या निवडणुकीसाठी विरोधी गटातून खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी मोर्चेबांधणी केली होती. तर दुसरीकडे, पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सत्ताधारी नेत्यांची पकड घट्ट करून निवडणुकीची सूत्रे हाती घेतली होती. अखेर आज समोर आलेल्या निकालांमध्ये जयकुमार गोरे यांची रणनीती यशस्वी ठरली असून, जिल्हा बँकेवर भाजपने स्पष्ट बहुमत मिळवले आहे. माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांचे पुत्र मनीष देशमुख विजयी झाल्यानंतर कार्यकर्त्यांकडून मोठा जल्लोष करण्यात आला. अत्यंत चूरशीने झालेल्या या लढतीत अखेरच्या टप्यात मनीष देशमुख यांचा विजय झाला. मोहिते पाटील पॅनलचे उमेदवार शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे आणि मनीष देशमुख या दोघांमध्ये काटे की टक्कर पाहायला मिळाली.
दरम्यान, मनीष देशमुख समर्थक कार्यकर्त्यांनी पक्षात नव्याने आलेल्या नेत्यांनी गद्दारी केल्याचा आरोप केला. कोण आला रे कोण आला गद्दारांचा बाप आला...अशा घोषणा यावेळी मनीष देशमुख यांच्या कार्यकर्त्यांनी लगावल्या. तर इतर सर्व गटामध्ये भाजपचा एकतर्फी विजय झाला आहे केवळ बँकिंग गटमध्ये चूरशीची लढत पाहायला मिळाली. या निवडणुकीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याची दखल घ्यावी अशी मागणी यावेळी मनीष देशमुख समर्थक कार्यकर्त्यांनी केली आहे. दरम्यान ‘सर्वच नेत्यांनी आपल्याला मदत केली, अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात ही निवडणूक झाली, अशी प्रतिक्रिया भाजप प्रणित पॅनलचे विजयी उमेदवार मनीष देशमुख यांनी यावेळी दिली आहे.
'रामायण'ने 'पुष्पा 2'ला मागे टाकलं! आता 'बाहुबली 2'चा विक्रम मोडण्यासाठी फक्त 11कोटींची गरज
Ramayana Movie Box Office: रणबीर कपूरचा रामायण हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सर्व रेकॉर्ड ब्रेक करीत आहे. बॉक्स ऑफिसवर अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2: द रूल'ला मागे टाकून रामायण ...
सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीतील विजयी उमेदवारांची नावे
भाजप पॅनल (एकूण - 18)
बिनविरोध निवडून आलेले उमेदवार
1) राजेंद्र राऊत : बार्शी वि. सोसा.
2) प्रशांत परिचारक : पंढरपूर वि. सोसा.
3) विक्रांत (बाळराजे) पाटील : मोहोळ वि. सोसा.
4) सिद्धेश्वर आवताडे : मंगळवेढा वि. सोसा.
5) यशराज शिंदे : माढा वि. सोसा.
6) श्रीदीप हसापुरे : दक्षिण सोलापूर वि. सोसा.
7) पृथ्वीराज माने : उत्तर सोलापूर वि. सोसा.
8) शंभूराजे जगताप : करमाळा वि. सोसा.
9) सचिन कल्याणशेट्टी : अक्कलकोट वि. सोसा.
10) अजिंक्यराणा पाटील : ओबीसी
निवडणुक झालेल्या 9 जागांचे विजयी उमेदवार
11) बाबासाहेब देशमुख : (सांगोला वि. सो.)
12) अर्चना घाडगे : (महिला)
13) शामल बागल : (महिला)
14) राजेंद्र बंदीछोडे : (इतर भटक्या जा.)
15) रणजितसिंह शिंदे : (कृषी व प्रक्रिया)
16) मनीष देशमुख : (बँक व पतसंस्था)
17) सूर्यादित्य साळुंखे : (दुग्ध विकास)
18) महादेव कांबळे : (अनुसूचित जाती)
मोहिते पाटील पॅनल (एकूण - 1)
19) अर्जुनसिंह मोहिते पाटील(माळशिरस सोसायटी)