे ठरणार महत्त्वाचे


या खटल्यात पोलिसांनी गोळा केलेल्या डिजिटल आणि तांत्रिक पुराव्यांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. तपासादरम्यान पोलिसांनी दोन्ही संशयित डॉक्टरांचे मोबाईल फोन जप्त केले आहेत. तसेच, मोबाईलमधील चॅटिंग, कॉल रेकॉर्ड्स आणि फॉरेन्सिक अहवाल यांचाही पुराव्यांमध्ये समावेश आहे.


न्यायालयाने १ डिसेंबरपूर्वी सर्व जप्त मुद्देमाल सादर करण्याचे निर्देश दिल्याने आता पोलिसांना तपासातील पुरावे सत्र न्यायालयात सादर करावे लागणार आहेत. आगामी सुनावणीदरम्यान डिजिटल पुरावे, फॉरेन्सिक अहवाल आणि साक्षीदारांचे जबाब महत्त्वाची भूमिका बजावण्याची शक्यता आहे. त्यामुळे डॉ. मनीषा जेजुरकर आत्महत्या प्रकरणात आता सत्र न्यायालयात कोणते पुरावे समोर येतात आणि सुनावणीदरम्यान काय घडामोडी घडतात, याकडे नाशिककरांचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment

BSF : भारत-पाक सीमेवर घुसखोरीचा प्रयत्न फसला; बीएसएफच्या गोळीबारात एक ठार

भारत-पाकिस्तान सीमेवर घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या एका पाकिस्तानी नागरिकाला सीमा सुरक्षा दलाच्या (BSF) जवानांनी

Solapur DCC Bank Election: सोलापूर जिल्हा बँकेवर भाजपचा एकहाती विजय! 19 पैकी 18 जागांवर भाजप प्रणित पॅनल विजयी

Solapur DCC Bank Election Result 2026: गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यासह संपूर्ण राज्याचं ज्या निवडणुकीकडे लक्ष लागले होते ती

Nashik Crime : निफाडमध्ये भरदिवसा गावठी कट्ट्यातून गोळीबार, 33 वर्षीय तरुण गंभीर जखमी

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात गोळीबाराची धक्कादायक घटना समोर आली आहे. नैताळे गावातील

Nilesh Rane on Sanjay Raut : 'परिसीमन' देशद्रोह असेल तर काँग्रेसलाही देशद्रोही ठरवा; आमदार निलेश राणेंचा संजय राऊतांवर घणाघात

सुप्रिया सुळेंच्या मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेची उडवली खिल्ली सिंधुदुर्ग : शिवसेना (शिंदे गट) आमदार निलेश राणे

Sunetra Pawar: पुणे गोळीबार प्रकरणाचा तपास 'फास्ट ट्रॅक'वर; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे आदेश

मुंबई : शिवाजीनगर जिल्हा न्यायालय परिसरात झालेल्या गोळीबार आणि कोयत्याने हल्ल्याच्या घटनेची उपमुख्यमंत्री तथा

IND vs NZ, 2nd Test: जसप्रीत बुमराहने सामन्याच्या दरम्यान बदलला रन अप, 11 वर्षापूर्वीच्या स्टाईलमध्ये गोलंदाजी Video

भारत न्यूझीलंड यांच्यात दुसरा कसोटी सामना सुरू असून पहिल्या दिवसाचा खेळ संपला. न्यूझीलंडने पहिल्या दिवशी 5 गडी