गुरुवारी भाजपच्या वतीने आयोजित ‘संविधान दिना’च्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी या निर्णयाचा खरपूस समाचार घेतला. जर अशा गोष्टींना आत्ताच विरोध केला नाही, तर पुढे जाऊन लोकांना मंदिरात जाण्यापासूनही थांबवले जाईल, असा इशारा त्यांनी दिला. "तुम्ही फक्त एक दिवा विझवला नाही, तर लाखो भाविकांच्या भावनांना तडा दिला आहे. आज एक दिवा बंद केला, उद्या मंदिरात जाण्यास बंदी घालाल आणि शेवटी मंदिरेच बंद करण्याचा विचार कराल का?" असा परखड सवाल त्यांनी राज्य सरकारला केला.
लोकसभेच्या 543 जागा 850 होणार? डिलिमिटेशन बिलासाठी सरकारची तयारी, राजकीय गणित बदलणार!
Delimitation Bill: सरकारने लोकसभा आणि राज्यसभा दोन्ही संसदेचं विशेष अधिवेशन बोलावण्यात आली आहे. सरकारी कामकाज तातडीने करण्यासाठी हे अधिवेशन बोलावण्यात आले आहे, ...
रेल्वे प्रकल्प, भूसंपादन आणि विकासाचा मुद्दा
धार्मिक स्वातंत्र्य जपणे आणि भगवान मुरुगासह आपल्या प्राचीन वारशाचा अभिमान बाळगणे हाच संविधानाचा खरा आदर आहे, असे मत वैष्णव यांनी मांडले. या भाषणादरम्यान त्यांनी टीव्हीके पक्षाला रेल्वेच्या कामांसाठी लागणारे भूसंपादन वेगाने करण्याचे आव्हान दिले. रेल्वेच्या कामांसाठी लागणारा सर्व पैसा केंद्र सरकार देईल आणि कोणतीही आडकाठी न आणता तमिळ लोकांना न्याय मिळवून देऊ, असे आश्वासन त्यांनी दिले. रेल्वे प्रकल्पांसाठी सुमारे ४,८०० हेक्टर जमीन आवश्यक असताना, आतापर्यंत केवळ १,२५३ हेक्टर म्हणजेच अवघी २४ टक्के जमीनच ताब्यात घेण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जमीनच नसेल तर रेल्वेचे काम पुढे कसे जाणार, असा प्रश्न विचारत त्यांनी राज्याने केंद्रासोबत मिळून काम करण्याची गरज बोलून दाखवली. केंद्राने दोन पावले उचलल्यास राज्यानेही एक पाऊल पुढे टाकावे, तरच तमिळनाडूचा खऱ्या अर्थाने विकास साधता येईल, असे ते म्हणाले. विरोधक एखादा दिवा पेटवण्यापासून रोखू शकतील, पण तमिळ लोकांचा स्वाभिमान, प्रगती आणि जगातील मानाचे स्थान ते कधीही हिरावून घेऊ शकत नाहीत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
निवडणूक प्रक्रिया, ईव्हीएम आणि काँग्रेसवर टीका
वैष्णव यांनी आपल्या भाषणात काँग्रेसवरही जोरदार हल्ला केला. निवडणूक घेण्याच्या कायदेशीर व घटनात्मक पद्धतींना विरोध करून काँग्रेस देशभरात गोंधळ निर्माण करत असल्याचा आरोप त्यांनी केला. मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) मोहिमेचा संदर्भ देत ते म्हणाले की, तमिळनाडूमध्ये हे काम काँग्रेसच्या कोणत्याही आक्षेपाशिवाय सुरळीत पार पडले. "काँग्रेसला स्वतःच्या पराभवाचे खापर या मोहिमेवर फोडायचे आहे. जोवर त्यांच्यासाठी संविधानापेक्षा एका कुटुंबाचा स्वार्थ मोठा आहे, तोवर असेच अपयश येत राहील. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर त्यांचा विश्वास नाही," अशी बोचरी टीका त्यांनी केली. इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन (EVM) बाबत काँग्रेसकडून होणाऱ्या तक्रारींवरही त्यांनी बोट ठेवले. तमिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, केरळ, हिमाचल प्रदेश आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये ईव्हीएमवरच निवडणुका झाल्या आणि तिथे काँग्रेसला एकही जागा जिंकता आली नाही, याची आठवण त्यांनी करून दिली. तळागाळात जाऊन मेहनत घेण्याऐवजी काँग्रेस केवळ एका कुटुंबाच्या नावावर राजकारण करत असल्याचे सांगत त्यांनी पक्षाला घरचा आहेर दिला.