WTC मध्ये सर्वाधिक विकेट्स घेऊनही सिराजला बाहेरचा रस्ता; टीम इंडियाचा मोठा डाव?

क्राइस्टचर्च कसोटीतूनही मोहम्मद सिराजला वगळण्यात आल्यामुळे त्याच्या क्रिकेट करियरमध्ये पहिल्यांदाच परदेशी दौऱ्यासाठी एकही सामना न खेळण्याची नामुष्की आली आहे. टीम मॅनेजमेंटने जागतिक कसोटी अजिंक्यपद (WTC) सामन्यासाठी सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजाला डावलून गुरनूर ब्रारला संधी दिली आहे.

मुंबई: न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या आणि निर्णायक कसोटी सामन्यासाठी क्राइस्टचर्चच्या मैदानावर भारतीय संघ उतरला तेव्हा सर्वांच्या नजरा प्लेइंग इलेव्हनवर खिळल्या होत्या. वेलिंग्टन कसोटी अनिर्णित राहिल्यानंतर भारतीय टीम मॅनेजमेंटकडून संघामध्ये बदल केला जाईल, अशी अपेक्षा होती. परंतू बदल करण्यात आला नाही. भारतीय टीम मॅनेजमेंटने मोहम्मद सिराजला पुन्हा एकदा बाहेर ठेवण्याचा निर्णय अनेकांसाठी धक्कादायक ठरला. या एका निर्णयामुळे सिराजच्या नावावर एक नकोसा विक्रम नोंदवला गेला आहे. 2020 मध्ये कसोटी पदार्पण केल्यापासून सिराज प्रत्येक परदेशी कसोटी मालिकेत किमान एक तरी सामना खेळला होता. मात्र, या वेळी त्याला संपूर्ण परदेशी मालिकेत बेंचवरच बसावे लागले आहे.






सध्या सुरू असलेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) चक्रामध्ये मोहम्मद सिराजने चमकदार कामगिरी केली आहे. त्याने 11 सामन्यांत तब्बल 43 विकेट्स घेत भारताचा सर्वात यशस्वी गोलंदाज होण्याचा मान पटकावला आहे. असे असतानाही त्याला सलग दुसऱ्या कसोटीतून डावलण्यात आले. वेलिंग्टनमध्ये झालेल्या पहिल्या कसोटीत भारतीय गोलंदाज न्यूझीलंडच्या दुसऱ्या डावात केवळ 5 विकेट्सच घेऊ शकले होते आणि सामना अनिर्णित राहिला होता. तरीही दुसऱ्या कसोटीत सिराजला संधी न मिळाल्याने चाहत्यांमध्ये आणि क्रिकेट वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.


क्राइस्टचर्च कसोटीसाठी भारताने वेगवान गोलंदाजीत मोठा बदल करत गुरनूर ब्रारला संधी दिली आहे. प्रसिद्ध कृष्णाच्या जागी प्लेइंग इलेव्हनमध्ये आलेल्या गुरनूर ब्रारचा हा पदार्पणाचा कसोटी सामना ठरला. त्याच्यासोबत जसप्रीत बुमराह, आकाश दीप आणि अंशुल कम्बोज यांच्यावर वेगवान माऱ्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. फिरकी आणि अष्टपैलू विभागाचा विचार करता वॉशिंग्टन सुंदरला संघात कायम ठेवण्यात आले आहे, तर रवींद्र जडेजाला सलग दुसऱ्या कसोटीतही बाहेर बसावे लागले आहे. जडेजाऐवजी वॉशिंग्टनवर संघ व्यवस्थापनाने विश्वास दाखवणे हेही या सामन्यातील महत्त्वाचे वळण मानले जात आहे.






