MPSC Group C Exam 2026 : MPSC गट-क परीक्षेच्या अर्जासाठी मुदतवाढ; आता 29 नोव्हेंबरपर्यंत करता येणार अर्ज

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 (MPSC Group C Exam 2026) साठी अर्ज करण्याची मुदत वाढवली आहे. त्यामुळे अर्ज भरताना अडचणी आलेल्या आणि समतुल्य शैक्षणिक अर्हतेच्या निकषांमुळे संभ्रमात असलेल्या उमेदवारांना दिलासा मिळाला आहे. आता उमेदवारांना 29 नोव्हेंबर 2026 पर्यंत अर्ज सादर करता येणार आहे.






अर्ज आणि परीक्षा शुल्क भरण्याच्या सुधारित तारखा


MPSC ने 25 जून 2026 रोजी जाहिरात क्रमांक 017/2026 प्रसिद्ध केली होती. ( Maharashtra Government Jobs) त्यानंतर 6 नोव्हेंबर रोजी शुद्धिपत्रक काढून अर्ज करण्याची अंतिम तारीख 27 नोव्हेंबर निश्चित करण्यात आली होती. मात्र, समतुल्य शैक्षणिक अर्हतेसंदर्भात 27 नोव्हेंबर 2026 रोजी आणखी एक शुद्धिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले. त्यानंतर आयोगाने अर्जाची मुदत वाढवण्याचा निर्णय घेतला. ( MPSC Recruitment)


आयोगाने जाहीर केलेल्या सुधारित वेळापत्रकानुसार: ( MPSC Group C Exam 2026)




  • अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख: 29 नोव्हेंबर 2026, रात्री 11.59 वाजेपर्यंत.

  • ऑनलाइन परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम तारीख: 30 नोव्हेंबर 2026, रात्री 11.59 वाजेपर्यंत.


समतुल्य शैक्षणिक अर्हतेच्या उमेदवारांनाही संधी


कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाकडून 27 नोव्हेंबर रोजी प्राप्त झालेल्या अभिप्रायाच्या आधारे समतुल्य शैक्षणिक अर्हतेबाबत शुद्धिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. या बदलांमुळे पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना अर्ज करण्याची संधी मिळावी, हा मुदतवाढीमागील मुख्य उद्देश आहे.


त्यामुळे गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 साठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी सुधारित तारखांची नोंद घ्यावी. अर्ज आणि परीक्षा शुल्काची प्रक्रिया दिलेल्या मुदतीत पूर्ण करावी. पात्रता आणि शैक्षणिक अर्हतेसंदर्भातील सविस्तर माहितीसाठी उमेदवारांनी MPSC च्या अधिकृत संकेतस्थळावरील जाहिरात आणि शुद्धिपत्रक तपासावे.


Comments
Add Comment

NCMC Card : एसटीच्या NCMC स्मार्ट कार्डमध्ये आता फक्त 5 रुपयांचा टॉपअप; प्रवाशांना मोठा दिलासा

NCMC Card : एसटी महामंडळाने एनसीएमसी स्मार्ट कार्ड वापरणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय

Eknath Shinde : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही; गरज पडल्यास नियम बाजूला ठेवून मदत करू - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

बुलढाणा : दुष्काळामुळे अडचणीत आलेल्या शेतकरी कुटुंबांना सरकार आणि शिवसेना मदतीसाठी उभी राहील, असा विश्वास

CM Relief Fund : मुख्यमंत्री सहायता निधी आता सोशल स्टॉक एक्सचेंजवर; गरजू रुग्णांना मिळणार नवा आधार

आर्थिक अडचणीमुळे कोणत्याही गरजू रुग्णाचे उपचार थांबू नयेत, या उद्देशाने काम करणाऱ्या मुख्यमंत्री सहायता

सहकारी साखर कारखान्यांच्या 'शासकीय कर्ज हमी'ला लगाम; 100 कोटींची मर्यादा

मुंबई : राष्ट्रीय सहकार विकास निगमकडून (एनसीडीसी) राज्य शासनाच्या हमीवर सहकारी साखर कारखान्यांना दिल्या

Bhusawal Nagpur Express : भुसावळ-नागपूर ‘दादाजी धाम’ एक्स्प्रेसला मंजुरी; बऱ्हाणपूर, खंडवामार्गे धावणार

भुसावळ आणि नागपूरदरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. कोविड काळात बंद झालेली भुसावळ-नागपूर

Devendra Fadnavis : ...तर अवैध होर्डिंग लावणाऱ्यांच्या पुरस्कार यादीत माझेही नाव टाका !

मुंबई : पुणे शहरातील अवैध होर्डिंग आणि अतिक्रमणांविरोधात महापालिका प्रशासनाने सुरू केलेल्या कारवाईचे