सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2026 मध्ये मुंबईची धमाकेदार आगेकूच! 7 सामन्यांत 6 वा विजय; पुदुचेरी-हरियाणाचा थरार

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2026 मध्ये मुंबईने उत्तराखंडवर 86 धावांनी दणदणीत विजय मिळवत गटात अव्वल स्थान कायम राखले आहे. दुसरीकडे, कर्नाटक, पुदुचेरी आणि हरियाणा यांनीही आपापल्या सामन्यांत दमदार विजयाची नोंद केली.

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2026 मध्ये मुंबईच्या संघाने आपली विजयी घोडदौड कायम राखत उत्तराखंडचा 86 धावांनी धुव्वा उडवला. मुशीर खानच्या 40 चेंडूंतील 65 धावा, अंगक्रिश रघुवंशीच्या 51 धावा आणि हार्दिक तामोरच्या 14 चेंडूंतील 39 धावांच्या जोरावर मुंबईने शेवटच्या षटकात 209 धावांपर्यंत मजल मारली. उत्तराखंडकडून रवींद्र नेगी आणि जगदीश सुचित यांनी प्रत्येकी 3 गडी बाद केले.


लक्ष्याचा पाठलाग करताना उत्तराखंडची सुरुवात गडगडली आणि त्यांनी 58 धावांत 5 विकेट्स गमावल्या. शशवत डांगवालने 20 चेंडूंमध्ये 37 तर जगदीश सुचितने 19 धावा केल्या; मात्र अथर्व अंकोलेकरने 17 धावांत 3 बळी घेत उत्तराखंडचा डाव 16.5 षटकांत 123 धावांवर गुंडाळला. 7 सामन्यांतील हा मुंबईचा 6 वा विजय असून 1 सामना पावसामुळे रद्द झाला होता. या कामगिरीसह मुंबईने 'ड' गटात अव्वल स्थान पक्के केले आहे. इतर सामन्यांमध्ये कर्नाटकने गोलंदाजीच्या जोरावर बडोद्याला 8 गडी राखून हरवले. बडोदाचा संघ 118 धावांत गारद झाला; श्रीशा आचार आणि विद्वत कावेरप्पा यांनी प्रत्येकी 4 बळी घेतले, तर ध्रुव पटेल (33) आणि शशवत रावत (31) यांनी काहीसा प्रतिकार केला. प्रत्युत्तरात रोहन पाटील (48), कृष्णन श्रीजीत (33) आणि करुण नायरच्या नाबाद 30 धावांच्या जोरावर कर्नाटकने 16.1 षटकांत 23 चेंडू राखून विजय मिळवला.






पुदुचेरीने मध्य प्रदेशवर 2 गडी राखून रोमांचक मात करत 158 धावांचे लक्ष्य 2 चेंडू शिल्लक असताना पूर्ण केले. मध्य प्रदेशकडून हर्ष गवळीने नाबाद 72 धावा केल्या, तर प्रणय सिंगने 29 धावांत 4 बळी घेतले. पुदुचेरीकडून परमेश्वरन शिवरामन (नाबाद 46), गौतम दिलीप शास्त्री (35) आणि वेदांत भारद्वाज (26) यांनी विजयात मोलाचा वाटा उचलला. शिवांग कुमारचे 3 बळी मध्य प्रदेशला वाचवू शकले नाहीत आणि सलग 2 पराभवांसह त्यांचा गट फेरीतील प्रवास संपला. हरियाणाने जम्मू आणि काश्मीरचा 2 गडी राखून पराभव करत त्यांची सलग 3 विजयांची मालिका खंडित केली. अब्दुल समदच्या 45 चेंडूंतील नाबाद 77 धावांच्या (6 षटकार) जोरावर जम्मू आणि काश्मीरने 9 बाद 167 धावा केल्या; कनिष्क चौहानने 10 धावांत 3 बळी घेतले. हरियाणाला यशवर्धन दलाल (38), कर्णधार अंकित कुमार (35) आणि राहुल तेवतियाच्या 10 चेंडूंतील नाबाद 20 धावांनी विजय मिळवून दिला. वंश शर्माने 4 गडी बाद केले तरी हरियाणाने 8 गडी गमावून लक्ष्य गाठले.

Comments
Add Comment

IND vs NZ 2nd Test Live Streaming: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना कधी आणि कुठे पाहाल लाईव्ह? जाणून घ्या सर्व माहिती

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना अनिर्णित ठरला आहे.

SMAT 2026: क्रिकेटच्या मैदानावर संतापजनक प्रकार! कृणाल पांड्यावर चाहत्याने फेकली बूटं; लाजिरवाण्या प्रसंगाचा VIDEO Viral

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2026 स्पर्धेतील एका प्रकाराने क्रीडावर्तुळात चर्चा रंगली आहे. या स्पर्धेत बडोदा आणि

टीम इंडियात मोठा बदल होणार? न्यूझीलंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीसाठी सिराजची एन्ट्री पक्की; कोणाचा पत्ता कट होणार?

क्राइस्टचर्च: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील मालिकेतील दुसरा आणि अंतिम कसोटी सामना क्राइस्टचर्चमधील हॅगली

32 व्या वर्षी मोठा निर्णय! भारताच्या विश्वचषक विजेत्या खेळाडूची प्रथम श्रेणी क्रिकेटमधून निवृत्ती; आता नवी इनिंग?

Baba Aparajith : भारतीय देशांतर्गत क्रिकेटमधील अनुभवी अष्टपैलू खेळाडू बाबा अपराजित याने वयाच्या 32 व्या वर्षी प्रथम

Asia Cup Rising Stars 2026, IND vs SL: नाणेफेकीचा कौल भारताच्या बाजूने, कर्णधार तिलक वर्मा प्रथम फलंदाजी घेत म्हणाला..

एसीसी मेन्स आशिया कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारत ए आणि श्रीलंका ए यांच्यात लढत होत आहे. या सामन्यात विजेत्या

IPL ट्रेडिंगमध्ये मोठा धमाका! हार्दिक पांड्याचा RR व्यवहार का फिसकटला? शमी-आर्चर जोडीने रचला नवा डाव!

इंडियन प्रीमियर लीगच्या आगामी हंगामापूर्वी खेळाडूंच्या अदलाबदलीवरून (ट्रेड) मोठी उलथापालथ पाहायला मिळाली आहे.