Nashik : सुनील केदारांचा राजीनामा ते सिंहस्थाची तयारी, मंत्री गिरीश महाजनांनी दिले अनेक महत्त्वाचे अपडेट्स

नाशिक भाजप शहराध्यक्ष सुनील केदार यांचा राजीनामा घेतला ,पालकमंत्री गिरीश महाजन यांची माहिती ; नावांची परस्पर घोषणा भोवली

नाशिक : भाजपचे शहराध्यक्ष सुनील केदार यांनी स्वीकृत नगरसेवकांची नावे पक्षाच्या अधिकृत पद्धतीला आणि प्रोटोकॉलला बगल देत परस्पर जाहीर केल्याने त्यांचा राजीनामा घेण्यात आल्याची माहिती पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिली. स्वीकृत नगरसेवकांची नावे मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून निश्चित करण्यात आली होती.


मात्र, पक्षात नावे जाहीर करण्याची एक ठरावीक पद्धत असते. ती न पाळता केदार यांनी परस्पर घोषणा केल्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आल्याचे महाजन यांनी स्पष्ट केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे भाजपमधील शहराध्यक्षपदाच्या राजीनाम्याचा विषय चर्चेत आला आहे.



पाण्याचा काटकसरीने वापर करावा


दरम्यान, दोन वर्षांनंतर झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत १२०३ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आल्याचे महाजन यांनी सांगितले. दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता ऑगस्टपर्यंत पाणीपुरवठा, जनावरांसाठी चारा आणि पाणी नियोजनाला प्राधान्य देण्यात येणार आहे. सर्व धरणे पूर्ण भरलेली असली तरी राज्य सरकारच्या धोरणानुसार १० टक्के पाणी राखीव ठेवावे लागणार आहे.


गंगापूर धरणातून शेतकऱ्यांसाठी चार ते पाच आवर्तने सोडण्यात येणार असून, कडवा आणि ओझरखेड धरणातूनही पाणी सोडण्याचे नियोजन आहे. नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन त्यांनी केले. महापालिकेच्या पाणीकपातीबाबत अद्याप निर्णय झालेला नसून, उद्या महापालिकेत चर्चा करून याबाबत निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. (Nashik)



सिंहस्थाची सर्व कामे सहा महिन्यांत पूर्ण होतील


सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीबाबत बोलताना, कुंभमेळ्यासाठी मोठ्या संख्येने भाविक नाशिकमध्ये येणार असून, भव्य स्वरूपात आयोजन करण्यात येणार आहे. सिंहस्थाची सर्व कामे सहा महिन्यांत पूर्ण होतील. त्यामुळे कामांबाबत कोणतेही आव्हान नसल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. गोदावरी नदीत मिसळणाऱ्या सांडपाण्याचा प्रश्न मलनिस्सारण प्रक्रिया केंद्रांच्या माध्यमातून सोडविण्यात येणार असून, दूषित पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आणखी दोन महिने लागण्याची शक्यता आहे. गोदावरीतील पानवेलींची वाढ पोषक वातावरणामुळे होत असून, त्यावरही निर्णय घेण्यात आला आहे. प्रत्यक्ष काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.






त्र्यंबकेश्वर मंदिर बंद ठेवण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय नाही


त्र्यंबकेश्वर मंदिर बंद ठेवण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. गरज भासल्यास काही दिवसांसाठी मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घ्यावा लागू शकतो. याबाबत मंदिराचे विश्वस्त आणि जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असे महाजन यांनी स्पष्ट केले.



...तर महिलांनाही संधी मिळेल


ठाकरे गटाने मतदारसंघ पुनर्रचना प्रक्रियेबाबत घेतलेल्या भूमिकेवर भाष्य करताना, त्यांनी या निर्णयाला सहमती दर्शवावी. त्यामुळे महिलांनाही संधी मिळेल, असे मत त्यांनी व्यक्त केले. शरद पवार गटाच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीला पाठिंबा देण्याच्या भूमिकेबाबत शरद पवार हेच निर्णय घेतील; मात्र त्यांनीही या निर्णयाला पाठिंबा द्यावा, असे आपल्याला वाटत असल्याचे ते म्हणाले.



