मुंबई: राज्याची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत महिलांच्या सुरक्षेचे धिंडवडे निघत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. मध्य रेल्वेच्या अत्यंत वर्दळीच्या समजल्या जाणाऱ्या घाटकोपर रेल्वे स्थानकावर एका 60 वर्षीय ज्येष्ठ महिलेवर लैंगिक अत्याचार झाल्याची संतापजनक घटना गुरुवारी रात्री उशिरा घडली. या घटनेमुळे उपनगरीय रेल्वे स्थानकांवरील सुरक्षेच्या त्रुटी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आल्या असून प्रवाशांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
नेमकी घटना काय?
पीडित 60 वर्षीय महिला ठाणे जिल्ह्यातील खडवली येथील रहिवासी असून त्या मजुरीचे काम करण्यासाठी दररोज घाटकोपरला येतात. गुरुवारी त्या आपल्या 18 वर्षीय मुलीसोबत कामासाठी घाटकोपरला आल्या होत्या. दिवसभराचे काम आटोपून घरी परतण्यासाठी दोघीही रात्री घाटकोपर रेल्वे स्थानकात आल्या होत्या. प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर त्यांची मुलगी खडवली लोकलची वाट पाहत उभी होती, तर रात्री 11 वाजून 12 मिनिटांच्या सुमारास पीडित महिला प्लॅटफॉर्मवरील सार्वजनिक शौचालयात गेल्या होत्या.
भिवंडीत चिकन शोरमामुळे विषबाधा; रुग्णसंख्या 116 वर, 107 जण रुग्णालयात
भिवंडीत रस्त्याच्या कडेला असलेल्या शोरमाच्या गाड्यावर चिकन शावरमा खाल्ल्याने विषबाधा झालेल्या रुग्णांची संख्या अवघ्या दोन दिवसांत दुप्पटीहून ...
नराधमाने साधली संधी
रात्रीची वेळ असल्याने या शौचालयात कोणताही कर्मचारी उपस्थित नव्हता. याच गोष्टीचा फायदा घेत 25 वर्षीय आरोपीने महिलेचा पाठलाग केला आणि त्यांच्या मागोमाग शौचालयात प्रवेश केला. आरोपीने आतून शौचालयाचा दरवाजा बंद केला आणि पॅसेजमध्येच या 60 वर्षीय महिलेवर बळजबरी करत लैंगिक अत्याचार केला. महिलेने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता नराधमाने तिच्या कपाळावर जोरदार मारहाण केली, ज्यामुळे त्या जखमी झाल्या. अवघ्या सात मिनिटांत हे कृत्य करून आरोपी 11 वाजून 19 मिनिटांनी शौचालयातून बाहेर पडला आणि घाटकोपर मेट्रो स्थानकाच्या दिशेने पसार झाला.
पोलिसांची तात्काळ कारवाई आणि अटक
रात्री 11 वाजून 22 मिनिटांनी घाबरलेल्या अवस्थेत पीडित महिला शौचालयातून बाहेर आल्या आणि त्यांनी घडलेला सर्व प्रकार आपल्या मुलीला सांगितला. दोघींनी तात्काळ प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वरील लोहमार्ग पोलीस (GRP) चौकीत धाव घेत मदत मागितली. घटनेचे गांभीर्य ओळखून स्टेशन मॅनेजर आणि रेल्वे सुरक्षा बलाला (RPF) याची माहिती देण्यात आली. महिला पोलिसांनी पीडितेची विचारपूस करून तिला वैद्यकीय तपासणीसाठी घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात दाखल केले.
Mumbai Crime News : लोकमान्य टिळक टर्मिनस स्थानकावर 1.22 कोटींचे चरस जप्त; मुंबई पोलिसांकडून दोघांना अटक
मुंबई : मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या (एएनसी) वरळी युनिटने लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) येथे मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत अंदाजे ...
दरम्यान, लोहमार्ग पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या (BNS) संबंधित कलमान्वये बलात्काराचा गुन्हा दाखल करत तपासाची चक्रे वेगाने फिरवली. पोलिसांनी रेल्वे स्थानक आणि मेट्रो परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, आरोपी शौचालयात जाताना आणि बाहेर पडताना स्पष्टपणे कैद झाला होता. या तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी विविध पथके तयार करून घाटकोपरमधील असल्फा परिसरातून तस्लीम नूर मोहम्मद (वय 25) या आरोपीला शुक्रवारी अटक केली. या आरोपीची यापूर्वीची काही गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत.