पहाटे 2 वाजता सीमेवर खळबळ! पठाणकोटमध्ये पाकिस्तानी घुसखोराला बीएसएफने ठोकले; हाय अलर्ट जारी

पंजाबमधील पठाणकोट जिल्ह्यातील भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेवर शुक्रवारी पहाटे 2 वाजण्याच्या सुमारास घुसखोरीचा प्रयत्न बीएसएफ जवानांनी हाणून पाडला. इशाऱ्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या एका पाकिस्तानी घुसखोराला गोळीबारात ठार करण्यात आले असून, हिवाळ्याच्या पार्श्वभूमीवर सीमावर्ती भागात शोधमोहीम आणि सुरक्षा तपासणी अधिक कडक करण्यात आली आहे.

पठाणकोट : पंजाबमधील पठाणकोट येथे भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेवर घुसखोरीचा एक मोठा प्रयत्न सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) सतर्क जवानांनी वेळीच हाणून पाडला आहे. सीमेवर तैनात असलेल्या जवानांनी दिलेल्या स्पष्ट इशाऱ्याकडे दुर्लक्ष करत भारतीय हद्दीत बेकायदेशीरपणे प्रवेश करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका पाकिस्तानी घुसखोराला गोळीबारात ठार करण्यात आले आहे. शुक्रवारी पहाटे ही घटना घडल्यामुळे संपूर्ण सीमावर्ती भागात खळबळ उडाली असून सुरक्षा यंत्रणांनी तातडीने हालचालींना वेग दिला आहे.


अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पठाणकोटमधील उझ नदीजवळ असलेल्या पहाडपूर सीमा चौकी परिसरात पहाटे सुमारे 2 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. रात्रीच्या अंधारात आणि थंडीच्या वातावरणात बीएसएफच्या जवानांना आंतरराष्ट्रीय सीमेजवळ एका संशयित व्यक्तीची हालचाल दिसून आली. जवानांनी तत्काळ त्या व्यक्तीला थांबण्याचा इशारा दिला. मात्र, त्याने या इशाऱ्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून भारतीय हद्दीत पुढे जाणे सुरूच ठेवले. संभाव्य धोका आणि परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन जवानांनी गोळीबार केला. या कारवाईत संबंधित घुसखोर जागीच ठार झाला.






दरम्यान, हिवाळ्याच्या दिवसांत उत्तर भारतात धुक्याचे प्रमाण वाढते आणि या धुक्याचा फायदा घेऊन सीमेवरून घुसखोरी किंवा घातपाती कारवाया होण्याची शक्यता असते. ही बाब लक्षात घेता सुरक्षा यंत्रणांकडून सतर्कता मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आली आहे. संभाव्य धोके टाळण्यासाठी आंतरराष्ट्रीय सीमावर्ती भागासह सेकंड लाइन ऑफ डिफेन्सवर विशेष देखरेख ठेवली जात आहे. प्रत्येक हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी गस्त वाढवण्यात आली आहे.


बीएसएफच्या समन्वयाने स्थानिक पोलिसांकडून सीमावर्ती परिसरात विशेष शोधमोहीम राबवण्यात येत आहे. परिसरातील संशयास्पद जागा, शेतीचा भाग आणि नदीकाठच्या पट्ट्यांची कसून झाडाझडती घेतली जात आहे. तसेच, जिल्ह्यातील विविध पोलीस नाक्यांवर तैनात असलेल्या कर्मचाऱ्यांना अधिक सतर्क राहण्याच्या आणि वाहनांची तसेच प्रवाशांची सुरक्षा तपासणी कठोर करण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.


सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पठाणकोट जिल्ह्यातील हा परिसर अत्यंत संवेदनशील मानला जातो. या भौगोलिक भागाला एका बाजूला भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमा लागून आहे, तर दुसऱ्या बाजूला जम्मू-काश्मीरची सीमाही जोडलेली आहे. त्यामुळे दोन्ही बाजूंच्या संवेदनशीलतेमुळे हिवाळ्याच्या पार्श्वभूमीवर या संपूर्ण परिसरात सुरक्षा यंत्रणांकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे, जेणेकरून कोणतीही अनुचित घटना घडू नये.

Comments
Add Comment

PM Modi cabinet meeting today : दिल्लीत राजकीय हालचालींना मोठा वेग; पंतप्रधानांची कॅबिनेट बैठक आणि भाजपच्या राष्ट्रीय मंथनाची सुरुवात

नवी दिल्ली : देशाची राजधानी नवी दिल्लीमध्ये आज (शुक्रवारी) राजकीय आणि प्रशासकीय दृष्ट्या अनेक महत्त्वाच्या

Delimitation Bill : परिसीमन विधेयकासाठी भाजपची मोर्चेबांधणी; लोकसभेतील ३६० खासदारांचं कोडे कसं सुटणार ?

संसदेच्या अधिवेशनात पुनर्रचना विधेयकाची धावपळ केंद्र सरकारने संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज सुरू

Ashwini Vaishnaw : ‘आज एक दिवा बंद केला, उद्या मंदिरेच बंद करणार का?’; तमिळनाडूतील ‘दीपम’ वादावरून अश्विनी वैष्णव यांचा राज्य सरकारवर हल्लाबोल

चेन्नई : तमिळनाडूमध्ये पारंपारिक ‘दीपम’ (दिवा) पेटवण्यावर घातलेल्या बंदीवरून केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी

लोकसभेच्या 543 जागा 850 होणार? डिलिमिटेशन बिलासाठी सरकारची तयारी, राजकीय गणित बदलणार!

Delimitation Bill: सरकारने लोकसभा आणि राज्यसभा दोन्ही संसदेचं विशेष अधिवेशन बोलावण्यात आली आहे. सरकारी कामकाज तातडीने

Gold Rate Today: सोन्याच्या दरात मोठी वाढ की घसरण? 22 आणि 24 कॅरेटचे नवे दर जाहीर; चांदीही महागली!

भारतीय सराफा बाजारात गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये मोठ्या प्रमाणात चढ-उतार पाहायला

जन्मदात्या बापाने साखरपुड्याच्या दोन दिवस आधीच लेकीला संपवलं, पुरावे लपवण्याचा डाव पण... तेलंगणातील धक्कादायक घटना 

तेलंगणामध्ये एक संतापजनक आणि खळबळजनक घटना घडली आहे. बापानेच पोटच्या लेकीचा खून केल्याच्या घटनेमुळे आदिलाबाद