पुरातन मंदिराची प्रत्यक्ष पाहणी करणार


शिक्षण विभागाचा निधी अन्यत्र वळविण्यात आलेला नसून, निधीचे फेरवाटप करायचे झाल्यास तो शिक्षण विभागाकडेच वळविला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. रिंगरोडबाधित शेतकऱ्यांनी मोबदल्यात वाढ आणि रस्त्याची आखणी बदलण्याच्या मागण्या केल्या आहेत. यासंदर्भात उद्या बैठक घेण्यात येणार आहे. तसेच रामकुंड परिसरात सापडलेल्या पुरातन मंदिराची उद्या प्रत्यक्ष पाहणी करणार असल्याचे महाजन यांनी सांगितले.



दोन महिन्यांत गोदावरी प्रदूषणाचा प्रश्न मार्गी लागणार!


गोदावरी नदीत मिसळणाऱ्या सांडपाण्याचा प्रश्न मलनिस्सारण प्रक्रिया केंद्रांच्या माध्यमातून सोडविण्यात येणार आहे. दूषित पाण्याचा प्रश्न पूर्णपणे मार्गी लावण्यासाठी आणखी दोन महिने लागण्याची शक्यता आहे. नदीपात्रातील पानवेलींची वाढ पोषक वातावरणामुळे होत असून, त्यावरही उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रत्यक्ष काम सुरू असल्याची माहिती पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिली.

Comments
Add Comment

Paro Film : ‘पारो: वधू गुलामगिरीची अज्ञात कहाणी’ चित्रपट लवकरच; वधू तस्करीचा विषय मांडणारा नवा सिनेमा

महिलांची वधू म्हणून खरेदी-विक्री आणि त्यातून होणारे शोषण या गंभीर सामाजिक समस्येवर भाष्य करणारा ‘पारो: वधू

'हिटमॅन'चा नंबर गेम! संध्याकाळी 17:45 वाजताच मुंबई इंडियन्सने का केली रोहित शर्माच्या नावाची घोषणा? जाणून घ्या

मुंबई इंडियन्स आयपीएल 2027 स्पर्धेसाठी सज्ज झाली आहे. मिनी लिलावापूर्वी नव्या कर्णधाराची घोषणा केली आहे. हा

Honda ALPHA चा नवा टीझर रिलीज ! 2 डिसेंबरला होणार ग्लोबल डेब्यू ; भारतातच होणार निर्मिती

होंडा कंपनीच्या आगामी इलेक्ट्रिक एसयूव्हीची सध्या ऑटोमोबाईल क्षेत्रात जोरदार चर्चा सुरू आहे. Honda ALPHA असं या नव्या

Jitendra Awhad : मतदारसंघ पुनर्रचनेला राष्ट्रवादी शरद पवार गटाचा पाठिंबा, जितेंद्र आव्हाडांची माहिती

मुंबई : मतदारसंघ पुनर्रचना अर्थात डिलिमिटेशनच्या विधेयकाला राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचा

Rohit Sharma : 'चला, सगळ्यांनी छान हसा..', मुंबई इंडियन्सचा कर्णधार होतात रोहित शर्माची पहिली प्रतिक्रिया Video

IPL 2027 Mumbai Indians Captain Name : रोहित शर्मा पुन्हा एकदा मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदी विराजमान झाला आहे. मागच्या तीन पर्वात

Western Railway : पश्चिम रेल्वेवर मध्यरात्री चार तासांचा जम्बो ब्लॉक; सांताक्रूझ-माहीमदरम्यान फास्ट लोकल धीम्या मार्गावर

मुंबई : पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. ट्रॅक, सिग्नलिंग आणि ओव्हरहेड उपकरणांच्या