मोहम्मद सिराजची आतापर्यंतची कसोटी कारकीर्द पाहता हा निर्णय अधिकच चर्चेचा विषय ठरतो. गेल्या वर्षी ओव्हल येथे इंग्लंडविरुद्ध भारताने नोंदवलेल्या सहा धावांच्या थरारक विजयात सिराजने मोलाचा वाटा उचलला होता. आशियाई खेळपट्ट्यांवरही त्याचा रेकॉर्ड भक्कम राहिला आहे. त्याने आतापर्यंत भारतासाठी 48 कसोटी सामन्यांत 29.63 च्या सरासरीने 144 विकेट्स मिळवल्या आहेत आणि एका डावात पाच किंवा त्याहून अधिक विकेट्स घेण्याचा पराक्रम पाच वेळा केला आहे. इतका अनुभव आणि फॉर्म असतानाही त्याला संधी न मिळणे हा नक्कीच चर्चेचा मुद्दा आहे.


या सामन्यासाठी भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये केएल राहुल, यशस्वी जैस्वाल, देवदत्त पडिक्कल, कर्णधार शुभमन गिल, यष्टिरक्षक ऋषभ पंत, वॉशिंग्टन सुंदर, ध्रुव जुरेल, आकाश दीप, अंशुल कम्बोज, गुरनूर ब्रार आणि जसप्रीत बुमराह यांचा समावेश आहे. दुसरीकडे न्यूझीलंडकडून कर्णधार टॉम लॅथम, डेव्हॉन कॉन्वे, हेनरी निकोल्स, रचिन रवींद्र, डॅरिल मिचेल, यष्टिरक्षक टॉम ब्लंडेल, ग्लेन फिलिप्स, नॅथन स्मिथ, काइल जेमिसन, मॅट हेनरी आणि जेकब डफी मैदानात उतरले आहेत. नवीन चेहऱ्यांसह उतरलेला भारतीय संघ क्राइस्टचर्चमध्ये कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment

Asia Cup Rising Stars 2026: भारत ए संघाचं अंतिम फेरी गाठण्याचं स्वप्न भंगलं, श्रीलंकेकडून 8 गडी राखून पराभव

एसीसी आशिया कप रायझिंग स्टार्स स्पर्धेत भारताचं अंतिम फेरी गाठण्याचं स्वप्न भंगलं आहे. भारताला उपांत्य फेरीत

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2026 मध्ये मुंबईची धमाकेदार आगेकूच! 7 सामन्यांत 6 वा विजय; पुदुचेरी-हरियाणाचा थरार

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2026 मध्ये मुंबईच्या संघाने आपली विजयी घोडदौड कायम राखत उत्तराखंडचा 86 धावांनी धुव्वा

IND vs NZ 2nd Test Live Streaming: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना कधी आणि कुठे पाहाल लाईव्ह? जाणून घ्या सर्व माहिती

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना अनिर्णित ठरला आहे.

SMAT 2026: क्रिकेटच्या मैदानावर संतापजनक प्रकार! कृणाल पांड्यावर चाहत्याने फेकली बूटं; लाजिरवाण्या प्रसंगाचा VIDEO Viral

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2026 स्पर्धेतील एका प्रकाराने क्रीडावर्तुळात चर्चा रंगली आहे. या स्पर्धेत बडोदा आणि

टीम इंडियात मोठा बदल होणार? न्यूझीलंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीसाठी सिराजची एन्ट्री पक्की; कोणाचा पत्ता कट होणार?

क्राइस्टचर्च: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील मालिकेतील दुसरा आणि अंतिम कसोटी सामना क्राइस्टचर्चमधील हॅगली

32 व्या वर्षी मोठा निर्णय! भारताच्या विश्वचषक विजेत्या खेळाडूची प्रथम श्रेणी क्रिकेटमधून निवृत्ती; आता नवी इनिंग?

Baba Aparajith : भारतीय देशांतर्गत क्रिकेटमधील अनुभवी अष्टपैलू खेळाडू बाबा अपराजित याने वयाच्या 32 व्या वर्षी प्रथम