जीवघेणा नायलॉन मांजा! यवतमाळमध्ये वृद्धाचा कान तुटून पडला; बंदी असूनही डोर कशी पोहोचली?

यवतमाळ शहरातील नागपूर रोडवरील मकवानी ले-आऊट परिसरात नायलॉन मांजामुळे 65 वर्षीय वृद्धाचा कान तुटून खाली पडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हसीबउल्लाह इनामदार असे जखमी वृद्धाचे नाव असून, त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बंदी असतानाही नायलॉन मांजाच्या वापरामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

यवतमाळ : शहरात नायलॉन मांजामुळे पुन्हा एकदा एक अत्यंत हृदयद्रावक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. मोटारसायकलवरून प्रवास करत असताना नायलॉन मांजामुळे चक्क एका वयोवृद्धाचा कान तुटून खाली पडला. या अपघातात रक्तबंबाळ अवस्थेत पडलेल्या वृद्धाला तातडीने उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना शहरातील नागपूर रोडवरील मकवानी ले-आउट परिसरात घडली. जखमी वृद्धाचे नाव हसीबउल्लाह इनामदार (वय 65, रा. मकवानी ले-आउट, यवतमाळ) असे आहे.


दरवर्षी नायलॉन मांजाचा जीवघेणा धोका समोर येऊनही त्यावर पूर्णपणे आळा बसलेला नाही. नायलॉन मांजाच्या विक्री आणि खरेदीवर बंदी असतानाही अनेक भागांत लहान मुलांच्या हाती आतापासूनच नायलॉन मांजाची धोकादायक दोर दिसून येत आहे. यातून निष्पाप नागरिकांचा जीव धोक्यात येत असून अनेक गंभीर अपघात घडत असल्याचे चित्र स्पष्टपणे पाहायला मिळत आहे.


बुधवारी सायंकाळच्या सुमारास घडलेल्या या घटनेत हसीबउल्लाह इनामदार आपल्या मोटारसायकलवरून घराच्या दिशेने निघाले होते. त्याच दरम्यान एका ऑटोला नायलॉन मांजा अडकला होता. वाहन चालवत असताना ही जीवघेणी दोर त्यांच्या लक्षात येऊ शकली नाही. अचानक नायलॉन मांजा अडकल्याने तीव्र घर्षण होऊन त्यांचा कान थेट रस्त्यावर तुटून पडला. या अनपेक्षित आणि भयानक घटनेमुळे ते पूर्णपणे गोंधळून गेले.






रक्तबंबाळ अवस्थेत ते आपली मोटारसायकल बाजूला सोडून खाली बसले असता घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी जमली. परिसरातील नागरिकांनी तातडीने मदत करत त्यांना जवळील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी नेले. रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांच्यावर तत्काळ उपचार करत तात्पुरत्या स्वरूपात टाके घालून कान पुन्हा बसविण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, हा कान पूर्वीप्रमाणे पूर्ववत होईल की नाही, याबाबत अद्याप चिंता व्यक्त केली जात आहे.


या दुर्दैवी घटनेमुळे मकवानी ले-आउटसह संपूर्ण यवतमाळ शहरात संतापाची तीव्र लाट उसळली आहे. बंदी असलेला नायलॉन मांजा कोठून आणि कसा उपलब्ध होतो, तसेच तो वापरणाऱ्यांवर कठोर कारवाई का होत नाही, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. प्रशासनाने या प्रकाराची गंभीर दखल घेऊन नायलॉन मांजा विक्रेत्यांवर आणि वापरकर्त्यांवर कडक कारवाई करावी, अशी जोरदार मागणी आता पुढे येत आहे.

Comments
Add Comment

Devendra Fadnavis : जर्मन उद्योगांनी महाराष्ट्रात उत्पादनासह संशोधन केंद्रे उभारावीत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

मुंबई : कुशल मनुष्यबळ, वेगाने विस्तारणारी बाजारपेठ आणि विकसित औद्योगिक परिसंस्था यांमुळे महाराष्ट्रात जर्मन

Sunetra Pawar: पुणे गोळीबार प्रकरणाचा तपास 'फास्ट ट्रॅक'वर; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे आदेश

मुंबई : शिवाजीनगर जिल्हा न्यायालय परिसरात झालेल्या गोळीबार आणि कोयत्याने हल्ल्याच्या घटनेची उपमुख्यमंत्री तथा

आधी बॉयफ्रेंडला पळवलं, नंतर तरूणीवर जंगलात अत्याचार; घटनेमुळे नागपूर शहर हादरलं...

नागपूर: नागपूर शहरातील सोनेगाव तलाव परिसरापासून जवळ असलेल्या एका निर्जन जंगल भागात 19 वर्षीय तरुणीवर अत्याचार

Nagpur Crime: एमडी ड्रग्सचा वाद अन् थेट जीवघेणा हल्ला! नागपुरात पाच जणांनी तरुणाला घेरलं; मित्रालाही मारहाण

उपराजधानी नागपुरात गुन्हेगारीच्या घटनांमुळे पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. एमडी ड्रग्सच्या कथित तस्करीच्या

Gondia breaking news today : गोंदियात मोठी दुर्घटना! भरधाव पोलीस वाहनाने दुचाकीला चिरडले; ३ तरुणांचा जागीच अंत, संतप्त ग्रामस्थांनी महामार्ग रोखला!

गोंदिया : गोंदिया जिल्ह्यात भरधाव वेगातील पोलीस गाडीने एका दुचाकीला जोरदार धडक दिल्याची अत्यंत दुःखद घटना घडली

Beed Crime Case: जप्त केलेलं साहित्य परत दिलं नाही म्हणून संतापला! तलाठी कार्यालयात घुसून तलाठ्याला बेदम मारहाण

राज्यात शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. बीड जिल्ह्यातील